कोरोनाची धास्ती, भारत वि. दक्षिण अफ्रिका सामना प्रेक्षकांविनाच

| Updated on: Mar 13, 2020 | 9:36 AM

जगभरात धुमाकूळ घातलेल्या कोरोना विषाणूचा परिणाम आता राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळांवरही पाहायला मिळत आहे.

कोरोनाची धास्ती, भारत वि. दक्षिण अफ्रिका सामना प्रेक्षकांविनाच
Follow us on

लखनऊ : जगभरात धुमाकूळ घातलेल्या कोरोना (India vs South Africa second ODI) विषाणूचा परिणाम आता राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळांवरही पाहायला मिळत आहे. भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात लखनऊमध्ये खेळवला जाणारा एकदिवसीय सामना हा रिकाम्या मैदानात होणार आहे. भारत आणि दक्षिण (India vs South Africa second ODI) अफ्रिका यांच्यात सध्या तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा सामना हा लखनऊला 15 मार्चला होणार आहे. तर, तिसरा सामना हा 18 मार्चला कोलकाता येथे खेळवला जाणार आहे.

भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान मैदानात एकही प्रेक्षक नसेल. उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे सचिव युधवीर सिंह यांनी ही माहिती दिली. “आम्ही बीसीसीआयच्या आधिकाऱ्यांसोबत याबाबत चर्चा केली. त्यानंतर भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात खेळवला जाणारा एकदिवसीय सामना हा रिकाम्या मैदानात होणार आहे. हा सामना 15 मार्चला होणार आहे.”

हेही वाचा : पुणे, मुंबईनंतर ठाण्यातही कोरोनाचा शिरकाव, राज्यातील बाधितांची संख्या 14 वर

त्यामुळे भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात रविवारी लखनऊ येथील दुसरा एकदिवसीय सामना हा प्रेक्षकांविना खेळवला जाणार आहे. जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूच्या वाढत्या धोक्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोनाच्या वाढत्या धोक्याला पाहता कुठल्याही (India vs South Africa second ODI) खेळाच्या आयोजनात प्रेक्षकांना आमंत्रित केलं जाऊ नये, असं क्रीडा मंत्रालयाने गुरुवारी सर्व क्रीडा महासंघांना सांगितलं.

कोलकाताच्या सामन्यावरही कोरोनाचं सावट

कोलकातामध्ये 18 मार्चला होणारा तिसरा एकदिवसीय सामनाही प्रेक्षकांशिवाय होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. बीसीसीआयने पुढील दोन्ही सामने प्रेक्षकांविना खेळवण्यात यावे, असे निर्देश जारी केले आहेत. तर, कोलकाता येथे होणाऱ्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठीच्या तिकिटांची विक्री अद्याप सुरु करण्यात आली नसून आम्ही बीसीसीआयच्या पुढील आदेशाची प्रतिक्षा करत आहोत, असं बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अविशेक दालमिया यांनी सांगितलं.

क्रीडा मंत्रालयाने बीसीसीआयसह सर्व क्रीडा महासंघांना एक पत्र पाठवत काही आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वाचे पालन करण्याच्या सूचना केल्या होत्या. यानुसार, कोणत्याही खेळाच्या कार्यक्रमात प्रेक्षकांचा सहभाग असू नये. तसेच, एकाच ठिकाणी अनेक लोकांना एकत्र करणे देखील निषिद्ध आहे.

कोरोनाचा हाहा:कार, भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या 74 वर

केंद्र सरकारने आता दुतावास आणि नोकरीसंबंधित व्हिसा सोडून इतर सर्व व्हिसावर बंदी घातली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. देशभरात कोरोनाग्रस्तांची संख्या आता 74 वर येऊन पोहोचली आहे. तर, जागतिक आरोग्य संस्था (WHO) ने या विषाणूला जगभरात पसरलेला साथीचा आजार (Pandemic) म्हणून घोषित केलं आहे. आतापर्यंत या विषाणूमुळे 4600 पेक्षा (India vs South Africa second ODI) जास्त जणांचा मृत्यू झाला आहे.

संबंधित बातम्या :

57 शतकं, 19 हजार धावा, प्रथम श्रेणी क्रिकेटचा बादशाह वासिम जाफरचा क्रिकेटला अलविदा

मिताली राज साडी नेसून क्रिकेटच्या मैदानात, व्हिडीओ व्हायरल

Hardik Pandya | झंझावात, वादळ, धमाका, हार्दिक पंड्याची तुफानी खेळी, 55 चेंडूत 20 षटकार

हार्दिक पंड्याची झंझावाती एण्ट्री, 39 चेंडूत 105 धावा, 10 षटकार, चौकार किती?