Ravindra Jadeja | ‘सर’ रवींद्र जाडेजाची वादळी खेळी, 20 व्या ओव्हरमध्ये चोपल्या 37 धावा, बंगळुरुला विजयासाठी 192 धावांचे आव्हान

बंगळुरु विरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सच्या रवींद्र जाडेजाने (Ravindra Jadeja) हर्षल पटेलच्या (harshal patel) गोलंदाजीवर 20 व्या ओव्हरमध्ये (20th over) 5 सिक्ससह 36 धावा चोपल्या.

Ravindra Jadeja | 'सर' रवींद्र जाडेजाची वादळी खेळी, 20 व्या ओव्हरमध्ये चोपल्या 37 धावा, बंगळुरुला विजयासाठी 192 धावांचे आव्हान
बंगळुरु विरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सच्या रवींद्र जाडेजाने (Ravindra Jadeja) हर्षल पटेलच्या (harshal patel) गोलंदाजीवर 20 व्या ओव्हरमध्ये (20th over) 5 सिक्ससह 36 धावा चोपल्या.
Follow us
| Updated on: Apr 25, 2021 | 6:37 PM

मुंबई | आयपीएलच्या 14 व्या मोसमातील (IPL 2021) 19 सामना चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royals Challengers Banglore) यांच्यात खेळवण्यात येत आहे. या सामन्यात पहिले बॅटिंग करताना चेन्नईचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाने (Ravindra Jadeja) कारनामा केला आहे. जाडेजाने सामन्यातील 20 व्या ओव्हरमध्ये 36 धावा चोपल्या आहेत. जाडेजाने केलेल्या या फटकेबाजीच्या जोरावर चेन्नईने बंगळुरुला विजयासाठी 192 धावांचे तगडे आव्हान दिले आहे. (ipl 2021 csk vs rcb ravindra jadeja hit 36 runs in 20th over on harshal patel bowling)

जाडेजाचा झंझावात

सामन्यातील 20 वी ओव्हर बंगळुरुचा पर्पल कॅप होल्डर हर्षस पटेल टाकायला आला. हर्षलने सर्वाधिक विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे हर्षलचा विश्वास दुणावलेला होता. मात्र जाडेजाने हर्षलचं सिक्सने स्वागत केलं. जाडेजाने सलग 4 सिक्स लगावले. जाडेजाने तिसऱ्या चेंडूवर षटकार खेचला. मात्र हा नो बोल देण्यात आला.

त्यामुळे चेन्नईला 1 अतिरिक्त धाव मिळाली. जाडेजाने या पुढच्या चेंडूवर सलग चौथा सिक्स लगावला. यासह जाडेजाने तुफानी अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर जाडेजाने 2 धावा घेतल्या. त्यानंतर पुन्हा त्याने 5 वा सिक्स खेचला. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर जाडेजाने चौकार लगावला. यासह जाडेजाने 28 चेंडूत 5 सिक्स आणि 4 चौकारांसह नाबाद 62 धावा ठोकल्या.

फॅफ डु प्लेसीसचे अर्धशतक

जाडेजा व्यतिरिक्त चेन्नईकडून सलामीवीर फॅफ डु प्लेसीसने 41 चेंडूत 5 चौकार आणि 1 सिक्ससह 50 धावांची अर्धशतकी खेळी केली. फॅफचे हे सलग दुसरं अर्धशतक ठरलं.

चेन्नई सामना जिंकणार

चेन्नई बंगळुरुचा विजय रथ रोखणार आहे, असं आम्ही नाही तर आकडेवारी म्हणतेय. चेन्नईने आतापर्यंत आयपीएलच्या इतिहासात 25 एप्रिलला कधीही सामना गमावलेला नाही. चेन्नईने आतापर्यंत 25 एप्रिलला 6 सामने खेळले आहेत. या सर्व सामन्यात चेन्नईने विजय मिळवला आहे. त्यामुळे या सामन्यात कोण जिंकणार, याबाबत सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

चेन्नईची प्लेइंग इलेव्हन

ऋतुराज गायकवाड, फॅफ डु प्‍लेसीस, ड्वेन ब्राव्हो, सुरेश रैना, अंबाती रायुडू, रवींद्र जाडेजा, एमएस धोनी (कर्णधार), सॅम करन, इमरान ताहीर, शार्दुल ठाकुर आणि दीपक चाहर.

अशी आहे विराटसेना

विराट कोहली (कर्णधार) , देवदत्‍त पडिक्‍कल, नवदीप सैनी, ग्‍लेन मॅक्‍सवेल, एबी डी व्हीलियर्स, डॅन ख्रिस्चियन, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, मोहम्‍मद सिराज, कायले जेमीन्सन आणि हर्षल पटेल.

संबंधित बातम्या :

IPL 2021 | ‘कॅप्टन कूल’ विराटसेनेचा विजयी रथ रोखणार, पाहा महेंद्रसिंह धोनी आणि 25 एप्रिलचं विजयी कनेक्शन

CSK VS RCB, IPL 2021 Match Prediction: धोनीची चेन्नई विजयी ‘चौकार’ मारणार की विराटची बंगळुरु ‘पंच’ मारणार?

(ipl 2021 csk vs rcb ravindra jadeja hit 36 runs in 20th over on harshal patel bowling)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.