‘गरजूंना मदत करणं आमचं कर्तव्य’, कोरोनाविरोधी लढ्यात पठाण बंधूंनी उचललं मोठं पाऊल!

देशात कोरोनाची कठीण परिस्थितीत असताना अनेकजण आपापल्या परीने मदतीचा हात पुढे करतायत. अशातच भारतीय क्रिकेट संघाचे गुणी आणि संवेदनशील माजी खेळाडू इरफान पठाण आणि युसूफ पठाण यांनी मदतीचा हात देऊ केला आहे. (Irfan Pathan And Yusuf Pathan Will Help Covid Patient in Delhi)

'गरजूंना मदत करणं आमचं कर्तव्य', कोरोनाविरोधी लढ्यात पठाण बंधूंनी उचललं मोठं पाऊल!
इरफान पठाण आणि युसूफ पठाण

नवी दिल्ली :  संपूर्ण भारत देश कोरोनाशी (India Covid 19) दोन हात करतोय. कोरोना रुग्णांमध्ये प्रत्येक दिवशी लक्षणीय वाढ होतेय. दिवसेंदिवस परिस्थिती अधिक बिकट होतीय. कुठे रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता जाणवतीय तर कुठे बेड मिळेनात… अशा सगळ्या कठीण प्रसंगी अनेकजण आपापल्या परीने मदतीचा हात पुढे करतायत. अशातच भारतीय क्रिकेट संघाचे गुणी आणि संवेदनशील माजी खेळाडू इरफान पठाण (Irfan Pathan) आणि युसूफ पठाण (Yusuf Pathan) यांनी मदतीचा हात देऊ केला आहे. तसंच  ‘गरजूंना मदत करणं आमचं कर्तव्य’ असल्याचंही त्यांनी अधोरेकित केलं आहे. (Irfan Pathan And Yusuf Pathan Will Help Covid Patient in Delhi)

कोरोनाग्रस्तांसाठी मोफत भोजन

राजधानी नवी दिल्लीत कोरोना लाटेचा दुसरा प्रभाव सर्वाधिक जाणवत आहे. दिल्लीत दररोज नव्या कोरोनाग्रस्तांची लक्षणीय भर पडत आहे. त्यामुळे दिल्लीच्या आरोग्य व्यवस्थेवर ताण पडत आहे. तसंच रुग्णांनाही त्रासाला आणि मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे. अशा परिस्थितीत भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण याने सांगितलं की, आमची अकादमी दक्षिण दिल्लीतील कोरोनाग्रस्तांसाठी मोफत भोजन देईल.

कोरोना संसर्गाची दुसरी लाट देशभर सुरु आहे आणि अशा परिस्थितीत गरजूंना मदत करणं आपलं कर्तव्य आहे. यापासून प्रेरणा घेऊन क्रिकेट अकादमी ऑफ पठाण (CAP) दक्षिण दिल्लीतील गरजूंना मोफत भोजन पुरवेल.

याआधीही पठाण बंधूंकडून मदतीचा हात

पठाण बंधू संवेदनशील खेळाडू म्हणून ओळखले जातात. याधीही पठाण बंधूंनी मदतीचा हात पुढे केला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेने देशात धुमाकूळ घातलेला असताना पठाण बंधूंनी 4 हजार मास्कचं वाटप केलं होतं तसंच काही रक्कम पीएम फंडात देखील दिली होती.

पठाण बंधूंना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण

काही दिवसांपूर्वी पठाण बंधूंना कोरोनाची लागण झाली होती. गुजरातमधल्या आपल्या घरी असताना इरफान पठाणला कोरोनाची बाधा झाली होती तर रायपूरमध्ये रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज टूर्नामेंट खेळून घरी आल्यानंतर युसूफचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. दोघांनीही डॉक्टरांच्या योग्य उपचारानंतर कोरोनावर यशस्वीपणे मात केली.

(Irfan Pathan And Yusuf Pathan Will Help Covid Patient in Delhi)

हे ही वाचा :

PHOTO | नवे आहेत पण छावे आहेत ! आयपीएलच्या 14 व्या मोसमात युवा खेळाडूंसमोर दिग्गजांचं लोटांगण

Icc Test Ranking | Rishabh Pantची ऐतिहासिक कामगिरी, ठरला पहिलाच भारतीय विकेटकीपर

PHOTO | कोरोनामुळे आयपीएलचा 14 वा मोसम स्थगित, खेळाडूंचं आर्थिक नुकसान, ‘या’ क्रिकेटपटूंचे अखेरचं पर्व ठरणार?

Published On - 6:39 am, Thu, 6 May 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI