IPL 2021 : ‘दुनिया हिला देंगे हम’, मुंबईची पलटन सज्ज, सहाव्यांदा चॅम्पियन बनणार?

मुंबईच्या संघात प्रत्येक खेळाडू हा मॅचविनर आहे. प्रत्येक खेळाडूच्या बॅटमध्ये एवढी ताकद आहे की ते गेलेला सामना देखील एकहाती फिरवू शकतात. तसंच प्रतिस्पर्धी संघाला मुंबईच्या घातक गोलंदाजीला देखील तोंड द्यायचं आहे.

IPL 2021 : 'दुनिया हिला देंगे हम', मुंबईची पलटन सज्ज, सहाव्यांदा चॅम्पियन बनणार?
मुंबईच्या संघात दिग्गज खेळाडूंचा भरणा आहे.

मुंबई : अगदी तीन दिवसांवर आयपीएलचा 14 वा हंगाम (IPL 2021) येऊन ठेपला आहे. येत्या 9 एप्रिलला मुंबई विरुद्ध बंगळुरु संघ आमने सामने असणार आहे. सगळ्या संघांची अंतिम तयारी पार पडली आहे. इकडे आयपीएल जेतेपदाची हॅट्रिक पटकवण्यासाठी मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) टीम आतुर झाली आहे. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही फॉरमॅटमध्ये इतर सगळ्या संघांपेक्षा मुंबईची टीम वरचढ मानली जात आहे. त्यामुळे रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सची टीम आयपीएलच्या इतिहासातील सहाव्यांदा तर सलग तिसऱ्यांदा आयपीएलचं जेतेपद मिळवणार का? अशा चर्चा आता क्रिकेट रसिकांच्या ओठांवर आहेत. (IPL 2021 Mumbai indians Team Profile MI become champion for the sixth time?)

मुंबईच्या संघात प्रत्येक खेळाडू हा मॅचविनर आहे. प्रत्येक खेळाडूच्या बॅटमध्ये एवढी ताकद आहे की ते गेलेला सामना देखील एकहाती फिरवू शकतात. मुंबईकडे 7 बिग हिटर असल्याने त्यांना धावांचा पाठला करणं किंवा धावांचा डोंगर बनवणं अवघड जाणार नाही. तसंच गोलंदाजीसाठी जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट आणि नॅथन कुल्टरनाईल ही जगातील घातक गोलंदाजी प्रतिस्पर्धी संघाना फेस करायची आहे.

मुंबई इंडियन्सची बॅटिंग लाईनअप

संघाचं सर्वात मोठं सामर्थ्य आहे कर्णधार रोहित शर्मा आणि संघाची उत्तम फलंदाजी. संघातील जवळपास प्रत्येक फलंदाज स्वतः मॅच विनर आहे. रोहित शर्मा, क्विंटन डिकॉक, हार्दिक पंड्या आणि क्रुणाल पांड्या यांच्या फलंदाजीची तर बातच न्यारी… तसंच सूर्य कुमार, इशान किशन यांनीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. द्विगुणीत झालेल्या आत्मविश्वाससह किशन आणि सुर्यकुमार फटकेबाजी करण्यास आसुलेले आहेत. तसंच कायरन पोलार्ड तर कोणत्याही परिस्थितीत दोन हात करण्यास सज्ज असतो. कितीही अवघड परिस्थिती असली तरीही पोलार्ड त्यातून मुंबईला अलगद बाहेर काढू शकतो, एवढी ताकद त्याच्या बॅटमध्ये आहे.

बुमराह, ट्रेंट बोल्ट आणि कुल्टर नाईल, जगातले घातक गोलंदाज, साथीला चावलाची फिरकी

नुकताच लग्नबंधनात अडकलेला यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह आयपीएलच्या रणसंग्रामासाठी सज्ज झाला आहे. 2013 पासून तो मुंबईकडून खेळतो आहे. पाठीमागच्या मोसमात त्याने मुंबईकडून 27 विकेट्स घेऊन मुंबईला चॅम्पियन बनविण्यात सिंहाचा वाटा उचलला.

ट्रेंट बोल्टच्या घातक गोलंदाजीसमोर बऱ्याचवेळी प्रतिस्पर्धी संघाचे बॅट्समन गुडघे टेकतात. तो संघाला पाहिजे तेव्हा विकेट्स मिळवून देण्यात माहिर आहे. गेल्या मोसमात मुंबईला चॅम्पियन्स बनविण्यात त्यानेही खारीचा वाटा उचलला आहे.

नॅथन कुल्टर नाईल, ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज… लाईन टू लाईन गोलंदाजी करण्यासाठी तो प्रसिद्ध आहे. त्याचा टप्पाही अचूक आहे. तसंच या घातक गोलंदाजांच्या साथीला पियुष चावलाची फिरकी… मुंबईच्या संघातील एकमेव नियमित फिरकीपटू… ज्याच्या फिरकीच्या जाळ्यात भलेभले दिग्गज अडकतात. आयपीएलचे बरेचसे हंगाम त्याने कोलकात्याकडून खेळले आहेत. आता मुंबईला सहाव्यांदा चॅम्पियन बनविण्यासाठी तो झटतो आहे.

मुंबई इंडियन्सची टीम :

रोहित शर्मा (कप्तान), क्विंटन डिकॉक (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, क्रिस लिन, अनमोलप्रीत सिंह, सौरभ तिवारी, आदित्य तरे, कायरन पोलार्ड, हार्दिक पंड्या, क्रुणाल पांड्या, अनुकूल रॉय, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, राहुल चाहर, धवल कुलकर्णी, जयंत यादव और मोहसिन खान

(IPL 2021 Mumbai indians Team Profile MI become champion for the sixth time?)

हे ही वाचा :

IPL 2021 : ‘भल्या भल्यांच्या केल्या बत्त्या गुल…’ मुंबई इंडियन्सच्या या फलंदाजांना रोखायचं कसं?, प्रतिस्पर्धी संघांना टेन्शन!

IPL 2021 : हे 11 बिनीचे शिलेदार जे मुंबई इंडियन्सला बनवू शकतात सहाव्यांदा चॅम्पियन!

Published On - 8:04 am, Tue, 6 April 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI