AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : वैभव सूर्यवंशी कुठे चुकतो ते जोफ्रा आर्चरने अचूक हेरलं, आता तिथेच वार करुन 13 चेंडूत 2 वेळा बनवलं गिऱ्हाईक VIDEO

IND vs ENG : वैभव सूर्यवंशीकडून कोट्यवधी भारतीय क्रिकेट चाहत्यांना बऱ्याच अपेक्षा आहेत. पण इंग्लंडमध्ये वैभव फेल ठरतोय. इंग्लंड विरूद्धच्या टी20 सीरीजमध्ये डेब्यू केल्यापासून तो संघर्ष करतोय. त्याला जोफ्रा आर्चरने आपलं गिऱ्हाईक बनवून टाकलय.

IND vs ENG : वैभव सूर्यवंशी कुठे चुकतो ते जोफ्रा आर्चरने अचूक हेरलं, आता तिथेच वार करुन 13 चेंडूत 2 वेळा बनवलं गिऱ्हाईक VIDEO
vaibhav sooryavanshi
| Updated on: Jul 10, 2026 | 9:36 AM
Share

Vaibhav sooryavanshi vs Jofra Archer : टीम इंडियाच्या आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्याची घोषणा झाली, तेव्हापासून एका खेळाडूची सर्वाधिक चर्चा झाली तो म्हणजे वैभव सूर्यवंशी. दौऱ्यातील पहिल्या तीन सामन्यात वैभव सूर्यवंशीला संधी मिळाली नाही. त्यावरुन टीम मॅनेजमेंटवर बरीच टीका झाली. त्यानंतर आतापर्यंत सलग तीन सामन्यात संधी मिळूनही वैभव सूर्यवंशीला प्रभाव पाडता आलेला नाही. त्याच्याकडून या सीरीजमध्ये बऱ्याच अपेक्षा होत्या. पण वैभवला अपेक्षेनुसार प्रदर्शन करता आलेलं नाही. त्याच्यामध्ये भरपूर टॅलेंट आहे. टीम इंडियाचा भविष्यातील स्टार म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. पण वैभवला अजून छाप उमटवणारी कामगिरी करता आलेली नाही. आयर्लंड विरुद्ध त्याला संधी मिळाली नाही. इंग्लंड विरूद्धच्या टी20 सीरीजमध्ये डेब्यू केल्यापासून तो संघर्ष करतोय.

राजस्थान रॉयल्सच्या नेट्समध्ये जोफ्रा आर्चर विरुद्ध वैभव सूर्यवंशी बिनधास्त मोठमोठे फटके खेळत होता. आता त्याच आर्चरने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये वैभवची कमकुवत बाजू समोर आणली आहे. आयपीएल 2026 मध्ये वैभव सूर्यवंशी आणि जोफ्रा आर्चर दोघे राजस्थान रॉयल्स टीमकडून खेळत होते. फ्रेंचायजीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये वैभव नेट्समध्ये आर्चरच्या गोलंदाजीवर सहज मोठ मोठे फटके खेळताना दिसला होता. आयपीएलमध्ये वैभवने जसप्रीत बुमराह, मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स या जगातील दिग्गज वेगवान गोलंदाजांच्या गोलंदाजीवर सहज षटकार मारले होते.

कमकुवत बाजूवर हल्ला

पण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये परिस्थिती वेगळी आहे. इंग्लंडच्या वेगवान आणि अतिरिक्त उसळी असलेल्या पीचेसवर आर्चरने आपला स्पीड आणि बाऊन्सचा पुरेपूर फायदा उचलला. त्याने वैभवला मुक्तपणे खेळूच दिलं नाही. त्याच्या कमकुवत बाजूवर हल्ला केला. इंग्लंडमध्ये सिनियर टीमकडून पहिला टी20 सामना खेळताना वैभव सूर्यवंशीला स्पिनर विल जॅक्सने आऊट केलं. त्या सामन्यातही जोफ्रा आर्चरने त्याला शॉर्ट पीच चेंडूंवर हैराण केलं होतं. दुसऱ्या आणि तिसऱ्या टी20 सामन्यातही आर्चरने हीच रणनिती कायम ठेवली. दोन्ही सामन्यात शॉर्ट पीच चेंडूवरच त्याने वैभवला बाद केलं.

या सीरीजमध्ये आर्चरने आतापर्यंत वैभव सूर्यवंशीला 13 चेंडू टाकले आहेत. यात दोनवेळा वैभवचा विकेट त्याने घेतला आहे. वैभव त्याच्या गोलंदाजीवर 18 धावा केल्या आहेत. यात दोन षटकार आहेत.

Follow Us
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा
'मुंबईतील शाळा तपासणी अधिकाऱ्यांची पदे तातडीने भरण्याचे आदेश'
आशिष शेलार यांचे मुंबईतील शाळा तपासणी अधिकाऱ्यांची पदे तातडीने भरण्याचे आदेश
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी, CM Fadnavis यांची प्रतिक्रिया
महाराष्ट्रात शेतकऱ्यांना दिलासा: शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी, CM Fadnavis यांची प्रतिक्रिया
'2029 पर्यंतच फडणवीसांना पंतप्रधान होण्याची संधी'- विजय वडेट्टीवार
Vijay Wadettiwar On Devendra Fadnavis : '2029 पर्यंतच फडणवीसांना पंतप्रधान होण्याची संधी'
सांताक्रुझमध्ये डॉक्टरावर नशेत रुग्णाला औषध दिल्याचा आरोप
Mumbai : सांताक्रुझमध्ये डॉक्टरावर नशेत रुग्णाला औषध दिल्याचा आरोप