IPL 2020 | तीन युवा खेळाडू आयपीएल पदार्पणासाठी सज्ज, सामना पलटवण्याची क्षमता

IPL 2020 | तीन युवा खेळाडू आयपीएल पदार्पणासाठी सज्ज, सामना पलटवण्याची क्षमता | (3 youngest player debut in ipl 2020)

IPL 2020 | तीन युवा खेळाडू आयपीएल पदार्पणासाठी सज्ज, सामना पलटवण्याची क्षमता

यूएई : प्रत्येक खेळाडूला आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचं प्रतिनिधित्व करण्याची इच्छा असते. मात्र प्रत्येक खेळाडूला ती संधी मिळतेच असं नाही. आयपीएल स्पर्धेच्या रुपाने अनेक खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ उपलब्ध झालं आहे. आयपीएलच्या प्रत्येक हंगामात नवीन चेहऱ्यांना संधी मिळते. यंदाच्या मोसमात ३ खेळाडू आयपीएलमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. (3 Youngest Player Debut In IPL 2020)

रवी बिश्नोई (Ravi Bishnoi)

रवी बिश्नोई आयपीएलच्या 13 व्या मोसमात पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. रवी आयपीएलमध्ये किंग्ज इलव्हेन पंजाबचं प्रतिनिधित्व करणार आहे. रवीने अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली होती. रवी लेग स्पीनर आहे. यूएईत रवीसाठी अनुकूल परिस्थिती असेल. त्याला खेळपट्टीपासून मदत मिळू शकते. त्यामुळे पंजाबला रवीकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. मात्र अंतिम 11 खेळाडूंमध्ये समावेश केल्यावरच त्याला आपल्यातील चुणूक दाखवता येईल.

यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal)

यशस्वी जयस्वालने नुकत्याच झालेल्या अंडर-19 वर्ल्ड कप स्पर्धेत अष्टपैलू कामगिरी केली. यशस्वीला राजस्थान रॉयल्सने आपल्या चमूत त्याचा समावेश केला आहे.

यशस्वीला राजस्थानकडून अंतिम – 11 मध्ये स्थान मिळाल्यास वर्ल्ड कपसारखीच चमकदार कामगिरी करतो का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

इशान पोरेल (Ishan Porel)

वेगवान बोलर इशान पोरेलने डोमेस्टिक क्रिकेटमध्ये बॉलिंगने चमक दाखवली आहे. इशानचा किंग्ज इलेव्हन पंजाबमध्ये समावेश करण्यात आला आहे. इशानने मागील रणजी हंगामातील 6 सामन्यात 23 विकेट्स मिळवल्या होत्या. इतर खेळाडूंप्रमाणे इशानही आयपीएलमध्ये डेब्यू करण्याची वाट पाहत आहे.

आयपीएलमुळे अनेक नव्या दमाच्या खेळाडूंना कमी वयात खेळण्याची संधी मिळाली आहे. यामध्ये सरफराज खानचे आवर्जून नाव घ्यायला हवे. 23 वर्षीय सरफराजने वयाच्या 18 व्या वर्षी म्हणजेच 2015 ला आयपीएलमध्ये पदार्पण केले होते.

या खेळाडूंची आयपीएलमधून माघार

चेन्नई सुपर किंगजचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैना, फिरकीपटू हरभजन सिंह आणि मुंबई इंडियन्सचा स्टार बॉलर लसिथ मलिंगा या 3 खेळाडूंनी आयपीएलमधून माघार घेतली आहे.

दरम्यान भारतातील कोरोनापरिस्थितीमुळे आयपीएलच्या 13 व्या हंगामाचं नियोजन यूएईमध्ये करण्यात आलं आहे. 19 सप्टेंबरला मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सलामीचा सामना खेळला जाणार आहे. (3 Youngest Player Debut In IPL 2020)

IPL 2020: नव्या हंगामासाठी राजस्थान रॉयल्सची जर्सी स्कायडायव्हरकडून लॉन्च, व्हिडीओ व्हायरल

IPL 2020 : वेगापेक्षा वेगवान, चित्यासारखा चपळ, फिल्डिंगचा बादशाहा जॉन्टी ऱ्होड्सचा भन्नाट झेल

IPL 2020 : यूएईचा कर्णधार कोहलीच्या मदतीला, RCB ची भन्नाट आयडिया

Published On - 6:10 pm, Thu, 17 September 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI