क्रिकेटप्रेमींसाठी खास पर्वणी, वानखेडेवर पुन्हा सचिन, सचिन…

क्रिकेटप्रेमींसाठी खास पर्वणी, वानखेडेवर पुन्हा सचिन, सचिन...

तब्बल 7 वर्षांनंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पुन्हा मैदानावर उतरणार आहे. त्यामुळे मुंबईकरांसह सर्व क्रिकेटप्रेमींसाठी हा (Sachin Tendulkar Road Safety World Series) सामना म्हणजे खास पर्वणी असणार  आहे.

Namrata Patil

| Edited By: सचिन पाटील

Mar 07, 2020 | 1:19 PM

मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर तब्बल 7 वर्षानंतर मुंबईच्या वानखेडे मैदानात उतरणार (Sachin Tendulkar Road Safety World Series) आहे. रस्ते सुरक्षेसाठी आयोजित केलेल्या टी 20 क्रिकेट मालिकेतील पहिला सामना आज वानखेडे स्टेडियमवर होत आहे. ‘अनअॅकडमी रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज’ 2020 चषकात सचिन तेंडुकरची इंडिया लिजंड्स विरुद्ध वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराच्या विंडीज लिजंड्समध्ये हा सामना होत आहे. (Sachin Tendulkar Road Safety World Series) तब्बल 7 वर्षांनंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पुन्हा मैदानावर उतरणार आहे. त्यामुळे मुंबईकरांसह सर्व क्रिकेटप्रेमींसाठी हा सामना म्हणजे खास पर्वणी आहे.

भारतात रस्ते अपघातात दर चार मिनिटाला एका व्यक्तीचा (Sachin Tendulkar Road Safety World Series) मृत्यू होतो. त्याबाबत लोकांना जागरुक करण्यासाठी ही मालिका खेळवली जाणार आहे. 14 नोव्हेंबर 2013 रोजी सचिन मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर शेवटचा सामना खेळला होता. विशेष म्हणजे आपल्या करिअरमधील शेवटचा सामना सचिन विडींज विरुद्ध खेळला होता. त्यानंतर पुन्हा एकदा सचिन विडींजविरुद्ध  वानखेडे स्टेडिअमवर खेळणार आहे. त्यामुळे आज वानखेडेवर पुन्हा सचिन, सचिन असा जयघोष ऐकायला येणार आहे.

महिला गोलंदाजाचं सचिन तेंडुलकरला आव्हान, सचिन पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर

मुंबईसह देशभरातील हजारो क्रिकेटप्रेमी मैदानात सचिन सचिन असा जयघोष करण्यासाठी सज्ज झाले आहेत. तसेच सचिनला पुन्हा एका कव्हर ड्राईव्ह शॉट खेळताना बघण्यासही अनेक चाहते उत्सुक आहेत. चौकार षटकारांनी मैदान गाजवण्यास सचिनही सज्ज झाला आहे

या टीमच्या निमित्ताने भारतीय टीमने शुक्रवारी (6 मार्च) मैदानात उतरुन अभ्यास केला. अनेक खेळाडूंनी मैदानात सराव केला. सिक्सर किंग युवराज सिंह ही या सीरिजमध्ये खेळणार आहे.

गोलंदाजी चांगली मात्र क्षेत्ररक्षणाबाबत चिंता

“माझे शरीर थकलेले आहे. मात्र आमच्याकडे जे काही आहे ते घेऊन आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहोत. विश्वचषक जिंकणारे भारतीय संघातील अनेक खेळाडू या ठिकाणी आहेत. पुन्हा एकदा मैदानावर त्याच लोकांसोबत कमबॅक करायला मी फार उत्सुक आहे. यामुळे एकंदर मजा येणार आहे, पण त्यासोबतच आम्ही क्रिकेट खेळण्यासही सज्ज आहोत.” असं युवराज सिंह म्हणाला.

“ही मालिका एका चांगल्या कारणासाठी होत आहे. या मालिकेच्या माध्यामातून लोकांपर्यंत रस्ते सुरक्षाबाबत एक चांगला संदेश दिला जाणार आहे. त्यामुळे हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचला पाहिजे आणि लोकांनी यावर नक्की लक्ष दिले पाहिजे. यासाठी सचिन फार मेहनत घेत आहे. आमची गोलंदाजी चांगली आहे. पण क्षेत्ररक्षणाबाबत थोडी चिंता वाटत आहे,” अशी प्रतिक्रिया सिक्सर किंग युवराज सिंहने दिली.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर कोचच्या भूमिकेत

अनअॅकडमी रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज 2020

अनअॅकडमी रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज 2020 हा कसोटी सामना 20 षटकांचा असेल. यात पाच देशांचे संघ सहभागी होतील. यात भारत, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि साऊथ आफ्रिका हे देश सहभागी असतील. यात क्रिकेटमधून निवृत्त झालेले सर्व खेळाडू पुन्हा मैदानात उतरणार आहेत. यात प्रामुख्याने सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंह, झहीर खान, ब्रेट ली, शीवनारायण चंद्रपॉल, ब्रॅड हॉग, जॉन्टी ऱ्होड्स, मुरलीधरन हे खेळाडू दिसणार (Sachin Tendulkar Road Safety World Series) आहेत.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें