भारताच्या पराभवानंतर काश्मीरमध्ये अनेकांना हर्षवायू, गद्दारांचा चौका-चौकात जल्लोष

क्रिकेट वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पराभवामुळे टीम इंडियाचा प्रवास संपला आहे. भारताच्या या पराभवानंतर देशातील गद्दारांचे चेहरे समोर आले आहेत.

jammu kashmir locals celebrate indias deafeat by new zealand in icc world cup 2019, भारताच्या पराभवानंतर काश्मीरमध्ये अनेकांना हर्षवायू, गद्दारांचा चौका-चौकात जल्लोष

श्रीनगर : क्रिकेट वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पराभवामुळे टीम इंडियाचा प्रवास संपला आहे. भारताच्या या पराभवानंतर देशातील गद्दारांचे चेहरे समोर आले आहेत. भारताचा पराभव होताच, काश्मीरमधील गद्दारांनी हर्षवायू झाल्यासारखं, जल्लोष साजरा केला. भारताच्या पराभवानंतर जम्मू-काश्मीरमधील अनेक ठिकाणी जल्लोष साजरा केल्याचं पाहायला मिळालं. भारतात राहून, भारतात कमावून, भारताचं खाऊन पाकिस्तानचं गुणगुण गाणारे गद्दारच आहेत, अशी प्रतिक्रिया देशभरात उमटत आहे.

श्रीनगरमधील नौहट्टा चौकातील एक चित्र समोर आलं, ज्यामध्ये टीम इंडियाच्या पराभवानंतर गद्दारांची टोळी जल्लोषासाठी जमली होती. भारताच्या पराभवाचा जल्लोष फटाके फोडून साजरा करण्यात आला.

जम्मू काश्मीर युनिव्हर्सिटीतही टीम इंडियाच्या पराभवानंतर शिट्या-टाळ्या वाजवण्यात आल्या. इतकंच नाही तर या गद्दारांनी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्येही रॅली काढली.

इतकंच नाही तर जम्मू काश्मीरच्या अनेक चौकाचौकात हे चित्र पाहायला मिळत होतं. आतषबाजी झालीच शिवाय पाकिस्तानचे झेंडेही फडकावण्यात आले. या चित्रामुळे देशात राहणाऱ्या गद्दारांचं पाकिस्तान प्रेम दिसत होतं.

ईद-दिवाळीप्रमाणे इथे फटाके फोडण्यात येत होते. भारताच्या पराभवानंतर जल्लोष करणाऱ्यांना देशाचे दुष्मन म्हणायचं नाही तर काय, असा प्रश्न आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *