धोनीला मागे टाकण्यासाठी ‘वादळ’ सज्ज, अवघ्या 22 धावांत गेल मोडणार विक्रम

आयपीएलमध्ये आज किंग्स इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाइट रायडर्स या दोन संघांमध्ये सामना होणार आहे. स्पर्धेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी दोन्ही संघांना आजचा सामना जिंकणे आवश्यक आहे.

धोनीला मागे टाकण्यासाठी 'वादळ' सज्ज, अवघ्या 22 धावांत गेल मोडणार विक्रम

दुबई : आयपीएलमध्ये (IPL) आज (सोमवारी) किंग्स इलेव्हन पंजाब (Kings xi Punjab) आणि कोलकाता नाइट रायडर्स या दोन संघांमध्ये सामना होणार आहे. या स्पर्धेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी दोन्ही संघांना आजचा सामना जिंकणे आवश्यक आहे. तर या सामन्यात पंजाबचा खेळाडू ख्रिस गेल याला एक विक्रम प्रस्थापित करण्याची संधी आजच्या सामन्याद्वारे मिळणार आहे. (IPL : Chris Gayle need 22 runs to go ahead from MS Dhoni)

कोलकाताविरुद्धच्या सामन्यात ख्रिस गेलने 22 धावा काढल्या तर तो चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचा रेकॉर्ड मोडू शकतो. ख्रिस गेलने 129 सामन्यांमध्ये 4610 जमवल्या आहेत. तर महेंद्रसिंह धोनीने 202 सामन्यांमध्ये 4631 धावा फटकावल्या आहेत. आजच्या सामन्यात गेलने 22 धावा केल्या तर गेल धावांच्या बाबतीत धोनीला मागे टाकू शकतो. या रेकॉर्डसह ख्रिस गेल आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा फटकावणाऱ्या खेळाडूंचा यादीत सातव्या क्रमांकावर विराजमान होईल.

आतापर्यंत पाच खेळाडू 5000 पार

आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत केवळ पाच खेळाडूंनी पाच हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या कर्णधार विराट कोहली सर्वात पुढे आहे. त्याने 188 सामन्यांमध्ये 5827 धावा केल्या आहेत. त्याच्यानंतर नंबर लागतो चेन्नई सुपरकिंग्सच्या सुरेश रैनाचा. रैनाने 193 सामन्यांमध्ये 5368 धावा केल्या आहेत.

तिसऱ्या क्रमांकावर मुंबईचा रोहित शर्मा आहे. रोहितने 197 सामन्यांमध्ये 5158 धावा फटकावल्या आहेत. चौथ्या क्रमांकावर सनरायझर्स हैदराबादचा डेव्हिड वॉर्नर आहे. वॉर्नरने अवघ्या 137 सामन्यांमध्ये 5076 धावा फटकावल्या आहेत. वॉर्नरपाठोपाठोपाठ दिल्लीच्या शिखर धवने नुकताच 5 हजार धावांचा टप्पा पार केला आहे. धवनने 170 सामन्यांमध्ये 5050 धावा फटकावल्या आहेत.

संबंधित बातम्या

तीन वर्ष जुनी बॅट, 20 चेंडूत अर्धशतक; हार्दिक पांड्याने सांगितली ‘राज की बात’

IPL 2020 | बीसीसीआयकडून प्ले-ऑफचे वेळापत्रक जाहीर, ‘या’ ठिकाणी होणार अंतिम सामना

IPL 2020, CSK vs MI : 3 धावात 4 फलंदाज बाद, पॉवरप्ले मध्ये 5 विकेट्स, चेन्नईच्या नावावर कोणकोणते नकोसे विक्रम?

Kapil Dev | कपिल देव यांची प्रकृती ठणठणीत, हॉस्पिटलमधून डिस्चार्ज

(IPL : Chris Gayle need 22 runs to go ahead from MS Dhoni)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI