IPL 2020, MI vs DC : सूर्यकुमार यादव-क्विंटन डी कॉकची अर्धशतकी खेळी, मुंबईची दिल्लीवर 5 विकेट्सने मात

या विजयासह मुंबई इंडियन्स पॉइंट्सटेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहचली आहे. | (Mumbai Indians Beat Delhi Capitals By 5 Wickets)

IPL 2020, MI vs DC  : सूर्यकुमार यादव-क्विंटन डी कॉकची अर्धशतकी खेळी, मुंबईची दिल्लीवर 5 विकेट्सने मात
Follow us
| Updated on: Oct 16, 2020 | 1:01 PM

अबुधाबी : मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) विजयीरथ रोखला आहे. शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेल्या सामन्यात मुंबइने दिल्लीवर 5 विकेट्सने मात केली आहे. दिल्लीने मुंबईला विजयासाठी 163 धावांचे आव्हान दिले होते. मुंबईने हे आव्हान 19.4 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून पूर्ण केले. मुंबईने 166 धावा केल्या. मुंबईकडून सूर्यकुमार यादव आणि क्विटंन डी कॉक या दोघांनी अर्धशतकी खेळी केली. दिल्लीकडून खगिसो रबाडाने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. (Mumbai Indians Beat Delhi Capitals By 5 Wickets)

विजयी आव्हानाचे पाठलाग करायला आलेल्या मुंबईची सावध सुरुवात झाली. मुंबईने पहिल्या विकेटसाठी 31 धावा जोडल्या. रोहित शर्मा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात 5 धावांवर आऊट झाला. यानंतर सूर्यकुमार यादव मैदानात आला. डी कॉकने यादवच्या मदतीने स्कोअरकार्ड धावता ठेवला. क्विंटन डी कॉकने काही फटके लगावले. यादरम्यान त्याने आपले अर्धशतक पूर्ण केलं. मात्र अर्धशतक पूर्ण झाल्यावर क्विंटन 53 धावावंर बाद झाला. क्विंटनने या खेळीत 3 सिक्स 4 फोर लगावले.

यानंतर सूर्यकुमार यादवने इशान किशनसोबत तिसऱ्या विकेटसाठी 53 धावांची भागीदारी केली. यामध्ये सूर्यकुमार यादवने धमाकेदार खेळी करत आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र यादवही अर्धशतक झाल्यानंतर बाद झाला. यादवने 32 चेंडूच 53 धावा केल्या. यामध्ये त्याने 1 सिक्स 6 फोर लगावले. सूर्यकुमार पाठोपाठ काही बॉलनंतर बर्थडे बॉय हार्दिक पांड्या शून्यावर बाद झाला. त्यामुळे मुंबईची परिस्थिती 130-4 अशी झाली. दोन महत्वाचे विकेट मिळवल्याने दिल्लीने सामन्यात पुनरागमन केले.

यानंतर इशान किशन आणि किरन पोलार्डने मुंबईला विजयापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला. मात्र इशान किशन फटकेबाजीच्या प्रयत्नात बाद झाला. किशनने 15 चेंडूत ताबडतोड 28 धावांची खेळी केली. यात त्याने 2 सिक्स आणि 2 फोर लगावले. मुंबईला अखेर किरन पोलार्ड आणि कृणाल पांड्या जोडीने विजय मिळवून दिला. पोलार्ड आणि कृणालने अनुक्रमे नाबाद 11 आणि 12 धावा केल्या. दिल्लीकडून खगिसो रबाडाने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर अक्षर पटेल, रवीचंद्रन आश्विन आणि मार्कस स्टोनिसने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

त्याआधी दिल्लीने टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 162 धावा केल्या. दिल्लीकडून सलामीवीर ‘गब्बर’ शिखर धवनने नाबाद 69 धावांची खेळी केली. तर कर्णधार श्रेयस अय्यरने 42 धावा केल्या. मुंबईकडून कृणाल पांड्याने 2 तर ट्रेन्ट बोल्टने 1 विकेट घेतली.

बॅटिंगसाठी आलेल्या दिल्लीची निराशाजनक सुरुवात झाली. पृथ्वी शॉ अवघ्या 4 धावांवर बाद झाला. मराठमोळ्या अजिंक्य रहाणेला आज संघात स्थान देण्यात आले. पृथ्वीनंतर रहाणे मैदानात आला. रहाणेला चांगली सुरुवात मिळाली. मात्र रहाणेला त्या खेळीचं मोठ्या आकड्यात रुपांतर करता आले नाही. रहाणे 15 धावांवर बाद झाला.

यानंतर शिखर धवन आणि कर्णधार श्रेयस अय्यरने दिल्लीचा डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 85 धावांची भागीदारी केली. यादरम्यान गब्बरने आपले अर्धशतक पूर्ण केलं. दिल्लीला 109 धावांवर तिसरा धक्का लागला. श्रेयस अय्यर 42 धावावंर बाद झाला. मार्क्स स्टोयनिस चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद झाला. स्टोयनिस 13 धावावंर रनआऊट झाला. यानंतर धवनने अॅलेक्स कॅरीच्या सोबतीने दिल्लीला 162 धावांपर्यंत पोहचवले. मुंबईकडून कृणाल पांड्याने 2 तर ट्रेन्ट बोल्टने 1 विकेट घेतली.

[svt-event title=”मुंबईने दिल्लीचा विजयीरथ रोखला” date=”11/10/2020,11:06PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईला 6 बॉलमध्ये 7 धावांची आवश्यकता” date=”11/10/2020,11:01PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईला पाचवा धक्का” date=”11/10/2020,10:52PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईला विजयासाठी 3 ओव्हरमध्ये 18 धावांची आवश्यकता” date=”11/10/2020,10:48PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबई 16 ओव्हरनंतर” date=”11/10/2020,10:43PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सूर्यकुमारनंतर हार्दिक पांड्या शून्यावर बाद” date=”11/10/2020,10:38PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सूर्यकुमार यादव आऊट” date=”11/10/2020,10:34PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सूर्यकुमार यादवचे अर्धशतक ” date=”11/10/2020,10:32PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईला दुसरा धक्का” date=”11/10/2020,10:11PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”क्विंटन डी कॉकचे अर्धशतक” date=”11/10/2020,10:03PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबई 8 ओव्हरनंतर” date=”11/10/2020,9:57PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हिटमॅन आऊट, मुंबईला पहिला धक्का” date=”11/10/2020,9:44PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबई 1 ओव्हरनंतर” date=”11/10/2020,9:29PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईच्या बॅटिंगला सुरुवात” date=”11/10/2020,9:23PM” class=”svt-cd-green” ] राजस्थानने मुंबईला विजयासाठी 163 धावांचे आव्हान दिले आहे. [/svt-event]

[svt-event title=”मुंबईला विजयासाठी 163 धावांचे आव्हान” date=”11/10/2020,9:12PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्ली 19 ओव्हरनंतर” date=”11/10/2020,9:08PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मार्कस स्टोयनिस रनआऊट” date=”11/10/2020,8:55PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”‘गब्बर’ अर्धशतक” date=”11/10/2020,8:48PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”श्रेयस अय्यर आऊट” date=”11/10/2020,8:41PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीच्या 100 धावा पूर्ण” date=”11/10/2020,8:36PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्ली 12 ओव्हरनंतर ” date=”11/10/2020,8:31PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”10 ओव्हरनंतर दिल्लीचा स्कोअर” date=”11/10/2020,8:24PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”धवन-अय्यरने दिल्लीचा डाव सावरला ” date=”11/10/2020,8:24PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पावरप्लेच्या 6 ओव्हरनंतर दिल्ली” date=”11/10/2020,8:02PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीचा 5 ओव्हरनंतर स्कोअर” date=”11/10/2020,7:58PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीला दुसरा झटका” date=”11/10/2020,7:54PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीची पहिली विकेट ” date=”11/10/2020,7:32PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”असे आहेत दोन्ही संघाचे अंतिम 11 खेळाडू” date=”11/10/2020,7:32PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीचे अंतिम 11 खेळाडू” date=”11/10/2020,7:31PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबई प्लेइंग इलेव्हन” date=”11/10/2020,7:31PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीने टॉस जिंकला ” date=”11/10/2020,7:30PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

मुंबई आणि दिल्ली हे दोन्ही संघ आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील यशस्वी संघ ठरले आहेत. दिल्ली 10 पॉइंट्ससह पहिल्या तर मुंबई 8 पॉइंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात दिल्लीसमोर अव्वल क्रमांक कायम ठेवण्याचं आव्हान असणार आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात मुंबई आणि दिल्लीत काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. दिल्लीने यंदाच्या मोसमात 6 पैकी 5 सामन्यात विजय मिळवला आहे. तर मुंबईने 5 सामने खेळले आहेत. त्यापैकी 4 सामन्यात मुंबईचा विजय झाला आहे.

दोन्ही संग तुल्यबळ

आयपीएलमध्ये मुंबई आणि दिल्ली हे आतापर्यंत एकूण 24 वेळा आमनेसामने भिडले आहेत. यापैकी दोन्ही संघाने निम्मे म्हणजे प्रत्येकी 12-12 सामने जिंकले आहेत. त्यामुळे दोन्ही संघ तुल्यबळ आहेत.

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), आदित्य तरे, अनमोलप्रीत सिंह, अनुकूल रॉय, ख्रिस लिन, धवल कुलकर्णी, दिग्विजय देशमुख, हार्दिक पांड्या, ईशान किशन, जेम्स पेटिन्सन, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, किरोन पोलार्ड, कृणाल पांड्या, मिचेल मॅक्लेनघन, मोहसिन खान, नॅथन कूल्टर नाइल, प्रिंस बलवंत राय, क्विंटन डी कॉक, राहुल चहर, सौरभ तिवारी, शेरफेन रुदरफोर्ड, सूर्यकुमार यादव आणि ट्रेन्ट बोल्ट.

दिल्ली कॅपिटल्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), रविचंद्रन अश्विन, शिखर धवन, पृथ्वी शॉ, शिमरॉन हेटमायर, खगिसो रबाडा, अजिंक्य रहाणे, अमित मिश्रा, ऋषभ पंत, ईशांत शर्मा, अक्षर पटेल, संदीप लमिछाने, किमो पॉल, डॅनियल सॅम्स, मोहित शर्मा, एनरिक नोर्तजे, अॅलेक्स कॅरी, अवेश खान, तुषार देशपांडे, हर्षल पटेल, मार्कस स्टोयनिस आणि ललित यादव.

संबंधित बातम्या :

IPL 2020, SRH vs RR Live : हैदराबादच्या बॅटिंगला सुरुवात, जॉनी बेयरस्टो-डेव्हिड वॉर्नर सलामी जोडी मैदानात

(Mumbai Indians vs Delhi Capitals Live)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.