IPL 2020, CSK vs RR : राजस्थानचा 'हल्लाबोल', चेन्नईवर 7 विकेटने मात

राजस्थानच्या जोस बटलरने 48 चेंडूत नाबाद 70 धावा केल्या.

IPL 2020, CSK vs RR : राजस्थानचा 'हल्लाबोल', चेन्नईवर 7 विकेटने मात

अबुधाबी : राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) चेन्नई सुपर किंग्जसवर (Chennai Super Kings) 7 विकेटने दणदणीत विजय मिळवला आहे. चेन्नईने राजस्थानला विजयासाठी 126 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान राजस्थानने 3 विकेट गमावत 15 चेंडू राखत पूर्ण केले. राजस्थानकडून जोस बटलरने नाबाद 70 धावांची धमाकेदार खेळी केली. तर कर्णधार स्टीव्ह स्मिथने 26 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. चेन्नईकडून दीपक चहरने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या. राजस्थानने या विजयासह मोसमातला चौथा विजय साजरा केला. या विजयासह राजस्थानने पॉइंट्सटेबलमध्ये 5 व्या क्रमांकावर झेप घेतली. ipl 2020 csk vs rr live score update today cricket match chennai super kings vs rajasthan royals live लाईव्ह स्कोअर 

विजयी आव्हानाचं पाठलाग करायला आलेल्या राजस्थानची निराशाजनक सुरुवात झाली. राजस्थानने पहिल्या 3 विकेट झटपट गमावल्या. आक्रमक फलंदाज बेन स्टोक्सला चांगली सुरुवात मिळाली होती. मात्र त्याला या खेळीचे मोठ्या आकड्यात रुपांतर करता आले नाही. स्टोक्सच्या रुपात राजस्थानला 26 धावांवर पहिला धक्का लागला. यानंतर रॉबिन उथप्पा आणि संजू सॅमसन झटपट बाद झाले. उथप्पाला 4 धावाच करचा आल्या. तर संजू सॅमसनला भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे राजस्थानची स्थिती 4.3 ओव्हरमध्ये 28-3 अशी झाली होती.

स्टीव्ह स्मिथ-जोस बटलरची विजयी भागीदारी

यानंतर जोस बटलर आणि स्टीव्ह स्मिथने राजस्थानचा डाव सावरला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद 98 धावांची विजयी भागीदारी केली. जोस बटलरने 48 चेंडूत नाबाद 70 धावा केल्या. यात त्याने 2 सिक्स आणि 7 फोर लगावले. तर कर्णधार स्टीव्ह स्मिथनेही नाबाद 26 धावा केल्या. यात त्याने 2 फोर ठोकले. चेन्नईकडून दीपक चहरने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या. तर जोश हेझलवूडने 1 विकेट घेतली.

त्याआधी चेन्नईने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. चेन्नईने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 125 धावा केल्या. चेन्नईकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक नाबाद 35 धावा केल्या. तर महेंद्रसिंह धोनीने 28 धावांची खेळी केली. राजस्थानकडून जोफ्रा आर्चर, कार्तिक त्यागी, श्रेयस गोपाळ आणि राहुल तेवितया या चौघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

बॅटिंगसाठी आलेल्या चेन्नईने ठराविक अंतराने झटपट 4 विकेट गमावले. त्यामुळे चेन्नईची 56-4 अशी स्थिती झाली. मात्र कर्णधार महेंद्रसिंह धोनी-रवींद्र जडेजा या दोघांनी चेन्नईचा डाव सावरला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 51 धावांची भागादारी केली. यानंतर धोनी 28 धावांवर बाद झाला. धोनीने या खेळीत 2 फोर लगावले. धोनीनंतर मैदानात आलेल्या केदार जाधवच्या सोबतीने जडेजाने चेन्नईला 125 धावांपर्यंत पोहचवले. जडेजाने 30 चेंडूत नाबाद 35 धावा केल्या. यात त्याने 4 चौकार लगावले.

Picture

राजस्थानचा चेन्नईवर दणदणीत विजय

19/10/2020,10:55PM
Picture

राजस्थान 17 ओव्हरनंतर

19/10/2020,10:52PM
Picture

राजस्थान मजबूत स्थितीत, 14 ओव्हरनंतर स्कोअर

19/10/2020,10:38PM
Picture

राजस्थान 7 ओव्हरनंतर

19/10/2020,10:03PM
Picture

राजस्थानला तिसरा दणका

19/10/2020,9:51PM
Picture

राजस्थान 4 ओव्हरनंतर

19/10/2020,9:49PM
Picture

राजस्थानला दुसरा धक्का

19/10/2020,9:46PM
Picture

राजस्थानला पहिला झटका

19/10/2020,9:43PM
Picture

राजस्थान 1 ओव्हरनंतर

19/10/2020,9:34PM
Picture

रॉबिन उथप्पा-बेन स्टोक्स सलामी जोडी मैदानात

19/10/2020,9:27PM
Picture

राजस्थानला विजयासाठी 126 धावांचे आव्हान

19/10/2020,9:14PM
Picture

चेन्नईचा अर्ध संघ तंबूत

19/10/2020,9:02PM
Picture

चेन्नई 16 ओव्हरनंतर

19/10/2020,8:50PM
Picture

चेन्नई 12 ओव्हरनंतर

19/10/2020,8:29PM
Picture

चेन्नईला चौथा धक्का

19/10/2020,8:21PM
Picture

चेन्नईला तिसरा धक्का

19/10/2020,8:10PM
Picture

चेन्नई पावरप्लेनंतर

19/10/2020,8:01PM
Picture

चेन्नईला दुसरा धक्का

19/10/2020,7:49PM
Picture

जोस बटलरचा भन्नाट कॅच, फॅफ डु प्लेसिस आऊट

19/10/2020,7:43PM
Picture

चेन्नई 2 ओव्हरनंतर

19/10/2020,7:40PM
Picture

चेन्नई 1 ओव्हरनंतर

19/10/2020,7:36PM
Picture

चेन्नईच्या बॅटिंगला सुरुवात

19/10/2020,7:35PM
Picture

दोन्ही संघांचे अंतिम 11 खेळाडू

19/10/2020,7:16PM
Picture

असा आहे राजस्थानचा संघ

19/10/2020,7:16PM
Picture

चेन्नई प्लेइंग इलेव्हन

19/10/2020,7:15PM
Picture

धोनीचा 200 वा सामना

19/10/2020,7:15PM
Picture

चेन्नईने टॉस जिंकला

19/10/2020,7:14PM

पॉइंट्सटेबलमध्ये सारखीच स्थिती

चेन्नई आणि राजस्थान या दोन्ही संघांची पॉइंट्सटेबलमध्ये सारखीच स्थिती आहे. चेन्नई आणि राजस्थानने आतापर्यंत एकूण 9 सामन्यातून 3 सामन्यात विजय मिळवला आहे. तर 6 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. राजस्थानच्या तुलनेत चेन्नईचा नेट रनरेट काहीअंशी चांगला आहे. त्यामुळे चेन्नई पॉइंट्सटेबलमध्ये 7 व्या तर राजस्थान 8 व्या क्रमांकावर आहे.

राजस्थानवर चेन्नई वरचढ

आयपीएलमध्ये आतापर्यंत चेन्नई आणि राजस्थान यांच्यात एकूण 22 सामने खेळण्यात आले आहेत. या 22 पैकी 14 सामन्यात चेन्नईने 14 सामने जिंकले आहेत. तर राजस्थाननेही 8 सामन्यात चेन्नईला पराभूत केलं आहे. यंदाच्या मोसमात याआधी चेन्नई विरुद्ध राजस्थान यांच्यात 22 सप्टेंबरला सामना खेळण्यात आला. या सामन्यात राजस्थानने चेन्नईला 16 धावांनी पराभूत केलं होतं.

चेन्नई सुपर किंग्स : महेंद्र सिंह धोनी (कर्णधार), मुरली विजय, अंबाती रायुडू, फॅफ डु प्लेसिस, शेन वॉटसन, केदार जाधव, रवींद्र जडेजा, लुंगी एन्गिडी, दीपक चहर, पीयूष चावला, इमरान ताहीर, मिचेल सेंटनर, जोश हेझलवुड, शार्दुल ठाकुर, सॅम करन, नारायण जगदीशन, केएम आसिफ, मोनू कुमार, आर साई किशोर, ऋतुराज गायकवाड आणि कर्ण शर्मा.

राजस्थान रॉयल्स : जॉस बटलर, बेन स्टोक्स, संजू सॅमसन, अंड्रयू टाय, कार्तिक त्यागी, स्टीव स्मिथ (कर्णधार), अंकित राजपूत, श्रेयस गोपाळ, राहुल तेवतिया, जयदेव उनादकट, मयंक मार्कंडेय, महिपाल लोमरुर, ओशेन थॉमस, रियान पराग, यशस्वी जयस्वाल, अनुज रावत, आकाश सिंह, डेव्हिड मिलर, मनन वोहरा, शशांक सिंह, वरुण अॅरोन, टॉम करन, रॉबिन उथप्पा, अनिरुद्ध जोशी आणि जोफ्रा आर्चर.

संबंधित बातम्या :

IPL 2020, RR vs CSK : राजस्थानची ‘रॉयल’ सुरुवात, चेन्नईवर 16 धावांनी मात

IPL 2020 | ‘दुखापतग्रस्त’ दिल्लीला दिलासा, अमित मिश्राच्या जागी नव्या फिरकीपटूला संधी

ipl 2020 csk vs rr live score update today cricket match chennai super kings vs rajasthan royals live

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *