सॉफ्ट सिग्नलचे ते दोन वादग्रस्त निर्णय, इरफान पठाणचं मजेदार ट्विट, म्हणतो, ‘हमारे पास शोलेवाले ठाकूर…’

भारताचा माजी खेळाडू इरफान पठाणने याच सॉफ्ट सिग्नलवरुन मजेशीर ट्विट केलंय. irfan pathan tweet on Umpire Soft Signal Contraversy

सॉफ्ट सिग्नलचे ते दोन वादग्रस्त निर्णय, इरफान पठाणचं मजेदार ट्विट, म्हणतो, 'हमारे पास शोलेवाले ठाकूर...'
irfan pathan Tweet
Follow us
| Updated on: Mar 20, 2021 | 7:32 AM

मुंबई : टीम इंडियाने गुरुवारी (दि.18 मार्च) पार पडलेल्या इंग्लंडवर चौथ्या टी 20 सामन्यात (india vs england 4th t2oi) 8 धावांनी शानदार विजय मिळवला. आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव (suryakumar yadav) या सामन्याचा हिरो ठरला. त्याने केवळ 31 चेंडूत धमाकेदार 57 धावांची खेळी केली. मात्र थर्ड अंपायर्सने त्याला विचित्र पद्धतीने बाद देऊन त्याची आक्रमक खेळी संपुष्टात आणली. तसंच ऑलराऊंडर वॉशिंग्टन सुंदर याच्याही बाबतीत हाच प्रकार घडला. सॉफ्ट सिग्रनच्या आधारे (Soft Signal) सूर्यकुमार आणि सुंदरला थर्ड अंपायरने बाद घोषित केलं. याच सॉफ्ट सिग्नलवरुन आता जगभरात चर्चा होऊ लागली आहे. अनेक माजी खेळाडू या निर्णयाचा फेरविचार व्हावा म्हणून मागणी करत आहेत. तर कुणी ट्विट करुन सॉफ्ट सिग्नलची खिल्ली उडवत आहे. भारताचा माजी खेळाडू इरफान पठाणने (irfan pathan) याच सॉफ्ट सिग्नलवरुन मजेशीर ट्विट केलंय. (irfan pathan tweet on Umpire Soft Signal Contraversy During India Vs England 4th T20)

सॉफ्ट सिग्नल निर्णयावर इरफानला शोलेतल्या ठाकूरची आठवण

इरफान पठाणने ट्विटमध्ये सॉफ्ट सिग्नल निर्णयाची तुलना ठाकूरबरोबर केली आहे. आपल्या जवळ तंत्रज्ञान आहे, तरीही आपण सॉफ्ट सिग्नलचा निर्णय घेतो. म्हणजेच आपल्याजवळ ठाकूर आहे पण शोलेमधला ठाकूर… असं मजेशीर ट्विट करुन या सॉफ्ट सिग्नल निर्णयावर इरफानने नाराजी व्यक्त केली आहे.

सॉफ्ट सिग्नल निर्णयावर वसीम जाफरची नाराजी

सॉफ्ट सिग्नल निर्णयावर वसीम जाफरने नाराजी व्यक्त केली आहे. तसंच आयसीसीला सॉफ्ट सिग्नल निर्णय नेमका का? असा प्रश्न विचारला आहे. महत्त्वाच्या मॅचमध्ये चांगल्या गोलंदाजांना अशा चुकीच्या निर्णयाचा फटका अनेक वेळा नाईलाजाने सहन करावा लागतो, अशी खंतही त्याने व्यक्त केली आहे.

काय आहे सॉफ्ट सिग्नल?

जर ग्राऊंड अम्पायर एखाद्या निर्णयावर ठाम नाहीत त्यावेळी ते तिसऱ्या अंपायरची मदत घेतात परंतु ती घेताना त्यांना आपला एक निर्णय द्यावा लागतो त्यालाच सॉफ्ट सिग्नल असं म्हणतात. हा सिग्नल आऊट किंवा नॉटआऊटचा असतो. आता थर्ड अंपायरने पण एखाद्या निर्णयावेळी 100 टक्के खात्रीशीर नसतील तर अशावेळी ते मैदानी अंपायरने दिलेल्या सॉफ्ट सिग्नलवर आपला पुढील निर्णय घेतात. अशावेळी मैदानी अंपायरने दिलेला निर्णय महत्त्वाचा ठरतो. सॉफ्ट सिग्नल आणण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे टू डायमेंशनल टीव्ही कॅमेरामध्ये व्हिज्युअल्स क्लिअर न दिसणे. याचमुळे बहुदा थर्ड अंपायर बॅट्समनला नॉट आऊट द्यायचे.

सॉफ्ट सिग्नलमध्ये बदलासाठी प्रस्ताव

सॉफ्ट सिग्नलमध्ये अनेक वेळा फलंदाजांना कारण नसताना तंबूत परतावं लागत आहे. अशावेळी सॉफ्ट सिग्नलमध्ये बदलासाठी प्रस्ताव आणण्याच्या विचार सुरु आहे.

(irfan pathan tweet on Umpire Soft Signal Contraversy During India Vs England 4th T20)

हे ही वाचा :

अंपायनरने दिलेला सॉफ्ट सिग्नल म्हणजे काय? ज्याच्यामुळे सूर्यकुमारची खेळी संपुष्टात आली!

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.