AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताचा जावई झाला बांगलादेशचा बॉलिंग कोच, आयपीएलमध्ये सर्वात वेगवान गोलंदाजीचा नावावर रेकॉर्ड, कोणत्या देशाची डोकेदुखी वाढणार?

Bangladesh Bowling Coach Indian Connection : भारतीय आयपीएलवरील IPL 2025 भारत-पाक यांच्यातील तणावाचे मळभ हटले आहे. त्यातच शेजारील देश बांगलादेशमधून एक बातमी समोर येत आहे. या संघाला नवीन प्रशिक्षक मिळाला आहे. त्याचे भारताशी असे कनेक्शन आहे.

भारताचा जावई झाला बांगलादेशचा बॉलिंग कोच, आयपीएलमध्ये सर्वात वेगवान गोलंदाजीचा नावावर रेकॉर्ड, कोणत्या देशाची डोकेदुखी वाढणार?
बांगलादेश संघाला नवीन प्रशिक्षकImage Credit source: गुगल
| Updated on: May 13, 2025 | 5:10 PM
Share

IPL Faster Blower : भारतीय आयपीएलवरील भारत-पाक तणावाचे ओझे एकदाचे उतरले आहे. ही स्पर्धा पुन्हा एकदा रंगात येणार आहे. दरम्यान शेजारील देश बांगलादेशातून एक बातमी समोर येत आहे. आयपीएल हंगामात सर्वात वेगवान गोलंदाजी करणाऱ्या खेळाडूला बांगला संघाचे प्रशिक्षक पद देण्यात आले आहे. हा खेळाडू भारताचा जावई आहे. त्याची नियुक्ती 2027 पर्यंत असेल.

नवीन प्रशिक्षक मिळाला

बांगलादेशाच्या संघात महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत. शॉन टेट आता गोलंदाजांचे प्रशिक्षक असतील. टेट हा या पदावर 2027 पर्यंत असेल. बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे संघाची गोलंदाजी सुधारण्यास मदत होईल. टेट यापूर्वी पाकिस्तान, वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तान संघाचे प्रशिक्षक होते. त्यांची नियुक्ती आंद्रे एडम्स याच्या जागेवर होईल. ते मार्च 2024 मध्येच या संघाशी जोडल्या गेले होते.

2007 मधील विश्वचषक विजेत्या संघात

42 वर्षीय शॉन टेट ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज आहे. शोएब अख्तर आणि ब्रेट ली यांच्यासह त्याने क्रिकेट इतिहासात सर्वात वेगवान गोलंदाजी केली आहे. त्याच्या सर्वात वेगवान चेंडूचा वेग 161.1 किलोमीटर प्रति तास इतका होता. हा चेंडू त्याने 2010 मध्ये इंग्लंडविरोधातील सामन्यात फेकला होता. टेट हा विश्वचषक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाचा भाग होता. त्या मालिकेत टेटने 11 सामन्यात 23 बळी घेतले होते. ऑस्ट्रेलियासाठी टेटने 59 सामने खेळले. त्यात 95 बळी घेतले. आता तो बांगलादेशातील गोलंदाजांना प्रशिक्षण देणार आहे. त्यामुळे हा संघ श्रीलंका, पाकिस्तानसह भारताला डोईजड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

शॉन टेट

टेट याने ऑगस्ट 2013 मध्ये भारतीय मॉडल आणि उद्योजिका माशूम सिंघा सोबत साखरपूडा केला होता. पुढे जून 2014 मध्ये मुंबईत दोघे विवाह बंधनात अडकले. 2010 पासून टेट हा आयपीएल खेळत होता. तो राजस्थान रॉयल्स संघाचा गोलंदाज होता. 2017 मध्ये त्याने भारताचे परदेशी नागरिकत्व मिळवल्याचे जाहीर केले होते.

IPL इतिहासात सर्वात वेगवान गोलंदाज

157.7 किमी/प्रति तास – शॉन टेट

157.3 किमी/प्रति तास – लॉकी फर्ग्युसन

157.0 किमी/प्रति तास – उमरान मलिक

156.2 किमी / प्रति तास – एनरिच नोर्टजे

156 किमी / प्रति तास – उमरान मलिक

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.