AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2021 : विराट कोहलीला हरवलेला खेळाडू सापडला, 8 वर्षानंतर कोहिनूर हिरा मैदानात उतरला!

डॅनियल याअगोदर 8 वर्षांपूर्वी आरसीबीकडून खेळला होता. दरम्यान आता 8 वर्षानंतर आरसीबीचा कोहिनूर हिरा पुन्हा एकदा विराटच्या साथीने मैदानात उतरला. (IPL 2021 Mi vs RCB Daniel Christain Playing In RCB Virat Kohli)

IPL 2021 : विराट कोहलीला हरवलेला खेळाडू सापडला, 8 वर्षानंतर कोहिनूर हिरा मैदानात उतरला!
Daniel Christain
| Updated on: Apr 10, 2021 | 11:37 AM
Share

चेन्नई :  इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या मोसमाची (IPL 2021) सुरुवात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Banglore) विरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्या सलामीच्या सामन्याने झाली. टॉस जिंकल्यानंतर आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यावेळी जेव्हा त्याला आरसीबीच्या प्लेइंग इलेव्हन बद्दल विचार गेलं तेव्हा त्याने असं एक नाव घेतलं ज्या नावाने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला, ते नाव होतं, अष्टपैलू खेळाडू डॅनियल क्रिस्चियन (Daniel Christain) याचं… डॅनियल याअगोदर 8 वर्षांपूर्वी आरसीबीकडून खेळला होता. दरम्यान आता 8 वर्षानंतर आरसीबीचा कोहिनूर हिरा पुन्हा एकदा विराटच्या साथीने मैदानात उतरला. (IPL 2021 Mi vs RCB Daniel Christain Playing In RCB Virat Kohli)

आयपीएल 2021 च्या हंगामात मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सलामीच्या सामन्यापूर्वी डॅनियलने आयपीएल लीगमध्ये 40 सामने खेळले आहेत. त्यापैकी 17.84 च्या सरासरीने आणि 119. 25 च्या स्ट्राईक रेटने त्याने 446 धावा काढल्या आहेत. तसंच बोलिंगमध्येही शानदार प्रदर्शन करताना त्याने 34 विकेट्सही मिळवल्या आहेत.

डॅनियलने यापूर्वी 2011, 2012, 2013, 2017 आणि 2018 या वर्षांत आयपीएलमध्ये भाग घेतला होता. डॅनियलने 2013 साली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघात भाग घेतला होता. त्यावेळी त्याने संघासाठी फक्त दोन सामने खेळले.

डॅनियलची आयपीएल मधील कामगिरी

2011 मध्ये त्याने 14 सामन्यांत 11 आणि 2012 मध्ये 7 सामन्यात 8 विकेट्स घेतल्या. 2013 मध्ये त्याला फक्त दोन सामने खेळण्याची संधी मिळाली ज्यात त्याला एकही विकेट मिळू शकली नाही. 2017 मध्ये डॅनियलने 13 सामन्यांत 11 गडी बाद केले होते, तर 2018 मध्ये 4 सामन्यात त्याने 4 फलंदाजांची शिकार केली होती.

ऑस्ट्रेलियाकडून खेळताना डॅनियलची कामगिरी

डॅनियलने ऑस्ट्रेलियाकडून 19 एकदिवसीय सामन्यात २73 धावा केल्या आहेत तसंच त्याच्या नावावर 20 बळींचीही नोंद आहे. त्याचबरोबर त्याने ऑस्ट्रेलियाकडून 16 टी ट्वेन्टी सामन्यांत 11 बळी घेतले आहेत.

(IPL 2021 Mi vs RCB Daniel Christain Playing In RCB Virat Kohli)

हे ही वाचा :

IPL 2021 : मॅक्सवेलचा गगनचुंबी षटकार स्टेडियमच्या बाहेर, विराट कोहलीही हैरान, दिली ‘अशी’ रिअॅक्शन! पाहा व्हिडीओ

IPL 2021 : RCB च्या 7 फूट उंचीच्या बोलर्सने मुंबईकर क्रुणाल पांड्याची बॅट तोडली, फॅन्स म्हणाले, ‘बचके रहेना रे…!’

IPL 2021 : पहिल्याच मॅचमध्ये विराट कोहलीला दुखापत, क्रुणाल पांड्याचा बॉल विराटच्या डोळ्यावर

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.