AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IRE vs IND : आयर्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाला धक्का, हार्दिकच्या जागी निवडलेला ऑलराऊंडर खेळाडू OUT

IRE vs IND : टीम इंडिया लवकर आयर्लंड आणि इंग्लंडचा दौरा करणार आहे. या सीरीजसाठी संघात निवडलेला एक अष्टपैलू खेळाडू सीरीज सुरु होण्याआधीच आऊट झाला आहे. हार्दिक पंड्याच्या अनुपस्थितीत तो भारताचं मुख्य अस्त्र होता.

IRE vs IND : आयर्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाला धक्का, हार्दिकच्या जागी निवडलेला ऑलराऊंडर खेळाडू OUT
Team India
| Updated on: Jun 23, 2026 | 12:11 PM
Share

लवकरच टीम इंडिया आयर्लंड आणि इंग्लंड विरुद्ध मालिका खेळणार आहे. पण त्याआधी वाईट बातमी आहे. टीम इंडियाचा ऑलराऊंडर नितीश कुमार रेड्डी आयर्लंड विरुद्ध T20 सीरीज खेळू शकणार नाहीय. BCCI सूत्रांनुसार त्याचं इंग्लंड दौऱ्यावर सुद्धा खेळणं निश्चित नाहीय. क्वाड्रिसेप्स इंजरीमुळे तो दोन्ही सीरीजमधून आऊट होऊ शकतो. नितीश कुमार रेड्डी आयर्लंड सीरीजमधून बाहेर गेला आहे. इंग्लंडमध्ये तो व्हाइट बॉल सीरीज खेळणार की नाही,हे अजून निश्चित नाहीय. नितीशची दोन्ही सीरीजसाठी T20 आणि वनडे संघात निवड झाली होती.

हार्दिक पंड्याच्या अनुपस्थितीत तो भारताचं मुख्य अस्त्र होता. पण आता तो बाहेर गेल्याने टीमच्या चिंता वाढल्या आहेत. दुखापतींमुळे नितीश कुमार रेड्डी मागच्या वर्षभरापासून हैराण आहे. IPL 2025 च्या सीजनमध्ये 13 मॅचमध्ये तो फक्त पाच ओव्हर टाकू शकला. गुडघे दुखापतीमुळे इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिकेतून मध्यावरच त्याला माघार घ्यावी लागलेली.

त्या मॅचमध्ये त्याने बॅटिंग केली नव्हती

अफगाणिस्तान विरुद्ध वनडे सीरीजमध्ये नितीश रेड्डीला क्वाड्रिसेप्स इंजरी झाली. धर्मशाळा येथे त्याने वनडे करिअरमधील पहिला विकेट घेतला. त्यानंतर लखनऊ विरुद्ध दुसऱ्या वनडेत तो खेळला नव्हता. कॅप्टन गिलने यासाठी क्वाड्रिसेप्सच्या दुखापतीचं कारण दिलं होतं. पण चेन्नई विरुद्ध तिसऱ्या वनडे सामन्यात तो खेळला. 6 ओव्हरमध्ये 42 धावा देऊन एकही विकेट काढला नाही. त्या मॅचमध्ये त्याने बॅटिंग केली नव्हती.

भारताचा आयर्लंड दौरा दोन कारणांमुळे चर्चेत

भारताच्या आयर्लंड दौऱ्याची सुरुवात 26 जूनपासून होणार आहे. बेलफास्ट येथे टीम इंडियात दोन टी20 सामने खेळणार आहे. टीम इंडियाचे खेळाडू लंडनवरुन बेलफास्टला जातील. भारताचा आयर्लंड दौरा दोन कारणांमुळे चर्चेत आहे. T20 टीमचा कॅप्टन बनल्यानंतर श्रेयस अय्यरचा हा पहिला दौरा आहे आणि दुसरं कारण आहे वैभव सूर्यवंशीचा डेब्यू पहायला मिळू शकतो. श्रीलंका दौऱ्यावर भारतीय अ संघाकडून खेळताना वैभव सूर्यवंशी पहिले चार सामने फ्लॉप ठरला. पण फायनलमध्ये त्याने तडाखेबंद खेळी केली. 29 चेंडूत 94 धावा फटकावल्या.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी