टीम इंडिया 60 वर्षानंतर पाकिस्तान दौऱ्यावर, भारत सरकारने का दिली मंजुरी

Davis Cup IND vs PAK | भारतीय खेळाडू पाकिस्तानच्या भूमीवर सामने खेळण्यासाठी जात नाही. दोन्ही देशांतील संबंधामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु आता 60 वर्षानंतर पाकिस्तान दौऱ्यावर भारतीय डेव्हिस संघ जाणार आहे.

टीम इंडिया 60 वर्षानंतर पाकिस्तान दौऱ्यावर, भारत सरकारने का दिली मंजुरी
davis cup
Follow us
| Updated on: Jan 28, 2024 | 10:07 AM

नवी दिल्ली, दि.28 जानेवारी 2024 | भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांना प्रोत्साहन देणे थांबत नाही, तोपर्यंत भारतीय खेळाडू पाकिस्तानच्या भूमीवर खेळणार नाही, अशी भूमिका भारताकडून घेतली जाते. परंतु आता भारतीय डेव्हीस कप संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहेत. भारत सरकारने भारतीय संघाला पाकिस्तान दौऱ्यावर जाण्याची परवानगी दिली आहे. तब्बल 60 वर्षानंतर भारतीय टीम पाकिस्तान दौरा करणार आहे. पाकिस्तान उच्चायुक्तांनी भारतीय डेव्हीस कप संघातील खेळाडू आणि इतर स्टाफसाठी व्हिसाही जारी केला आहे. आता भारत आणि पाकिस्तान दरम्यान डेव्हिस कपमधील जागतिक ग्रुप-1 मधील सामने होणार आहेत. हे सामने 3 आणि 4 फेब्रवारी रोजी इस्लामाबादमध्ये होणार आहे.

भारताला यामुळे घ्यावा लागला निर्णय

आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाकडे (ITF) भारताने डेव्हिड कप स्पर्धेचे सामने पाकिस्तानऐवजी तटस्थ देशांमध्ये ठेवण्याची मागणी केली होती. परंतु आयटीएफकडून भारताची मागणी अमान्य करण्यात आली. त्यामुळे अखिल भारतीय टेनिस संघाने (AITA) भारत सरकारला आपल्या संघाला पाकिस्तान दौऱ्यावर जाण्याची परवानगी देण्याची मागणी केली. जर भारतीय संघाने पाकिस्तान दौरा केला नसता तर अंतरराष्ट्रीय टेनिस महासंघ पाकिस्तानला वॉकओवर दिले असते.

यापूर्वी कधी झाला पाकिस्तान दौरा

भारतीय डेव्हिस कप टीमने यापूर्वी 1964 मध्ये पाकिस्तान दौरा केला होता. त्यावेळी पाकिस्तानचा 4-0 असा पराभव भारतीय टीमने केला होता. त्यानंतर 2019 मध्ये दोन्ही संघातील डेव्हीस कपचे सामने कजाकिस्तानमध्ये स्थानांतरित करण्यात आले होते. त्यावेळी दोन्ही देशांतील तणावपूर्ण संबंधामुळे सामने तटस्थ ठिकाणी घेण्याची मागणी भारतीय टेनिस महासंघाने केली होती. त्यावेळी आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने भारतीय टेनिस संघाची मागणी मान्य केली होती. आता डेव्हिस कप स्पर्धेसाठी रविवारी भारतीय संघ पाकिस्तानात रवाना होणार आहे.

हे सुद्धा वाचा

हे खेळाडू बाहेर

स्पर्धेत रामकुमार रामनाथन आणि एन श्रीराम बालाजी एकेरी सामने खेळतील. सुमित नागल आणि शशीकुमार मुकुंद यांनी डेव्हिस चषक सामन्यात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता. बालाजीने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, ‘दुहेरीतून एकेरीकडे वाटचाल करताना, बॅकहँड क्रॉसकोर्ट टाळण्याचे आव्हान आहे. जेव्हा मी एकेरी खेळायचो तेव्हा मी फक्त सर्व्ह आणि व्हॉली वर लक्ष केंद्रित करायचो.

Non Stop LIVE Update
एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन एकत्र आले तर... पाटलांचं वक्तव्य नेमकं काय?
एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन एकत्र आले तर... पाटलांचं वक्तव्य नेमकं काय?.
काय कमावल अन काय गमावल हे 13 जुलैला...जरांगे पाटलांचा नेमका इशारा काय?
काय कमावल अन काय गमावल हे 13 जुलैला...जरांगे पाटलांचा नेमका इशारा काय?.
गायब असलेला पाऊस 'या' दिवशी पुन्हा करणार कमबॅक, IMD चं मोठं अपडेट
गायब असलेला पाऊस 'या' दिवशी पुन्हा करणार कमबॅक, IMD चं मोठं अपडेट.
जरांगे पाटलांना रेड कार्पेट आणि आमची दखलही नाही? ओबीसी नेता आक्रमक
जरांगे पाटलांना रेड कार्पेट आणि आमची दखलही नाही? ओबीसी नेता आक्रमक.
तोडीबाज नेता, ब्लॅकमेलिंग आणि वसुलीत नंबर वन काम; बच्चू कडूंवर टीका
तोडीबाज नेता, ब्लॅकमेलिंग आणि वसुलीत नंबर वन काम; बच्चू कडूंवर टीका.
शरद पवार यांचं मुख्यमंत्र्यांना थेट पत्र अन् केली महत्त्वाची मागणी
शरद पवार यांचं मुख्यमंत्र्यांना थेट पत्र अन् केली महत्त्वाची मागणी.
मरतुकडी म्हैस ध्यानीमनी नसताना गाभण राहावी तसा राणेंचा...सामनातून टीका
मरतुकडी म्हैस ध्यानीमनी नसताना गाभण राहावी तसा राणेंचा...सामनातून टीका.
Elon Musk याच्या दाव्यानंतर निवडणूक आयोगानं फटकारलं, नेमकं काय प्रकरण?
Elon Musk याच्या दाव्यानंतर निवडणूक आयोगानं फटकारलं, नेमकं काय प्रकरण?.
लालपरीने शाळेत जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, विद्यार्थ्यांना आता शाळेत
लालपरीने शाळेत जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, विद्यार्थ्यांना आता शाळेत.
Monsoon रखडला..आगेकूच मंदावली, विदर्भ प्रतिक्षेत तर कोकण, मराठवाड्यात
Monsoon रखडला..आगेकूच मंदावली, विदर्भ प्रतिक्षेत तर कोकण, मराठवाड्यात.