AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2021 : आयपीएलच्या पहिल्या दोन मॅचमध्ये भारताचे दोन दिग्गज खेळाडू जखमी, भारताची डोकेदुखी वाढली!

दिल्ली कॅपिटल आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्यापूर्वी इशांत शर्माही अनफिट असल्याची माहिती आहे. (IPL 2021 CSK vs DC Ishant Sharma Injured Before CSK Match)

IPL 2021 : आयपीएलच्या पहिल्या दोन मॅचमध्ये भारताचे दोन दिग्गज खेळाडू जखमी, भारताची डोकेदुखी वाढली!
इशांत शर्मा अनफिट
Akshay Adhav
Akshay Adhav | Updated on: Apr 11, 2021 | 10:37 AM
Share

नवी दिल्ली : आयपीएलच्या 14 व्या पर्वाला (IPL 2021) सुरु होऊन दोन दिवस झाले आहेत आणि दोन दिवसांत भारतीय क्रिकेट संघासाठी दोन वाईट बातम्या आहेत. या बातम्या टीम इंडियाच्या खेळाडूंच्या दुखापतीशी संबंधित आहे. पहिल्या दिवशी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royals Challengers Banglore) यांच्यातील सामन्यादरम्यान हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) खांद्याच्या दुखापतीमुळे त्रस्त होता. आता दिल्ली कॅपिटल आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्यापूर्वी इशांत शर्माही (Ishant Sharma) अनफिट असल्याची माहिती आहे. (IPL 2021 CSK vs DC Ishant Sharma Injured Before CSK Match)

इशांत शर्माला दुखापत झाली आहे. त्यामुळे इशांत शर्मा चेन्नई विरुद्ध दिल्लीच्या पहिल्या सामन्यात खेळू शकला नाही. गेल्यावर्षीच्या आयपीएलमध्येही तो जखमी झाला होता. यानंतर त्याने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून पुनरागमन केले. 13 व्या आयपीएल हंगामात हॅमस्ट्रिंगच्या तणावामुळे स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर इंशात शर्माही टीम इंडियाबरोबर ऑस्ट्रेलिया दौर्‍याचा भाग नव्हता.

दिल्ली कॅपिटल्सच्या कॅम्पमधून मिळालेल्या माहितीनुसार, इशांत शर्मा पूर्णपणे फिट नाही. यामुळे चेन्नईविरुद्धच्या सामन्यात त्याचा समावेश झाला नाही. तो सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये आला नव्हता. तो टीम ज्या हॉटेलमध्ये वास्तव्यास आहे त्याच हॉटेलमध्ये राहिला. आयपीएल 2020 मध्ये इशांतला हॅमस्ट्रिंगच्या ताणामुळे स्पर्धा मध्यभागी सोडली गेली होती. उमेश यादवही दुखापतीच्या कारणास्तव दि्लीच्या टीममध्ये खेळू शकला नाही, अशी चर्चा आहे.

दोन प्रसंग, हार्दिक पांड्या फिट नसल्याचं समोर

आयपीएल 2021 च्या (IPL2021) पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) अनफिट दिसला. मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (MI vs RCB) यांच्यातील सामन्यादरम्यान फिल्डिंग करताना तो नीटपणे थ्रो देखील करु शकत नव्हता.  हार्दिक पांड्या अनफिट आहे हे सातव्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर ठळकपणे जाणवलं. क्रुणाल पंड्याच्या बोलिंगवर विराट कोहलीने खेळपट्टीच्या बाजूला बॉल टोलवला आणि धाव घेण्यासाठी ग्लेन मॅक्सवेलला इशारा केला परंतु मॅक्सवेलने नकार दिला. याचदरम्यान विराट कोहली क्रीजच्या फार पुढे आला होता. आपण रनआऊट होणार हे कोहलीला किंबहुना लक्षात आलं होतं. बॉल हार्दिक पांड्याकडे गेला होता. मात्र त्याला व्यवस्थित थ्रो टाकता न आल्याने कर्णधार कोहली आरामात क्रीजवर पोहोचला. हार्दिकने जर उत्तम थ्रो मारला असता तर कोहली आऊट झाला असता. कदाचित सामन्याचा निकाल काही वेगळा दिसला असता.

आरसीबीच्या डावाच्या आठव्या षटकातील तिसर्‍या चेंडूवर हार्दिक पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याचे पुन्हा दिसून आले. राहुल चहरच्या चेंडूवर कोहलीने स्लिप आणि शॉर्ट थर्ड मॅन दरम्यान शॉट मारला. चेंडू हार्दिककडे गेला आणि तो चेंडू वेळेवर फेकू शकला नाही. त्याने पहिल्यांदा रोहितला बॉल फेकला आणि रोहितने मग इशान किशनकडे बॉल फेकला.

(IPL 2021 CSK vs DC Ishant Sharma Injured Before CSK Match)

हे ही वाचा :

IPL 2021 : चेन्नईचा 7 विकेट्सने धुव्वा, ‘यांच्यामुळे’ पराभव झाला म्हणत धोनी भडकला!

IPL 2021 : MS धोनी आला तसा गेला, ‘खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरचं टेकऑफ नाही’, सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस!

IPL 2021 : सॅम vs टॉम, सख्ख्या भावाने सख्ख्या भावाला तुडवला, 6 बॉलमध्ये 23 धावा झोडल्या!

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?