अब की बार 250 पार, पुण्यात कोहलीची 'रन'धुमाळी, रहाणे-जाडेजासोबत ‘महायुती’!

टीम  इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli Double Hundred) पुण्याचं मैदान गाजवलं. रनमशीन कॅप्टन विराट कोहलीने (Virat Kohli Double Hundred) पुन्हा एकदा झुंजार खेळी करत द्विशतक ठोकलं आहे.

अब की बार 250 पार, पुण्यात कोहलीची 'रन'धुमाळी, रहाणे-जाडेजासोबत ‘महायुती’!

पुणे : महाराष्ट्रासह पुणे परिसरात निवडणुकीची धामधूम सुरु असताना, टीम  इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli Double Hundred) पुण्याचं मैदान गाजवलं. रनमशीन कॅप्टन विराट कोहलीने (Virat Kohli Double Hundred) पुन्हा एकदा झुंजार खेळी करत द्विशतक ठोकलं . दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (India vs South Africa Pune test) दुसऱ्या कसोटीत कोहलीने 295 चेंडूत द्विशतक झळकावलं. कोहलीने अजिंक्य रहाणे आणि रवींद्र जाडेजा यांच्यासोबत शतकी भागीदारी रचत, भारताला 600 धावांचा टप्पा पार करुन दिला.

भारताने आपला पहिला डाव 5 बाद 601 धावांवर घोषित केला.

कोहलीने कसोटी कारकिर्दीतील सातवं अर्धशतक झळकावलं. कोहलीच्या धडाकेबाज खेळीने  भारताने आफ्रिकेविरुद्ध 600 धावांचा (India vs South Africa Pune test) टप्पा पार केला आहे. कसोटीचा आज दुसरा दिवस आहे.

156 व्या षटकात भारताची धावसंख्या 4 बाद 600 अशी झाली. कोहली नाबाद 253 आणि रवींद्र जाडेजा 91 धावांवर खेळत आहेत.

त्याआधी भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या कसोटीत द्विशतक ठोकणारा मयांक अग्रवालने आपला धावांचा रतीब या कसोटीतही चालू ठेवला. मयांकने 195 चेंडूत 108 धावा केल्या.

दरम्यान, विराट कोहलीने खेळाची सूत्रं हाती घेऊन, आधी 173 चेंडूत 100 धावा पूर्ण केल्या. त्यानंतर कोहलीने 295 चेंडूत द्विशतकाला गवसणी घातली.

सातवं द्विशतक

विराट कोहलीने करिअरमधील सातवं द्विशतक ठोकलं. महत्त्वाचं म्हणजे ही सातही द्विशतकं कोहलीने कर्णधारपदी असताना झळकावली आहेत. सर्वाधिक द्विशतक ठोकणाऱ्या कर्णधारांच्या यादीत कोहली अव्वलस्थानी आहे. वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराच्या नावे 5 द्विशतक आहेत. या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे.

द्विशतकं झळकावणारे कर्णधार

  • विराट कोहली – 7
  • ब्रायन लारा – 5
  • डॉन ब्रॅडमन, ग्रॅमी स्मिथ आणि मायकल क्लार्क – प्रत्येकी 4

रहाणे-जाडेजासोबत भागीदारी

विराट कोहलीच्या द्विशतकी खेळीत त्याला अजिंक्य रहाणे आणि रवींद्र जाडेजा यांनी उत्तम साथ दिली. रहाणे 59 धावा करुन माघारी परतला. तर जाडेजा 80 पेक्षा जास्त धावा करुन शतकाच्या दिशेने वाटचाल करत आहे. कोहली आणि रहाणेने चौथ्या विकेटसाठी 178 धावांची भागीदारी केली. तर कोहली आणि जाडेजा नाबाद द्विशतकी भागीदारी रचली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *