AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : ख्रिस जॉर्डन नडला, प्रसिद्ध कृष्णा डोळ्यात डोळे घालून भिडला, वाचा मैदानावर नेमकं काय घडलं…?

भारताचा नवोदित गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा (Prasidh Krishna) इंग्लंडच्या ख्रिस जॉर्डनला (Chris jordan) डोळ्यात डोळे घालून भिडला, ते ही काहीच गरज नसताना...! (IPL 2021 KKR vs PBKS battle Between Prasidh krisha and Chris Jordan)

Video : ख्रिस जॉर्डन नडला, प्रसिद्ध कृष्णा डोळ्यात डोळे घालून भिडला, वाचा मैदानावर नेमकं काय घडलं...?
प्रसिद्ध कृष्णा आणि ख्रिसस जॉर्डन
| Updated on: Apr 27, 2021 | 9:32 AM
Share

मुंबई :  आयपीएलच्या 14 व्या पर्वातील (IPL 2021) 21 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्ज (Kolkata knight Riders vs Punjab Kings) या उभय संघांमध्ये पार पडला. या सामन्यात कोलकात्याने पंजाबला 5 विकेट्सने नमवून पराभवाची मालिका खंडित केली आणि शाहरुखच्या (Shahrukh Khan) चेहऱ्यावर हास्याची लकेर फुलवली. या सामन्यात विशेष लक्षवेधी घटना पाहायला मिळाली. कोलकात्याचा नवोदित गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा (Prasidh Krishna) पंजाबच्या ख्रिस जॉर्डनला (Chris jordan) डोळ्यात डोळे घालून भिडला, ते ही काहीच गरज नसताना…! (IPL 2021 KKR vs PBKS battle Between Prasidh krisha and Chris Jordan)

प्रसिद्धच्या बोलिंगवर जॉर्डनचे खणखणीत 2 षटकार

त्याचं झालं असं की जेव्हा ख्रिस जॉर्डनने प्रसिद्धला दोन खणखणीत षटकार खेचले तेव्हा प्रसिद्ध रागाने लालबंदु झाला होता. त्याला काय करावं ते कळत नव्हतं. मग पुनरागमन करत त्याने जॉर्डनला स्टम्पमध्ये बॉल टाकला. जॉर्डनकडून तो बॉल मिस झाला… झालं तर मग ‘यू मिस आय हिट’ या नियमाप्रमाणे बॉलने जॉर्डनचा स्टम्प उडवला आणि मग प्रसिद्धने जॉर्डनला डोळ्यात डोळे घालून उत्तर दिलं.

मैदानावर नेमकं काय झालं?

कोलकाता विरुद्ध पंजाब यांच्यातील सामन्यात पंजाब संघाच्या झटपट विकेट गेल्यानंतर रेड आर्मी पंजाबचा संघ १०० धावाही ओलांडू शकणार नाही, असं वाटत होतं. पण शेवटी, ख्रिस जॉर्डनने 18 चेंडूत 30 धावांची वेगवान खेळी केली आणि पंजाबच्या 123 धावा धावफलकावर लावल्या . जॉर्डनच्या खेळीत त्याने 3 उत्तुंग षटकार खेचले तर एक नजाकतीचा चौकार ठोकला. त्याने आपल्या डावातील शेवटचे दोन षटकार प्रसिद्ध कृष्णाच्या ओव्हरमध्ये मारले.

मैदानावर नेमकं काय घडलं?

जॉर्डनने प्रसिद्ध कृष्णाच्या शेवटच्या ओव्हरमध्ये पहिल्या आणि तिसर्‍या बॉलवर जोरदार षटकार ठोकले. यानंतर, ओव्हरच्या चौथ्या बॉलवर शानदार पुनरागमन करत जॉर्डनला क्लिन बोल्ड केलं. जॉर्डन खेळपट्टीवरुन जात असतानाबाहेर त्याच्याकडे नजर रोखून कृष्णा त्याला काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत राहिला. साहजिक जॉर्डननेही त्याला उत्तर दिलं. मात्र हे सगळं सुरु असताना कृष्णा किंवा जॉर्डन एका जागेवर थांबले नाहीच. ते आपापल्या दिशेने चालत होते. याचमुळे पुढील वाद टळला आणि जॉर्डन मैदानाबाहेर गेला.

(IPL 2021 KKR vs PBKS battle Between Prasidh krisha and Chris Jordan)

हे ही वाचा :

IPL 2021 : ‘अब हिंदी में मत बात कर’, धोनी-जाडेजाची स्टम्पमागून कॉमेन्ट्री, रैनाला हसू अनावर, नेमकं काय घडलं? वाचा किस्सा…

पाकिस्तानातून भारतासाठी प्रार्थना, शोएब मलिक म्हणतो, ‘अल्लाह भारतीयांना कोरोनाविरोधात लढण्यासाठी बळ दे…!’

IPL 2021 : आर. अश्विनच्या आयपीएल सोडण्याच्या निर्णयावर कोच रिकी पाँटिंगचं ट्विट, म्हणाला…

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.