IPL 2021 PBKS vs KKR Live Streaming: पंजाब विरुद्ध कोलकाता; सामना कधी, कुठे, केव्हा?

IPL 2021 Kolkata knight Riders vs punjab kings Live Streaming : आयपीएलच्या 14 व्या पर्वातील 20 वा सामना आज के एल राहुलच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्ज विरुद्ध ओयन मॉर्नगच्या नेतृत्वाखालील कोलकाता यांच्यात रंगणार आहे.

IPL 2021 PBKS vs KKR Live Streaming: पंजाब विरुद्ध कोलकाता; सामना कधी, कुठे, केव्हा?
PBKS vs KKR Live Streaming
Follow us
| Updated on: Apr 26, 2021 | 2:10 PM

अहमदाबाद : आयपीएलच्या 14 व्या पर्वातील (IPL 2021) 20 वा सामना आज के एल राहुलच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्ज विरुद्ध ओयन मॉर्नगच्या नेतृत्वाखालील कोलकाता (Kolkata Knight Riders vs Punjab Kings) यांच्यात रंगणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळविण्यात येणार आहे. या मोसमातील पहिलीच मॅच या स्टेडियमवर होणार आहे. पंजाबने विजयी सलामी देत या स्पर्धेची सुरुवात केली होती. मात्र नंतरच्या सलग तीन सामन्यांत त्यांना पराभवाचं तोंड पाहायला लागलं. तर इंग्लंडचा कर्णधार ओयन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील कोलकाता संघ चमकदार कामगिरी करण्यात सातत्याने अपयशी ठरतोय. (IPL 2021 Kolkata knight Riders vs punjab kings Live Streaming When And Where To watch online in marathi 26 April)

पुनरागमन करण्यास दोन्ही संघ सज्ज

कोलकाता नाइट रायडर्सने आतापर्यंतच्या पाच सामन्यांपैकी केवळ एक सामना जिंकला आहे, दुसरीकडे पंजाब किंग्जने पाचपैकी दोन सामने जिंकले आहेत. अशा स्थितीत दोन्ही संघांना अहमदाबादच्या सामन्यात विजय मिळवून आपली गाडी राईट ट्रॅकवर आणण्याची इच्छा आहे.

मिडल ऑर्डर बॅट्समन- कोलकात्यासमोरची सगळ्यात मोठी चिंता

कोलकात्याची सर्वात मोठी चिंता ही त्यांची फलंदाजांची मधली फळी आहे, जी मोठी धावसंख्या काढण्यात अपयशी ठरली आहे. कोलकाताचा कर्णधार ओयन मॉर्गन देखील धावा करण्यात अपयशी ठरला आहे. त्याने आतापर्यंत पाच सामन्यांत केवळ 45 धावा केल्या आहेत. शेवटच्या सामन्यात तो खातेही न उघडताच बाद झाला.

राहुलची बॅट तळपणार?

पंजाबची बॅटिंग लाईनअप मजबूत आहे आणि संघाच्या वतीने सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या खेळाडूंमध्ये कर्णधार लोकेश राहुलचा समावेश आहे तर मयांक अग्रवाल, ख्रिस गेल, निकोलस पूरनकडून आजच्या सामन्यात संघाला मोठ्या अपेक्षा असतील.

सामना कधी आणि कुठे…?

पंजाब किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (PBKS vs Kolkata Knight Riders) यांच्यातील सामना आज 26 एप्रिल रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळविण्यात येणार आहे.

सामना किती वाजता सुरु होणार?

भारतीय वेळेनुसार सामना ठीक 3.30 वाजता सुरु होईल. सामन्याच्या अर्धा तास अगोदर म्हणजेच ठीक 3 वाजता सामन्याच्या टॉस होईल.

लाईव्ह मॅच कुठे बघायला मिळेल?

पंजाब किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (PBKS vs Kolkata Knight Riders) यांच्यातील सामन्याचं थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर तुम्हाला बघायला मिळेल.

लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे बघायचं?

तुम्ही लाईव्ह स्ट्रीमिंग डिज्नी + हॉटस्टारवरही बघू शकता. तसंच प्रत्येक ओव्हर्सची अपडेट्स, मॅचची अपडेट तुम्ही tv9marathi.com या वेबसाईटला देखील पाहू शकता.

(IPL 2021 Kolkata knight Riders vs punjab kings Live Streaming When And Where To watch online in marathi 26 April)

हे ही वाचा :

IPL 2021 : आर अश्विनचा आयपीएल स्पर्धा सोडण्याचा निर्णय, ट्विट करुन घोषणा, दिल्लीला धक्का!

IPL 2021: आयपीएलला मध्येच गुडबाय, रॉयल चॅलेंजर्सचे दोन खेळाडू मायदेशी परतले, कारण…

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.