AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2020, CSK vs MI : 3 धावात 4 फलंदाज बाद, पॉवरप्ले मध्ये 5 विकेट्स, चेन्नईच्या नावावर कोणकोणते नकोसे विक्रम?

मुंबईविरुद्धच्या या पराभवासह चेन्नईचे यंदाच्या मोसमातील आव्हान संपुष्ठात आले आहे.

IPL 2020, CSK vs MI : 3 धावात 4 फलंदाज बाद, पॉवरप्ले मध्ये 5 विकेट्स, चेन्नईच्या नावावर कोणकोणते नकोसे विक्रम?
| Updated on: Oct 23, 2020 | 11:32 PM
Share

शारजा : मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) चेन्नई सुपर किंग्जसवर (Chennai Super Kings) 10 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. चेन्नईने मुंबईला विजयासाठी 115 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान मुंबईच्या इशान किशन- क्विंटन डी कॉक या सलामी जोडीने 12.2 ओव्हरमध्येच पूर्ण केलं. या पराभवासह चेन्नईचे यंदाच्या मोसमातील आव्हान संपुष्ठात आलं आहे. मुंबईने टॉस जिंकून चेन्नईला बॅटिंगसाठी भाग पाडले. मुंबईने सुरुवातीपासूनच चेन्नईला झटके द्यायला सुरुवात केली. मुंबईच्या भेदक गोलंदाजीसमोर चेन्नईच्या फलंदाजांनी लोटांगण घातलं. चेन्नईने अवघ्या 3 धावांवर 4 विकेट्स गमावल्या. यासह चेन्नईच्या नावावर अनेक नकोसे विक्रम झाले आहेत. IPL 2020 Chennai Super Kings Sets Bad Record Against Mumbai Indians

काय आहेत नकोसे विक्रम?

चेन्नईने आपली चौथी विकेट 3 धावांवर गमावली. यासह आयपीएलच्या इतिहासात चेन्नई सर्वात कमी धावांवर 4 विकेट्स गमावणारी दुसरी टीम ठरली. याआधी डेक्कन चार्जसने (हैदराबाद) 2011 मध्ये 2 धावांवर 4 विकेट्स गमावल्या होत्या.

आयपीएलच्या इतिहासात चेन्नईने पहिल्यांदाच पावरप्ले मध्ये म्हणजेच पहिल्या 6 ओव्हरमध्येच 5 विकेट्स गमावल्या.

चेन्नईने झटपट विकेट्स गमावल्याने धोनीला लवकर मैदानात यावे लागले. धोनी 2 ऱ्या ओव्हरमध्येच मैदानात आला. याआधी धोनी 2010 मध्ये दिल्ली डेयरडेव्हिल्सविरुद्ध 3 ऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. तेव्हा धोनीने 3 ऱ्या ओव्हरमधील पहिला चेंडू खेळला होता.

आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत एकूण 12 वेळा पावरप्लेमध्ये 5 विकेट्स गमावण्याची नामुष्की अनेक संघांवर ओढावली होती. मात्र चेन्नईसोबत अशी घटना घडण्याची ही पहिलीच वेळ ठरली.

आयपीएलमध्ये सर्वात कमी धावांवर 7 वी विकेट गमावण्याची नामुषकी चेन्नईवर ओढावली. चेन्नईने 43 धावावंर  7 वा विकेट गमावला. यासह चेन्नई सर्वात कमी धावसंख्येवर 7 वी विकेट गमावणारी दुसरी टीम ठरली. याआधी बंगळुरुने 2017 मध्ये 42 धावांवर 7 वी विकेट गमावली होती.

ट्रेन्ट बोल्टचा विक्रम

मुंबईच्या भेदक माऱ्यासमोर चेन्नईला 20 ओव्हरमध्ये 114 धावाच करत्या आल्या. मुंबईकडून ट्रेन्ट बोल्टने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. यासह त्याच्या नावावर अनोखा रेकॉर्ड झाला. यंदाच्या मोसमात पावरप्ले मध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. बोल्टने पावरप्ले मध्ये आतापर्यंत 8 विकेट्स घेतल्या आहेत.

संबंधित बातम्या :

IPL 2020, CSK vs MI : क्विंटन डी कॉक-इशान किशनची धमाकेदार फटकेबाजी, मुंबईचा चेन्नईवर 10 विकेट्सने शानदार विजय

IPL 2020 Chennai Super Kings Sets Bad Record Against Mumbai Indians

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.