KKR vs SRH : कोलकाता आणि हैदराबादपैकी वरचढ कोण? आकडे कुणाच्या बाजूने?
Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad Head To Head Record : आयपीएल स्पर्धेतील 19 व्या हंगामातील पाचव्या सामन्यात 2 एप्रिलला कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद आमनेसामने असणार आहेत. या सामन्यानिमित्ताने दोन्ही संघांपैकी कोण वरचढ आहे? हे जाणून घेऊयात.

आयपीएल स्पर्धेतील 19 व्या हंगामातील पाचव्या सामन्यात 2 एप्रिलला कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद आमनेसामने असणार आहेत. या सामन्यानिमित्ताने दोन्ही संघांपैकी कोण वरचढ आहे? हे जाणून घेऊयात.
केकेआर-हैदराबादपैकी वरचढ कोण?
गुरुवारी 2 एप्रिल रोजी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात होणार हा 31 वा सामना असणार आहे. याआधी उभयसंघात झालेल्या 30 पैकी सर्वाधिक सामना हे कोलकाता नाईट रायडर्सने जिंकले आहेत. केकेआरने हैदराबादला 30 पैकी 20 सामन्यांमध्ये पराभवाची धुळ चारली आहे. तर हैदराबादला कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध 10 सामने जिंकण्यात यश आलं आहे.
18 व्या मोसमातील कामगिरी
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद याच्यांत गेल्या मोसमात एकूण 2 सामने खेळवण्यात आले आहेत. केकेआरने यापैकी 1 सामना जिंकला होता. तर 1 सामना सनरायजर्स हैदराबादने आपल्या नावावर केला होता.
