IPL 2021 : मैदान सोडून काय पळता, भारतात तुम्ही सुरक्षित; IPL सोडून जाणाऱ्या खेळाडूंवर कुल्टर नाईल भडकला!

'तुम्ही भारताचं आयपीएल मैदान सोडून जाऊ नका. जरी कोरोनाची लाट असेल तरी आपण बायो बबलमध्ये सुरक्षित आहोत', अशा शब्दात त्याने आयपीएलचं मैदान सोडून जाणाऱ्या खेळाडूंना चपराक लगावली. (IPL 2021 Nathan Coulter nile Slam Who Break IPL Season Over Covid 19)

IPL 2021 : मैदान सोडून काय पळता, भारतात तुम्ही सुरक्षित; IPL सोडून जाणाऱ्या खेळाडूंवर कुल्टर नाईल भडकला!
'तुम्ही भारताचं आयपीएल मैदान सोडून जाऊ नका. जरी कोरोनाची लाट असेल तरी आपण बायो बबलमध्ये सुरक्षित आहोत', अशा शब्दात त्याने आयपीएलचं मैदान सोडून जाणाऱ्या खेळाडूंना चपराक लगावली.
Follow us
| Updated on: Apr 27, 2021 | 6:35 AM

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत भारतामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढल्यामुळे इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (IPL 2021) त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. भारताचा फिरकीपटून आणि दिल्ली डेअरडेविल्सचा प्रमुख खेळाडू आर.अश्विन पाठोपाठ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघातील अ‍ॅडम झम्पा (Adam Zampa) आणि केन रिचडर्सन (Kane Richardson) या दोन ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी आपण मायदेशी परतत असल्याचे जाहीर केले तसंच अनेक ऑस्ट्रेलियन खेळाडू कोरोनाच्या कारणास्तव मायदेशी परतण्याची शक्यता आहे. याच आयपीएल सोडून जाणाऱ्या खेळाडूंवर ऑस्ट्रेलियन प्लेअर तथा मुंबईच्या संघातील बिनीचा शिलेदार नॅथन कुल्टर नाईल (Nathan Coulter Nile ) भडकलेला पाहायला मिळाला. ‘तुम्ही भारताचं आयपीएल मैदान सोडून जाऊ नका. जरी कोरोनाची लाट असेल तरी आपण बायो बबलमध्ये सुरक्षित आहोत’, अशा शब्दात त्याने आयपीएलचं मैदान सोडून जाणाऱ्या खेळाडूंना चपराक लगावली. (IPL 2021 Nathan Coulter Nile Slam Who Break IPL Season Over Covid 19)

कुल्टर नाईल नेमकं काय म्हणाला?

“सध्या घरी जाण्यापेक्षा आपण भारतात सुरक्षित आहोत. आयपीएल स्पर्धा सोडून जाण्यापेक्षा आपण बायो बबलमध्ये अधिक सुरक्षित आहोत. जरी भारतात कोरोनाची दुसरी लाट असेल तरी आपण बायो बबलमध्ये असल्याने आपल्याला कोणताही त्रास होणार नाही. त्यासाठी घरी जाण्यापेक्षा आपण भारतातच थांबायला हवं”, असं नॅथन कुल्टर नाईल म्हणाला. तो क्रिकेट डॉम कॉम डॉट एयू या वेबसाईटशी बोलत होता.

भारत सोडून जावं की नाही जावं, यासंबंधी अनेकांची अनेक मतं असू शकतात. मी जेव्हा मायदेशी परतण्याची इच्छा असलेल्या अँड्यू टायशी बोललो तेव्हा मी त्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. खरं तर हा ज्याच्या त्याच्या निर्णय आहे, पण मला जर विचाराल तर मी सांगेन की आम्ही सर्व खेळाडू बायो बबलमध्ये सुरक्षित आहोत, त्यामुळे कोरोनाची आम्हाला तेवढी भीती नाही, असंही तो म्हणाला.

“माझं काही दिवसांपूर्वी अॅडम झॅप्माशी बोलणं झालं. मायदेशी (ऑस्ट्रेलिया) जाण्यावरुन माझ्या आणि झॅम्पामध्ये बराच काळ चर्चा झाली. मी त्याला सांगितलं सध्याच्या काळात घरी जाण्यापेक्षा मी आयपीएलच्या निमित्ताने असलेल्या बायो बबलमध्ये मी अधिक सुरक्षित आहे, तू ही विचार करावा”, असंही कुल्टर नाईलने सांगितलं.

आयपीएल स्पर्धेतून आतापर्यंत किती खेळाडुंनी माघार घेतली?

IPL 2021 स्पर्धेतून आतापर्यंत पाच खेळाडुंनी माघार घेतली आहे. यामध्ये आर. अश्विन, अँड्य्रू टाय, केन रिचडर्सन, अ‍ॅडम झम्पा, लियाम लिव्हिंगस्टोन यांचा समावेश आहे.

बायो बबलमुळे खेळाडुंच्या मानसिक आरोग्यावर परिणाम?

दोन दिवसांपूर्वी बायो बबलला कंटाळून राजस्थानचा फलंदाज लियाम लिव्हिंगस्टोन हादेखील माघारी परतला होता. बायो-बबलमध्ये मानसिक कोंडमारा होत असल्यामुळे आपल्याला हा निर्णय घ्यावा लागल्याचे त्याने सांगितले होते.

इंग्लंडच्या संघाने गेल्यावर्षी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. त्यानंतर लियाम लिव्हिंगस्टोन बिग बॅश लीगमध्ये खेळला होता. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून लियाम लिव्हिंगस्टोन हा बायो बबलमध्ये होता. बायो बबलमुळे जोश हॅझलवूड (चेन्नई), जोशुआ फिलीप (रॉयल चॅलेंजर्स), मिशेल मार्श (हैदराबाद) या खेळाडुंनी आयपीएल सुरु होण्यापूर्वीच स्पर्धेला रामराम ठोकला होता.

(IPL 2021 Nathan Coulter nile Slam Who Break IPL Season Over Covid 19)

हे ही वाचा :

DC vs SRH : कदाचित ‘तो’ टॉयलेटला गेला असेल, म्हणून सुपर ओव्हर खेळू शकला नाही, दिग्गज क्रिकेटपटूचा वॉर्नरला टोला

PBKS vs KKR IPL 2021 Match 21 Results: पराभवांची मालिका खंडित, कोलकात्याची पंजाबवर 5 विकेट्सने मात

ना मोठं नाव, ना मोठा सेलिब्रिटी, ऑस्ट्रेलियाच्या दिलदार क्रिकेटपटूकडून भारताला लाखोंचा ऑक्सिजन बहाल

Non Stop LIVE Update
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?.
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.