गिल-गंभीरच्या जोडीला अखेर अक्कल आलीच, अनुभवी खेळाडूला संघात पुन्हा एन्ट्री देणार, लवकरच टीम जाहीर होणार
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरु होणार आहे. या मालिकेसाठी आता लवकरच संघ जाहीर होणार आहे, या संघात गौतम गंभीर आणि शुभमन गिल मोठे बदल करणार आहे.

भारतीय क्रिकेट संघ सध्या अडचणीत आहे. आयर्लंड आणि इंग्लंडच्या दौऱ्यावर 10 सामने खेळूनही त्यांना फक्त एकच सामना जिंकता आला. झिम्बाब्वेविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका 23 जुलै 2026 पासून सुरू होणार आहे. त्यानंतर श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटी सामने होतील. बीसीसीआय या आठवड्यात संघाची घोषणा करण्याची शक्यता आहे. मागील मालिकेत भारतीय संघात अनेक बदल झालेले दिसले. आता याचा परिणाम आपण पाहिला की भारतीय संघाला मालिका जिंकताना अडणचींचा सामना करावा लागला. आता मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार शुभमन गिल यावर एक तोडगा काढणार आहे आणि संघात मोठे बदल करणार आहे.
प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, 15 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी मालिकेसाठी संघाची घोषणा या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा संघात परत येऊ शकतात. हे दोन्ही खेळाडू गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळले होते. त्यामुळे, गोलंदाजी मजबूत करण्यासाठी निवड समिती जस्सी आणि जड्डू यांचा संघात समावेश करू शकते, कारण भारतीय संघाला पुन्हा एकदा मालिका पराभव पत्करायचा नाही. जडेजाने 89 कसोटी सामन्यांमध्ये 348 बळी घेतले आहेत, तर बुमराहने 52 सामन्यांमध्ये 234 बळी घेतले आहेत.
रवींद्र जडेजाचे पुनरागमन हे सध्याचे संघ व्यवस्थापन, कर्णधार शुभमन गिल आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या विचारसरणीतील बदलाचे संकेत देते. त्याला अलीकडेच कसोटी आणि एकदिवसीय दोन्ही संघांमधून वगळण्यात आले होते. जडेजा शेवटचा एकदिवसीय सामना 18 जानेवारी रोजी खेळला होता. यानंतर, भारताने अफगाणिस्तान आणि इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली, ज्यात अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांची अष्टपैलू म्हणून निवड करण्यात आली होती.
भारताच्या श्रीलंका दौऱ्याचे वेळापत्रक
भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी मालिका 15 ऑगस्ट 2026 पासून सुरू होणार आहे. पहिला सामना गॉलमध्ये खेळला जाईल, तर दुसरा सामना 23 ऑगस्टपासून कोलंबोमध्ये होणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघ कोणत्या खेळाडूंना संधी देईल हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. कारण श्रीलंकेला त्यांच्याच घरच्या मैदानावर हरवणे सोपे नाही.