Virat Kohli Out : विराटचं अर्धशतक हुकताच अनुष्काचा पडला चेहरा, Reaction व्हायरल

Anushka Sharma reaction on Virat Kohli Wicket : प्रकृती खराब असूनही विराट कोहलीने RCB vs LSG मॅचमध्ये फलंदाजी केली. पण अर्धशतकाच्या अगदीच जवळ असताना, तो 49 धावांवर आऊट झाला. हाफ सेंच्युरी करण्यासाठी विराटने सिक्सर मारली खरी, पण तो कॅच फिल्डरच्या हातात बसला. विराट बाद झाल्यावर अनुष्का शर्माच्या रिॲक्शनने सर्वांचंच लक्ष वेधलं.

Virat Kohli Out : विराटचं अर्धशतक हुकताच अनुष्काचा पडला चेहरा, Reaction व्हायरल
विराट कोहली- अनुष्का शर्मा
| Updated on: Apr 16, 2026 | 8:07 AM

Virat Kohli gets out for 49 runs : विराट कोहली हा जगातील सर्वोत्तम खेळांडूपैकी एक आहे यात काहीच संशय नाही. त्याने जवळपास 350 आयपीएल सामन्यांमध्ये सुमारे 9 हजार धावा, 8 शतकं आणि 65 अर्धशतके झळकावली आहेत. काल आयपरीएल 2026 मध्ये लखनौविरुद्ध 147 धावांचे लक्ष्य गाठताना विराट कोहलीने अगदी आरामात पाठलागाला सुरुवात केली. तो अधूनमधून त्याचा भारतीय संघातील सहकारी मोहम्मद शमीसोबत विनोद करतानाही दिसला. बंगळूरसाठी खेळताना धावांच्या पाठलागादरम्यान, आक्रमक फिल सॉल्ट आठव्या षटकात 9 धावांवर आणि देवदत्त पडिक्कल 10 धावांवर बाद झाला. पण विराट कोहलीच्या बॅटने चोख काम केलं. पण असं असंल तरी त्याचं अर्धशतक थोडक्यात हुकलं, तो 49 धावांवर बाद झाला.

नर्व्हस 49 ची शिकार ठरला विराट, अनुष्काची Reaction व्हायरल

आयपीएल 2026 स्पर्धेत आरसीबीचा सामना लखनौ सुपर जायंट्सशी सामना झाला. या सामनयात आरसीबीने लखनौ सुपर जायंट्सला 146 धावांवर रोखलं. त्यामुळे या धावांचा पाठलाग करणं खूप सोपं होतं. मात्र सॉल्ट आणि पडिक्कलही लवकर बाद झाले. त्यामुळे विराट कोहलीने सावध खेळी करण्यास सुरूवात केली. विराटने 6 चौकार आणि 1 षटकार मारला. त्याने 34 चेंडूत 49 धावांची खेळी केली. तो त्याच्या 66 व्या अर्धशतकाच्या अगदी समीप होता. पण लखनऊच्या आवेश खानच्या गोलंदाजीवर त्याने सिक्सर मारण्याचा प्रयत्न केला, जो तो़कडा ठरला. बॉल काही बाऊंड्रीपार गेला नाही. त्याआधीच तो बॉल निकोलस पूरनच्या हातात बसला आणि विराटची विकेट गेली.

त्याचं अर्धशतक अवघ्या 1 धावेने हुकलं आणि स्टेडियममधील विराटच्या असंख्य चाहत्यांप्रमाणेच विराटची पत्नी अनुष्का शर्मा हिच्या तोंडातूनही आई गं.. असे उद्गाग निघाले. स्टेडियममधील तिची Reaction खूप व्हायरल झाली. विराटने आऊट झाल्याने चाहत्यांप्रमाणेच अनुष्काही निराश झाली होती. आयपीएलच्या 19 वर्षांच्या इतिहासात, विराट कोहली अर्धशतकाच्या इतका जवळ पोहोचूनही आपले अर्धशतक पूर्ण करू न शकण्याची वेळ क्वचितच आली आहे. यावेळी, 34 चेंडूंमध्ये 49 धावा करून विराट कोहली आपले अर्धशतक पूर्ण करण्यापासून केवळ एका धावेने दूर राहिला.

 

 

गेल्या मॅचमध्ये जखमी होता विराट

मागील सामन्यातून बाहेर पडताना विराट कोहली गुडघ्याला ब्रेस लावून बाहेर पडला होता, आणि तो लखनौविरुद्धच्या सामन्यात खेळणार की नाही याबद्दल बरीच शंका होती. मात्र, जगभरातील लाखो चाहत्यांसह, जगभरातील अनेक क्रिकेटपटूंप्रमाणेच, माजी क्रिकेटपटू आणि समालोचक नवज्योत सिंग सिद्धू हे विराट कोहलीच्या तंदुरुस्तीचे विशेष चाहते आहेत. मागील सामन्यात खलील अहमदच्या स्नायूला दुखापत झाली होती, आणि सिद्धू यांनी विराट कोहलीचे उदाहरण दिले. सिद्धू यांनी विराटच्या तंदुरुस्तीची प्रशंसा केली आणि म्हणाले की, अशी गोष्ट विराट कोहलीसोबत सहसा घडत नाही. जखमी असूनही विराट कालच्या मॅचमध्ये खेळायला उतरला आणि त्याने 49 धावांची शानदार खेळी केली. त्या जोरावर आरसीबीने लखनौवर 5 विकेट्सने सहज विजय मिळवला.

 

 

Follow Us