SRH vs RCB LIVE : विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची सनरायजर्स हैदराबादशी टक्कर

बंगळुरुचे नेतृत्व विराट कोहली करणार आहे. तर हैदराबादची जबाबदारी डेव्हिड वॉर्नरकडे आहे. Sunrisers Hyderabad vs Royal Challengers Bangalore

SRH vs RCB LIVE : विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची सनरायजर्स हैदराबादशी टक्कर

दुबई : आयपीएलच्या 13 व्या मोसमातील तिसरा सामना आज 21 सप्टेंबरला खेळला जाणार आहे. या हंगामातील तिसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद (SRH) आमनेसामने असणार आहेत. या सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी  7  वाजून 30  मिनिटांनी सुरुवात होणार आहे. बंगळुरु टीमची सूत्र विराट कोहलीकडे (Virat Kohli) असणार आहेत. तर सनरायजर्स हैदराबादचे नेतृत्व डेव्हिड वॉर्नर (David Warner ) करणार आहे. ( Sunrisers Hyderabad vs Royal Challengers Bangalore )

आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत दोन्ही संघांनी एकमेकांविरुद्ध 15 सामने खेळले आहेत. या 15 सामन्यांपैकी 8 सामन्यात सनरायजर्स हैदराबादने विजय मिळवला आहे. तर बंगळुरुला 6 सामन्यात यश मिळाले आहे. तर उर्वरित एक सामना अनिर्णित राहिला.

बंगळुरुची बॅटिंगची जबाबदारी विराट-डिव्हिलियर्सवर

बंगळुरु संघाच्या बॅटिंगची जबाबदारी कर्णधार विराट कोहली आणि एबी डीव्हिलियर्सच्या खांद्यावर असणार आहे. विराट आणि डीव्हिलियर्स हे दोन्ही टी-20 स्पेशालिस्ट आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा विराटच्या नावावर आहे. विराटने आतापर्यंत 177 सामन्यात 5 हजार 412 धावा केल्या आहेत. विराटने संघाला आपल्या नेतृत्वात अनेक वेळा मोक्याच्या क्षणी विजय मिळवून दिला आहे.

तसेच डीव्हिलियर्स मैदानात चौफेर फटकेबाजी करण्यासाठी ओळखला जातो. त्यामुळे या दोन्ही बॅट्समनना रोखण्याचे आव्हान हैदराबाद समोर असेल. अॅरॉन फिंच आणि देवदत्त पडीक्कल यांच्याकडूनही चांगल्या खेळीची अपेक्षा असणार आहे.

बंगळुरुकडे एकसेएक फिरकीपटू

बंगळुरुकडे तोडीसतोड फिरकीपटू आहेत. यामध्ये युजवेंद्र चहल, पवन नेगी, अॅडम झॅम्पा, वॉशिंग्टन सुंदर आणि मोईन अली यासारख्या फिरकीपटूंचा समावेश आहे.

हैदराबादची तगडी फलंदाजी

हैदराबादकडे तगडी बॅटिंग लाईनअप आहे. स्वत: डेव्हिड वॉर्नर हा आतापर्यंत 3 वेळा ऑरेंज कॅप विनर राहिला आहे. तसेच 2016 साली वॉर्नरच्या नेतृत्वातच हैदराबादने आयपीएलचं जेतेपद पटकावलं होतं. वॉर्नर आणि जॉनी बेयरस्टो ही आयपीएलमधील यशस्वी सलामीवीर जोडी आहे. आयपीएलच्या मागील सत्रात या जोडीने बंगळुरु विरोधात विक्रमी भागीदारी केली होती. तसेच केन विलियमसन आणि मनिष पांडे यांचीही साथ असणार आहे.

येथे पाहता येणार लाईव्ह सामना

क्रिकेट चाहत्यांना स्टार स्पोर्ट्सवर (Star Sports) थेट सामना पाहता येणार आहे. तसेच मोबाईल युझर्सना डिज्नी हॉटस्टार अॅप (Disney Hostar App) आणि जियो अॅपवर (Jio App) लाईव्ह मॅच पाहता येईल. ( Sunrisers Hyderabad vs Royal Challengers Bangalore )

सनराइजर्स हैदराबाद (SRH): डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), केन विलियमसन, मनिष पांडे, भुवनेश्वर कुमार, राशिद खान, मिशेल मार्श, विराट सिंह, विजय शंकर, संदीप शर्मा, मोहम्मद नबी, अभिषेक शर्मा, जॉनी बेयरस्टो, ऋद्धिमान साहा, श्रीवत्स गोस्वामी, खलील अहमद, सिद्धार्थ कौल, शाहबाज नदीम, बिली स्टेनलेक, बासिल थम्पी, टी. नटराजन, प्रियम गर्ग, संदीप बवानाका, अब्दुल समद, फैबियन एलन आणि संजय यादव.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु (RCB): विराट कोहली (कर्णधार), अॅरॉन फिंच, देवदत्त पडीक्कल, पार्थिव पटेल, एबी डिव्हिलियर्स, गुरकीरत मान, शिवम दुबे, ख्रिस मॉरिस, वॉशिंगटन सुंदर, शाहबाज अहमद, नवदीप सैनी, डेल स्टेन, युजवेंद्र चहल, अॅडम झॅम्पा, इसुरू उदाना, मोईन अली, जोश फिलिप, पवन नेगी, पवन देशपांडे, मोहम्मद सिराज आणि उमेश यादव.

संबंधित बातम्या :

IPL 2020 | तीन युवा खेळाडू आयपीएल पदार्पणासाठी सज्ज, सामना पलटवण्याची क्षमता

IPL 2020 : यूएईचा कर्णधार कोहलीच्या मदतीला, RCB ची भन्नाट आयडिया

Published On - 4:42 pm, Mon, 21 September 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI