AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2020 | रोहितची रणनीती ठरली, धोनीविरुद्धच्या पहिल्या विजयासाठी मुंबई इंडियन्स सज्ज

यूएईमध्ये अबूधाबी, दुबई आणि शारजाह या तीन मैदानावर आयपीएल स्पर्धा पार पडणार आहे. | IPL 2020 First Match Mumbai Indians vs Chennai Super kings

IPL 2020 | रोहितची रणनीती ठरली, धोनीविरुद्धच्या पहिल्या विजयासाठी मुंबई इंडियन्स सज्ज
| Edited By: | Updated on: Sep 19, 2020 | 6:11 PM
Share

अबूधाबी : आयपीएलच्या 13 व्या मोसमाला शनिवारी 19 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. यंदाच्या हंगामातील सलामीचा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला जाणार आहे. या पहिल्या सामन्यासाठी आम्ही सज्ज आहोत, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने दिली आहे. (Ipl 2020 First Match Mumbai Indians vs Chennai Super kings)

रोहित शर्मा काय म्हणाला ?

“मुंबई विरुद्ध चेन्नईत चुरशीचा सामना होईल, अशी आशा आहे. चेन्नईविरुद्धच्या सर्व आव्हानांसाठी आम्ही सज्ज आहोत. आयपीएलच्या इतिहासात चेन्नई यशस्वी संघ राहिला आहे. चेन्नईने 3 वेळा आयपीएलचं विजेतेपद पटकावलं आहे. चेन्नईमध्ये अनेक आक्रमक खेळाडू आहेत. त्यामुळे चेन्नईला गृहीत धरता येणार नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनापरिस्थितीमुळे सर्वच क्रिकेटपासून दूर आहोत. त्यामुळे विजयी सुरुवात करण्याचा मानस प्रत्येक संघाचा असेल”, असं रोहित म्हणाला.

यूएईमधील खेळपट्ट्यांबाबत प्रतिक्रिया

यूएईमध्ये अबूधाबी, दुबई आणि शारजाह या तीन मैदानावर आयपीएल स्पर्धा पार पडणार आहे. रोहितने यूएईमधील खेळपट्ट्यांबाबत प्रतिक्रिया दिली. “यूएईमधील खेळपट्ट्या फक्त फिरकीपटूंसाठीच नाहीतर वेगवान गोलंदाजांसाठीही फायदेशीर ठरतील. या खेळपट्ट्यांकडून गोलंदाजांना रिव्हर्स स्वींग करण्यासाठी मदत मिळेल, असा विश्वास रोहितने व्यक्त केला. आमचा संघ परिपूर्ण आहे. आमच्याकडे चांगले गोलंदाज आहेत. त्यामुळे परिस्थितीनुसार संघात बदल करण्याचा पर्याय आमच्याकडे आहे”, असंही रोहितने नमूद केलं.

2014 मध्ये आयपीएलमधील सुरुवातीचे काही सामने यूएईमध्ये खेळण्यात आले होते. मुंबईने यूएईमधील 2014 मध्ये प्लेऑफमध्ये धडक मारली होती. मात्र अंतिम फेरीपर्यंत पोहचता आले नव्हते.

गोलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा

रोहितला संघातील गोलंदाजांकडूनन चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. मुंबईच्या गोटात कृणाल पांड्या, राहुल चहर, प्रिन्स बलवंत राय आणि अनुकूल रॉय यासारखे फिरकीपटू आहेत. तसेच जेम्स पॅटिन्सन, धवल कुलकर्णी आणि मोहसिन खान यासारखे गोलंदाज आहेत. ज्यांना मलिंगाच्या जागेवर संधी मिळू शकते.

मुंबईची यूएईमधील कामगिरी

मुंबई संघाची यूएईमधील कामगिरी निराशाजनक राहिली आहे. यूएईत 2014मध्ये आयपीएल स्पर्धेतील 20सामने खेळण्यात आले होते. तेव्हा मुंबईने एकूण 5 सामने खेळले होते. या पाचही सामन्यात मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला होता. मुंबईला कोलकाता नाईट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बँगलोर, चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली डेयरडेविल्स आणि सनराइजर्स हैदराबाद या संघांकडून पराभव स्वीकारावा लागला होता. (Ipl 2020 First Match Mumbai Indians vs Chennai Super kings)

मुंबई इंडियंस (Mumbai Indians)

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या, किरन पोलार्ड, क्विंटन डी कॉक, मिचेल मॅक्लेघन, जसप्रीत बुमराह, जेम्स पॅटिन्सन, कृणाल पांड्या, सूर्यकुमार यादव, अनमोलप्रीत सिंह, ट्रेंट बोल्ट, राहुल चाहर, इशान किशन, अनुकुल रॉय , आदित्य तारे, शेरफेन रदरफोर्ड, जयंत यादव, क्रिस लिन, सौरभ तिवारी, दिग्विजय देशमुख, प्रिंस बलवंत राय सिंह, नाथन कुल्टर नाइल, मोहसिन खान, धवल कुलकर्णी.

चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings)

महेंद्र सिंह धोनी (कर्णधार), ड्वेन ब्रावो, फाफ डुप्लेसी, हरभजन सिंह, इमरान ताहीर, रवींद्र जडेजा, सुरेश रैना, शेन वॉटसन, अंबाती रायुडू, केएम आसिफ, दीपक चाहर, जगदीसन नारायण , कर्ण शर्मा, केदार जाधव, लुंगी एनगिडी, मिचेल सँटनर, मोनू सिंह, एम विजय, ऋतुराज गायकवाड, शार्दुल ठाकूर, सॅम करन, पीयूष चावला, जोश हेजलवूड.

संबंधित बातम्या :

IPL 2020 : सलामीच्या सामन्यासाठी मुंबई इंडियन्स सज्ज, रोहित शर्माने उलगडलं रहस्य

IPL 2020 | सलामीच्या लढतीत धोनीच्या चेन्नईपेक्षा रोहितची मुंबई भारी, गौतम गंभीरला विश्वास

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.