IPL 2021 : ‘विराटसेना’ निळा ड्रेस घालून मैदानात उतरणार, कोरोना योद्ध्यांना मदत करण्याचा ‘बंगळुरु’ पॅटर्न!

बंगळुरुचा संघ खेळाडूंच्या स्वाक्षऱ्यांसह असलेल्या जर्सींचा लिलाव करून त्यातून पैसे गोळा करेल आणि आरोग्याच्या पायाभूत सुविधांना आधार देण्यासाठी ही आर्थिक देणगी सुपूर्द करेल. बंगळुरुचा पुढील सामना कोलकाता नाईट रायडर्सशी होणार आहे. (IPL 2021 RCB Will Wear Blue Jersy To Donate For oxygen Support Covid 19 pandemic)

IPL 2021 : 'विराटसेना' निळा ड्रेस घालून मैदानात उतरणार, कोरोना योद्ध्यांना मदत करण्याचा 'बंगळुरु' पॅटर्न!
विराट कोहली
Follow us
| Updated on: May 03, 2021 | 7:25 AM

मुंबई : आयपीएल 2021 (IPL ) मधील दमदार कामगिरी करणाऱ्याने संघाने सामाजिक भानाचं जबाबदार पाऊल उचललं आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुने (Royal Challengers Banglore) देशभरातील कोव्हिडचा हाहाकार लक्षात घेता कोरोना विरुद्धच्या भारताच्या लढाईत ‘ऑक्सिजनशी संबंधित’ पायाभूत सुविधांना आर्थिक पाठिंबा देण्यासाठी एक पाऊल पुढे टाकलं आहे. आगामी सामन्यात विराटसेना (Virat Kohli) विशेष निळी जर्सी घालून मैदानात उतरेल. मॅचनंतर त्या जर्सींचा लिलाव करण्यात येईल आणि त्यातून जी रक्कम जमा होईल ती कोरोना निधी म्हणून देण्यात येईल तसंच बंगळुरुने फ्रँचायजी म्हणूनही कोरोना योद्ध्यांसाठी विशेष मदत करणार आहे. (IPL 2021 Royal Challengers Banglore Will Wear Blue Jersy To Donate For oxygen Support Covid 19 pandemic)

विराटसेना निळा ड्रेस घालून आगामी सामना खेळणार

बंगळुरुचं नेतृत्व करणाऱ्या कर्णधार विराट कोहलीने ट्विटरवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये बंगळुरु निळा ड्रेस घालून आगामी सामना खेळणार असल्याचं सांगितलं आहे. तसंच युद्धपातळीवर कोरोना योद्ध्यांना कशा प्रकारे मदत करता येईल काय प्रयत्न सुरु आहे, यासंबंधीही त्याने या व्हिडीओत प्रकाश टाकला.

कोरोनायोद्ध्यांसाठी बंगळुरुचा संघ विशेष निधी जमा करणार

आपापल्या शहरांची अशी काही महत्त्वाची ओळख आहे की ज्या शहरांमध्ये सध्या ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. तिथे ऑक्सिजनच्या साठ्याची गरज आहे, याच पार्श्वभूमीवर बंगळुरु काही महत्त्वाची पावले उचलण्याची तयारी करतो आहे, असं विराटने सांगितलं. त्याचाच भाग म्हणून कोरोना साथीच्या दुसऱ्या लाटेत आरोग्याच्या अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे सगळे जण होरपळून निघत असताना कोरोनायोद्ध्यांसाठी बंगळुरुचा संघ विशेष निधी जमा करेल, असं विराटने संघनायक म्हणून सांगितलं.

निळी जर्सी परिधान करण्यामागचं खास कारण विराटने सांगितलं

आगामी सामन्यात बंगळुरु खास निळी जर्सी परिधान करेल ज्यावर कोरोनविरुद्ध लढण्यासाठी खास संदेश असेल. तसंच ही जर्सी घालून कोरोना लढ्यात ज्यांनी ज्यांनी मदत केलीय त्यांच्याप्रति आदर आणि एकता दर्शवण्याचा आमचा उद्देश असेल. ज्यांनी पाठीमागच्या एक वर्षांहून अधिक काळ पीपीई कीट मध्ये घालवला, त्यांच्याप्रतिही आदर व्यक्त करण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, असं विराटने सांगितलं.

बंगळुरुचा पुढचा सामना कोलकात्याशी होणार

या सामन्यात बंगळुरुचा संघ खेळाडूंच्या स्वाक्षऱ्यांसह असलेल्या जर्सींचा लिलाव करून त्यातून पैसे गोळा करेल आणि आरोग्याच्या पायाभूत सुविधांना आधार देण्यासाठी ही आर्थिक देणगी सुपूर्द करेल. बंगळुरुचा पुढील सामना कोलकाता नाईट रायडर्सशी होणार आहे.

(IPL 2021 Royal Challengers banglore Will Wear Blue Jersy To Donate For oxygen Support Covid 19 pandemic)

हे ही वाचा :

IPL 2021 Purple Cap | हर्षल पटेलकडे Purple Cap कायम, आवेश खान आणि ख्रिस मॉरिसमध्ये कडवी झुंज

PBKS vs DC IPL 2021 Match 29 | धवनची अर्धशतकी ‘गब्बर’ खेळी, पंजाबवर 7 विकेट्सने शानदार विजय, पॉइंट्स टेबलमध्ये गाठलं ‘शिखर’

KL Rahul hospitalized: पंजाबचा कॅप्टन के. एल. राहुल रुग्णालयात, आयपीएलमध्ये खेळण्यावर प्रश्नचिन्ह

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.