IPL 2020, KKR vs RCB : बंगळुरुचा शानदार विजय, कोलकातावर 8 विकेट्सने मात

या विजयासह बंगळुरुने पॉइंट्सटेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

IPL 2020, KKR vs RCB : बंगळुरुचा शानदार विजय, कोलकातावर 8 विकेट्सने मात

अबुधाबी : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (Royal Challengers Banglore) कोलकाता नाईट रायडर्सवर (Kolkata Knight Riders) 8 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. कोलकाताने बंगळुरुला विजयासाठी 85 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान बंगळुरुने 2 विकेट्स गमावत 13.3 ओव्हरमध्येच पूर्ण केलं. बंगळुरुकडून देवदत्त पडिक्कलने सर्वाधिक 25 धावा केल्या. तर गुरुकीरत मानने नाबाद 21 धावा केल्या. या विजयासह बंगळुरुने मुंबईला पछाडत पॉइंट्सटेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. IPL 2020 KKR vs RCB Live Score Update Today Cricket Match Kolkata Knight Riders vs Royal Challengers Banglore Live

विजयी आव्हानाचे पाठलाग करायला आलेल्या बंगळुरुची चांगली सुरुवात झाली. अॅरॉन फिंच आणि देवदत्त पडीक्कल या जोडीने 46 धावांची सलामी भागीदारी केली. यानंतर अॅरॉन फिंच 16 धावांवर बाद झाला. फिंचच्या मागोमाग देवदत्त पडीक्कल 25 धावांवर रनआऊट झाला. यानंतर कर्णधार विराट कोहली आणि गुरुकीरत मान या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी नाबाद 39 धावांची नाबाद विजयी भागीदारी केली. विराटने नाबाद 18 तर गुरुकीरतने नाबाद 21 धावा केल्या. कोलकाताकडून लॉकी फॅर्ग्युसनने एकमेव विकेट घेतली.

याआधी कोलकाताने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. बंगळुरुच्या भेदक माऱ्यासमोर कोलकाता डाव अवघ्या 84 धावांवर आटोपला. बॅटिंगसाठी आलेल्या कोलकाताला बंगळुरुच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनचच झटके द्यायला सुरुवात केली. इयॉन मॉर्गनचा अपवाद वगळता कोणत्याही खेळाडूला चांगली खेळी करता आली नाही. कोलकाताकडून कर्णधार मॉर्गनने सर्वाधिक 30 धावांची खेळी केली. तर शेवटच्या काही ओव्हरमध्ये कुलदीप यादव आणि लॉकी फर्ग्युसनने छोटी खेळी केली. या दोघांनी प्रत्येकी अनुक्रमे 12 आणि 19 धावा केल्या. बंगळुरुकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. त्याने आपल्या 4 ओव्हरच्या स्पेलमध्ये अवघ्या 8 धावाच दिल्या. तसेच त्याने 2 निर्धाव टाकल्या. युझवेंद्र चहलने 2 विकेट्स घेतल्या. तर वॉशिंग्टन सुंदर आणि नवदीप सैनीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Picture

बंगळुरुचा शानदार विजय

21/10/2020,10:39PM
Picture

बंगळुरुला विजयासाठी 8 धावांची आवश्यकता

21/10/2020,10:18PM
Picture

बंगळुरुच्या 8 ओव्हरनंतर धावा

21/10/2020,10:02PM
Picture

देवदत्त पडिक्कल आऊट, सलामी जोडी माघारी

21/10/2020,9:56PM
Picture

बंगळुरुला पहिला धक्का

21/10/2020,9:54PM
Picture

बंगळुरुची चांगली सुरुवात,पावरप्लेच्या 6 ओव्हरनंतर स्कोअर

21/10/2020,9:50PM
Picture

बंगळुरुचा 4 ओव्हरनंतर स्कोअर

21/10/2020,9:41PM
Picture

बंगळुरुच्या डावाला सुरुवात

21/10/2020,9:39PM
Picture

कोलकाताला विजयासाठी 85 धावांचे आव्हान

21/10/2020,9:14PM
Picture

कोलाकाताला सातवा धक्का

21/10/2020,8:51PM
Picture

कोलकाताला सहावा धक्का

21/10/2020,8:35PM
Picture

कोलकाताचा अर्धा संघ तंबूत

21/10/2020,8:18PM
Picture

कोलकाता 4 ओव्हरनंतर

21/10/2020,7:56PM
Picture

कोलकाताला चौथा धक्का

21/10/2020,7:56PM
Picture

कोलकाताची तिसरी विकेट

21/10/2020,7:55PM
Picture

कोलकाताने गमावले झटपट 2 विकेट्स

21/10/2020,7:41PM
Picture

कोलकाताला पहिला धक्का

21/10/2020,7:41PM
Picture

कोलकाताच्या बॅटिंगला सुरुवात

21/10/2020,7:37PM
Picture

दोन्ही संघांचे अंतिम 11 खेळाडू

21/10/2020,7:37PM
Picture

बंगळुरुचे अंतिम 11 खेळाडू

21/10/2020,7:36PM
Picture

कोलकाता प्लेइंग इलेव्हन

21/10/2020,7:36PM
Picture

कोलकाताने टॉस जिंकला

21/10/2020,7:35PM

प्लेऑफच्या दृष्टीने हा सामना कोलकाता आणि बंगळुरु या दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे. पॉइंट्सटेबलमध्ये बंगळुरु आणि कोलकाता अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत. बंगळुरुचे एकूण 12 तर कोलकाताचे 10 पॉइंट्स आहेत. प्लेऑफच्या अंतिम 4 मध्ये पोहचण्यासाठी हा विजय मिळवण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असणार आहे. मात्र कोणता संघ कोणावर वरचढ ठरणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

हेड 2 हेड

आयपीएलमध्ये आतापर्यंत कोलकाता आणि बंगळुरु एकूण 25 सामन्यात आमनेसामने भिडले आहेत. यापैकी बंगळुरुने 11 सामन्यात विजय मिळवला आहे. तर कोलकाताने बंगळुरुवर 14 सामन्यात मात केली आहे. या मोसमात झालेल्या याआधीच्या सामन्यात बंगळुरुने कोलकाताचा पराभव केला होता.

कोलकाता नाइट राइडर्स : इयोन मॉर्गन (कर्णधार), शुभमन गिल, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल, कुलदीप यादव, लॉकी फर्ग्यूसन, पॅट कमिन्स, वरुण चक्रवर्ती, सुनील नारायण, टॉम बेंटन, सिद्धेश लाड, कमलेश नागरकोटी, प्रसिद्ध कृष्णा, संदीप वॉरियर, शिवम मावी, रिंकू सिंह, ख्रिस ग्रीन, एम सिद्धार्थ आणि निखिल नाईक

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु : विराट कोहली (कर्णधार), एबी डीव्हिलियर्स, पार्थिव पटेल, अॅरॉन फिंच, जोश फिलिप, ख्रिस मॉरिस, मोईन अली, मोहम्मद सिराज, शाहबाज अहमद, देवदत्त पडिक्कल, युजवेंद्र चहल, नवदीप सैनी, डेल स्टेन, पवन नेगी, इसुरु उदाना, शिवम दुबे, उमेश यादव, गुरकीरत सिंह मान, वॉशिंग्टन सुंदर, पवन देशपांडे कर्णधार अॅडम झॅम्पा.

संबंधित बातम्या :

IPL 2020, RCB vs KKR : बंगळुरुकडून कोलकाताचा 82 धावांनी धुव्वा

IPL 2020 KKR vs RCB Live Score Update Today Cricket Match Kolkata Knight Riders vs Royal Challengers Banglore Live

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *