मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर कोचच्या भूमिकेत

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर कोचच्या भूमिकेत
Photo : ICC

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आता कोचच्या भूमिकेत दिसणार आहे.

चेतन पाटील

|

Jan 27, 2020 | 3:30 PM

कॅनबेरा (ऑस्ट्रेलिया) : भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर कोचच्या भूमिकेत दिसणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या जंगलात लागलेल्या आगीत नुकसान झालेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी ‘बुशफायर क्रिकेट बॅश’चं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियातील दोन दिग्गज क्रिकेटपटूंचे संघ एकमेकांविरोधात मैत्रीपूर्ण सामना खेळणार आहेत. यापैकी एका संघासोबत सचिन तेंडुलकर प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहे.

ऑस्ट्रेलियाच्या अॅमेझॉन जंगलाला गेल्या सहा महिन्यांपूर्वी भीषण आग लागली होती. या आगीत लाखो प्राणी-पक्ष्यांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेबद्दल जगभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. आगीत अनेकांचे घरदार, संसार जळून खाक झाले. त्यामुळे या लोकांना मदत करण्याच्या हेतूने 8 फेब्रुवारी रोजी ऑस्ट्रेलियात एक चॅरिटी क्रिकेट सामना खेळवला जाणार आहे.

बूशफायर क्रिकेट बॅश’ला ‘ऑल स्टार टी-20 मॅच’ असं नाव देण्यात आलं आहे. याबाबत ‘क्रिकेट डॉट कॉम डॉट एयू’ने माहिती दिली आहे. या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू युवराज सिंह आणि पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज वसीम आक्रम खेळणार आहेत. मात्र, दोन्ही खेळाडू एकाच संघात खेळतील का? याबाबत निश्चित माहिती समोर आलेली नाही.

‘ऑल स्टार टी-20 मॅच’ या सामन्यात दोन संघ समोरासमोर येणार आहेत. यापैकी एका संघाचं नेतृत्व ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज शेन वॉर्न आणि दुसऱ्या संघाचं नेतृत्व रिकी पॉन्टिंग करणार आहे. रिकी पॉन्टिंगच्या संघाचं नाव ‘रिकी पॉन्टिंग XI’ तर शेन वॉर्नच्या संघाचं नाव ‘शेन वॉर्न XI’ असं ठेवण्यात आलं आहे. यापैकी ‘रिकी पॉन्टिंग XI’ या संघाचा प्रशिक्षक म्हणून सचिन तेंडुलकर काम पाहणार आहे तर वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज कोर्टनी वॉल्श शेन वॉर्न XI संघाचे प्रशिक्षक असतील.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें