IPL 2020, CSK vs MI : ‘यॉर्करकिंग’ जसप्रीत बुमराहला अफलातून रेकॉर्डची संधी

बुमराहने आयपीएलच्या या मोसमात आतापर्यंत धमाकेदार कामगिरी केली आहे.

IPL 2020, CSK vs MI : 'यॉर्करकिंग' जसप्रीत बुमराहला अफलातून रेकॉर्डची संधी
Follow us
| Updated on: Oct 23, 2020 | 7:04 PM

शारजा : आयपीएलच्या 13 व्या (IPL 2020) मोसमातील 41 वा सामना आज (23 ऑक्टोबर) खेळला जाणार आहे. हा सामना चेन्नई सुपर किंग्जस (Chennai Super Kings) विरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात खेळला जाणार आहे. या सामन्यात चेन्नईची ‘करो या मरो’ची परिस्थिती असणार आहे. या सामन्यात मुंबईचा यॉर्करकिंग बोलर जसप्रीत बुमराहला विक्रम करण्याची संधी आहे. IPL 2020 Mumbai Indians Jaspreet Bumrah Has a Chance To Take 100 Wickets IN IPL And 200 Wickets IN T20 Cricket

विकेट्सच्या शतक आणि द्विशतकाची संधी

जसप्रीत बुमराहला आयपीएलमध्ये 100 तर टी 20 मधील 200 विकेट्स घेण्याची संधी आहे. बुमराहने आतापर्यंत एकूण 166 टी-20 सामन्यात 197 विकेट्स घेतल्यात आहेत. तर आयपीएलमध्ये 86 सामन्यात 97 विकेट्स घेतल्या आहेत. या विक्रमापासून बुमराह केवळ 3 विकेट्स दूर आहे. त्यामुळे चेन्नईविरुद्धच्या या सामन्यात 3 विकेट्स घेतल्यास बुमराहचे एकच वेळेस विकेट्सचे शतक आणि द्विशतक पूर्ण होईल.

बुमराहची आयपीएल कारकिर्द

जसप्रीत बुमराहने 2013 मध्ये मुंबई इंडियन्सकडून पदार्पण केलं. बुमराहने आतापर्यंत 86 सामन्यात एकूण 97 विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत बुमराह 17 व्या क्रमांकावर आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत लसिथ मलिंगा, ड्वेन ब्राव्हो, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, आशीष नेहरा, झहीर खान आणि आर विनय कुमार या वेगवान गोलंदाजांनीच 100 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.

बुमराहची यंदाच्या मोसमातील कामगिरी

बुमराहने आयपीएलच्या या मोसमात आतापर्यंत धमाकेदार कामगिरी केली आहे. बुमराहने या मोसमातील 9 सामन्यात 15 विकेट्स घेतल्या आहे. ट्रेन्ट बोल्ट आणि बुमराह हे दोघे दमदार गोलंदाजी करत आहेत. या जोडीने आतापर्यंत 27 विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये बुमराहने 18 च्या सरासरीने 15 विकेट्स घेतल्या आहेत. बुमराहने 20 धावा देत 4 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. ही त्याची सर्वोतकृष्ठ कामगिरी आहे.

सर्वाधिक विकेट्स

आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम लसिथ मलिंगाच्या नावावर आहे. मलिंगाने 122 सामन्यात 170 विकेट्स घेतल्या आहेत. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर अमित मिश्रा आहे. मिश्राने 150 मॅचेसमध्ये 160 बळी घेतल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर पीयूष चावला आहे. चावलाने 164 सामन्यात 156 फलंदाजांना माघारी धाडलं आहे.

संबंधित बातम्या :

IPL 2020, CSK vs MI Live : चेन्नई सुपर किंग्जसला मुंबई इंडियन्सचे तगडे आव्हान

IPL 2020 Mumbai Indians Jaspreet Bumrah Has a Chance To Take 100 Wickets IN IPL And 200 Wickets IN T20 Cricket

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.