IPL 2021 : के एल राहुलचा पुन्हा फ्लॉप शो, सोशल मीडियावर फॅन्स कडाडले, म्हणाले, ‘याला पाणी द्यायला ठेवा!’

कोलकात्याविरुद्धच्या सामन्यात फॅन्सच्या निशाण्यावर आला पंजाबचा कर्णधार के एल राहुल (KL Rahul)... त्याच्या फलंदाजीतल्या अपयशाने फॅन्स त्रस्त आहेत. अखेर याला संघाबाहेर ठेवलं पाहिजे, अशी मागणी काही फॅन्सनी ट्विटरवरुन केली आहे. (IPL 2021 PBKS vs KKR KL Rahul Flop Show Against KKR Fans Troll Social Media)

IPL 2021 : के एल राहुलचा पुन्हा फ्लॉप शो, सोशल मीडियावर फॅन्स कडाडले, म्हणाले, 'याला पाणी द्यायला ठेवा!'
के एल राहुलचा पुन्हा फ्लॉप शो...
Follow us
| Updated on: Apr 27, 2021 | 10:14 AM

मुंबई :  पंजाब किंग्जच्या (Punjab Kings) फलंदाजांनी कोलकात्याच्या (Kolkata Knight Riders) गोलंदाजीसमोर नांगी टाकली. सोमवारी पुन्हा एकदा पंजाबचे फलंदाज सपशेल ठरले. कोलकात्याविरुद्ध पंजाबचा संघ शंभरीही पार करणार नाही असं वाटत असताना ख्रिस जॉर्डनने (Chris Jorden) पंजाबची लाज राखली. शेवटच्या तीन षटकांत त्याने फटकेबाजी करत पंजाबच्या धावफलकावर त्याने 123 धावा लावल्या. दरम्यान पंजाबकडे तगडे फलंदाज असताना देखील ते मोठी धावसंख्या उभारु शकत नाही, याचं शल्य क्रिकेट रसिकांच्या मनामध्ये आहे. मात्र, कालच्या सामन्यात फॅन्सच्या निशाण्यावर आला पंजाबचा कर्णधार के एल राहुल (KL Rahul)… त्याच्या फलंदाजीतल्या अपयशाने फॅन्स त्रस्त आहेत. अखेर याला संघाबाहेर ठेवलं पाहिजे, अशी मागणी काही फॅन्सनी ट्विटरवरुन केली आहे. एकाने तर थेट राहुलला पाणी द्यायला ठेवलं पाहिजे, असंच म्हटलं. (IPL 2021 PBKS vs KKR KL Rahul Flop Show Against KKR Fans Troll Social Media)

के एल राहुलचा पुन्हा फ्लॉप परफॉर्मन्स

के एल राहुलचा फ्लॉप परफॉर्मन्स सोमवारच्या सामन्यातही त्याने कायम ठेवला. कोलकाताविरुद्ध तो डावाची सुरुवात करायला मैदानात उतरला. 20 चेंडूंचा सामना करताना त्याने केवळ 19 धावा केल्या. या छोटेखानी खेळीत त्याने 2 चौकार आणि 1 षटकार लगावला. आज मोठी खेळी करेल असं वाटत असताना पॅट कमिन्सच्या बोलिंगवर त्याने सुनील नरेनला सोपा कॅच दिला आणि तंबूत परतला.

के एल राहुल सोशल मीडियावर ट्रोल

कोलकात्याविरुद्धच्या सामन्यात के एल राहुल अपयशी ठरल्यानंतर सोशल मीडियावर त्याला पंजाबच्या फॅन्सनी ट्रोल केलं. राहुलला संघात 12 वा प्लेअर म्हणून ठेवलं पाहिजे, अशी मागणी काहींनी केली तर काहींनी थेट राहुललाउतर खेळाडूंना पाणी देण्यासाठी ठेवा, अशीच मागणी केली.

पंजाबचा संघ कागदावर तगडा

पंजाबच्या संघात अनेक मोठी नावे आहेत पण मैदानावर प्रदर्शन करण्यात ते सपशेल अपयशी ठरत आहेत. पंजाबकडे सलामीवार म्हणून मयांक अग्रवाल आणि के एल राहुलसारखी तगडी जोडी आहे जी दुनियेतील कोणत्याही गोलंदाजीचा समाचार घेण्यास पात्र आहे. ख्रिस गेलसारखा युनिव्हर्स बॉस आहे की जो काही ओव्हर्समध्ये सामन्याचं चित्र पालटून टाकत होत्याचं नव्हतं करुन ठेवण्याची क्षमता बाळगतो. नंतर निकोलस पूरन सारखा आक्रमक आणि अष्टपैलू खेळाडू आहे जो काहीच बॉलमध्ये झंझावाती खेळी करण्यासाठी प्रसिद्ध आहे. बोलिंगमध्ये अर्शदीप सिंग, मोहम्मद शमीसारखे बोलर आहेत जे प्रतिस्पर्धी संघांच्या विकेट घेऊन त्यांना घायाळ करु शकतात.

(IPL 2021 PBKS vs KKR KL Rahul Flop Show Against KKR Fans Troll Social Media)

हे ही वाचा :

Video : ख्रिस जॉर्डन नडला, प्रसिद्ध कृष्णा डोळ्यात डोळे घालून भिडला, वाचा मैदानावर नेमकं काय घडलं…?

IPL 2021 : ‘अब हिंदी में मत बात कर’, धोनी-जाडेजाची स्टम्पमागून कॉमेन्ट्री, रैनाला हसू अनावर, नेमकं काय घडलं? वाचा किस्सा…

पाकिस्तानातून भारतासाठी प्रार्थना, शोएब मलिक म्हणतो, ‘अल्लाह भारतीयांना कोरोनाविरोधात लढण्यासाठी बळ दे…!’

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.