मिताली राज साडी नेसून क्रिकेटच्या मैदानात, व्हिडीओ व्हायरल

भारतीय महिला क्रिकेटर मिताली राजचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल (Mitali Raj play cricket in saree) झाला आहे.

मिताली राज साडी नेसून क्रिकेटच्या मैदानात, व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेटर मिताली राजचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल (Mitali Raj play cricket in saree) झाला आहे. ज्यामध्ये ती साडी नेसून क्रिकेट खेळताना दिसत आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात या व्हिडीओवर कॉमेंट तसेच शेअर केला जात आहे. मितालीचा साडीमधील क्रिकेट खेळतानाचा लूक पाहून तिच्या चाहत्यांनीही तिचे कौतुक केले (Mitali Raj play cricket in saree) आहे.

“तुम्हाला प्रत्येक साडी बरेच काही सांगते. साडी कधी तुम्हाला फिट राहायला सांगत नाही. चला येणाऱ्या महिला दिनी एक अनमोल गोष्ट सुरु करुया. यंदाच्या महिला दिनी आपल्या तत्वानुसार जगण्यास सुरुवात करुया, असं मितालीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

मितालीचा हा व्हिडीओ युझर्सने सोशल मीडियावर अनेकदा शेअर केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तसेच तिचे चाहतेही या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया देत आहेत. मितालीने गेल्यावर्षी टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *