आयपीएल सामन्यांचा थरार सुरु, मात्र मोहम्मद शमीला खंत, सांगितली मनातली गोष्ट!

मैदानात प्रेक्षक असताना खेळण्याची मजा काही और असते. मात्र सध्या प्रेक्षकांविना सामने खेळावे लागत असतानाची भावना काही वेगळी आहे, अशी खंत मोहम्मद शमीने बोलून दाखवली आहे. | Mohammed Shami

आयपीएल सामन्यांचा थरार सुरु, मात्र मोहम्मद शमीला खंत, सांगितली मनातली गोष्ट!
मोहम्मद शमी

मुंबई : आयपीएलच्या 14 व्या पर्वाला (IPL 2021) 9 एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. आतापर्यंतच 8 सामने देखील खेळविण्यात आले आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदाही प्रेक्षकांना मैदानात उपस्थिती लावण्यावर बंदी आहे. म्हणजेच हे सामने खेळाडूंना प्रेक्षकांविना खेळावे लागत आहेत. हीच खंत पंजाब किंग्ज संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीने (Mohammed Shami) बोलून दाखवली आहे. (IPL 2021 CSK vs PBKS Mohammed Shami On Crowd Stadium No home advantage)

शुक्रवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पंजाब विरुद्ध चेन्नई यांच्यात स्पर्धेतील आठवा सामना पार पडला. एरवी वानखेडेवर सामना आहे म्हटलं की खेळाडूंमध्ये एक वेगळाच उत्साह संचारतो तसंच मुंबईमधील प्रेक्षकही मोठ्या संख्येने सामन्याला उपस्थिती लावतात. परंतु सध्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रेक्षकांना मैदानात परवानगी नाहीय. खेळाडूंच्या मनामध्ये देखील हीच खंत आहे.

मोहम्मद शमी काय म्हणाला…?

“मैदानात प्रेक्षक असताना खेळण्याची मजा काही और असते. प्रेक्षक खेळाडू आणि संघाला प्रोत्साहान देत असतात. त्यांच्या प्रोत्साहानामुळे कितीही नाही म्हटलं तरी खेळाडूंच्या कामगिरीवर थोडाफार परिणाम पडत असतो. सध्याच्या परिस्थितीत कोणत्याही संघाला होम अ‌ॅडव्हॅनटेज मिळणार नाही, हे त्यातल्या त्यात बरं आहे”, असं शमी म्हणाला.

चेन्नईचा पंजाबवर 6 विकेट्सने सहजरित्या विजय

चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super King) पंजाब किंग्सवर (Punjab Kings) 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. पंजाब किंग्सने चेन्नई सुपर किंग्सला विजयासाठी 107 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान चेन्नईने 15.4 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून पूर्ण केलं. चेन्नईकडून मोईने अलीने सर्वाधिक 46 धावांची खेळी केली. तर फॅफ डु प्लेसिसने नाबाद 36 धावांची खेळी केली.

तत्पूर्वी मोहम्मद शमीने एकाच ओव्हरमध्ये दोन विकेट्स मिळवून मॅचमध्ये रंगत आणण्याचा प्रयत्न केला. शमीने बॅक टू बॅक सुरैश रैना आणि अंबाती रायुडूला बाद केलं. परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता. सामना चेन्नईने अलगद खिशात टाकला. चार विकेट्स घेणारा चेन्नईचा दीपक चाहर चेन्नईच्या विजयाचा शिल्पकार ठरला.

(IPL 2021 CSK vs PBKS Mohammed Shami On Crowd Stadium No home advantage)

हे ही वाचा :

IPL 2021 : दीपक चाहर ठरला पंजाबचा कर्दनकाळ, धोनीला खास सामन्याचं खास गिफ्ट!

IPL 2021 | सामन्याआधी शमीच्या पाया पडला आणि मैदान गाजवलं, दीपक चहरची अफलातून गोलंदाजी

PBKS vs CSK IPL 2021, Match 8 Result | चेन्नई सुपर किंग्सचा पंजाबवर 6 विकेट्सने सहज विजय

Published On - 7:38 am, Sat, 17 April 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI