AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2021 | आयपीएलच्या 14 व्या मोसमाच्या सुरुवातीआधीच वादाची ठिणगी, यजमानपद न मिळाल्याने फ्रँचायजींमध्ये नाराजी

आयपीएलच्या 14 व्या मोसमाचा (ipl 2021) थरार 9 एप्रिलपासून रंगणार आहे. या पर्वात एकूण 56 साखळी सामने खेळवण्यात येणार आहेत.

IPL 2021 | आयपीएलच्या 14 व्या मोसमाच्या सुरुवातीआधीच वादाची ठिणगी, यजमानपद न मिळाल्याने फ्रँचायजींमध्ये नाराजी
आयपीएलच्या 14 व्या मोसमाचा (ipl 2021) थरार 9 एप्रिलपासून रंगणार आहे. या पर्वात एकूण 56 साखळी सामने खेळवण्यात येणार आहेत.
| Updated on: Mar 08, 2021 | 3:10 PM
Share

मुंबई : आयपीएलच्या बहुप्रतिक्षित 14 व्या मोसमाच्या (IPL 2021) वेळापत्रकाची घोषणा रविवारी 7 मार्चला करण्यात आली. या हंगमाची सुरुवात येत्या 9 एप्रिलपासून होणार आहे. तर अंतिम सामना 30 मे ला खेळवण्यात येणार आहे. 14 व्या पर्वाचा थरार एकूण 51 दिवस रंगणार आहे. यादरम्यान 56 साखळी, 3 बाद फेरीतील सामने आणि अंतिम सामना असे एकूण 60 मॅचेस खेळवण्यात येणार आहेत. या मोसमात सर्व सामने हे त्रयस्थ ठिकाणी खेळवले जाणार आहेत. यामुळे कोणत्याही संघाला त्यांच्या होम ग्राऊंडचा फायदा मिळणार नाही. कोरोनामुळे साखळी फेरीतील सर्व सामन्यांचं आयोजन हे 6 शहरात करण्यात आलं आहे. तर 3 फ्रँचायजींना एकाही सामन्याच्या यजमानपदाचा मान मिळाला नाही. यामुळे या वेळापत्रकावरुन या फ्रँचायजींनी नाराजी व्यक्त केली आहे. (ipl 2021 franchise are unhappy about schedule)

3 फ्रँचायजींची नाराजी

चेन्नई, मुंबई, कोलकाता आणि बंगळुरुमध्ये प्रत्येकी 10-10 सामन्याचं आयोजन करण्यात आलं आहे. तर दिल्ली आणि अहमदाबादमध्ये प्रत्येकी 8-8 सामने खेळवण्यात पार पडणार आहेत. तर यावेळेस सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad), राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि पंजाब किंग्स (Punjab Kings) टीमच्या होम ग्राऊंडवर एकाही सामन्याचं आयोजन करण्यात आलेलं नाही. त्यामुळे या तिनही फ्रँचायजींना एकूण 6 स्टेडियममध्ये सर्व सामने खेळावे लागणार आहेत. यामुळे या निर्णयाबाबत तिन्ही फ्रँचायजींनी नाराजी व्यक्त केली आहे.

वेळापत्रकावरुन नाराजी

यातच एका फ्रँचायजीच्या अधिकाऱ्याने धोनीसंदर्भातही वक्तव्य केलं. ते अधिकारी क्रिकबजसोबत बोलत होते. ते म्हणाले की “अशा प्रकारच्या वेळापत्रकामुळे तुम्ही महेंद्रसिंह धोनीला चेन्नईत खेळण्यापासून रोखत आहात. या संपूर्ण सामन्यात प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येण्याची परवानगी नाही. तरीही मग मुंबई आणि चेन्नईला त्यांच्या होम ग्राऊंडवर खेळण्यापासून रोखण्याचं कारण काय”, असा प्रश्नही या अधिकाऱ्यांनी उपस्थित केला.

खेळाडूंना फायदाच होणार

“पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे आणि श्रेयस अय्यर हे तिनही खेळाडू आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व करतात. हे तिघेही खेळाडू मुंबईकर आहेत. तिघेही मुंबई संघासाठी स्थानिक क्रिकेट खेळतात. दिल्ली या मोसमातील पहिले 3 सामने मुंबईत खेळणार आहे. त्या प्रमाणेच पंजाब टीममध्ये असणारे केएल राहुल आणि मयंक अग्रवाल हे कर्नाटककडून स्थानिक क्रिकेट खेळतात. त्यामुळे त्यांनाही बंगळुरुमधील चिन्नास्वामी स्टेडियमबाबतची खडांखडा माहिती आहे. पंजाबही या मोसमातील पहिले 5 सामने हे याच स्टेडियमवर खेळणार आहे. त्यामुळे बीसीसीआयच्या होम स्टेडियमवर सामने न खेळवण्याच्या निर्णयाचा काहीच अर्थ राहत नाही,” असंही या अधिकाऱ्यानी नमूद केलं.

संबंधित बातम्या :

IPL 2021 Time Table | आयपीएलच्या 14 व्या मोसमाचं वेळापत्रक जाहीर, ‘या’ तारखेपासून रंगणार थरार

IPL 2021 Mumbai Indians Schedule | मुंबईकर ‘पलटण’ पहिल्या सामन्यात बंगळुरु विरुद्ध भिडणार, जाणून घ्या मुंबईच्या सामन्यांचे वेळापत्रक

(ipl 2021 franchise are unhappy about schedule)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.