AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ENG vs IND : वाइड टाकणारा इंग्लंडचा खराब बॉलर टीम इंडियावर पडला भारी, काढल्या दोन महत्त्वाच्या विकेट, VIDEO

ENG vs IND : ओव्हल कसोटीच्या पहिल्या दिवशी इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना त्रास दिला. या दरम्यान एका बॉलरने आपल्या गोलंदाजीने सर्वांनाच चक्रावून टाकलं. दिशाहीन गोलंदाजी करुनही त्याने इंग्लंडला दोन महत्त्वाचे विकेट काढून दिले.

ENG vs IND : वाइड टाकणारा इंग्लंडचा खराब बॉलर टीम इंडियावर पडला भारी, काढल्या दोन महत्त्वाच्या विकेट, VIDEO
ENG vs INDImage Credit source: PTI
| Updated on: Aug 01, 2025 | 10:29 AM
Share

भारत-इंग्लंड टेस्ट सीरीज दरम्यान वेगवान गोलंदाजांना खूप मेहनत करावी लागली. सीरीजमधील पहिले चार सामने फलंदाजांना अनुकूल खेळपट्टीवर झाले. त्यामुळे गोलंदाजांना अडचणींचा सामना करावा लागला. विकेटसाठी बरीच वाट पहावी लागली. पण ओव्हलच्या अखेरच्या टेस्ट मॅचमध्ये गवत असलेला पीच मिळताच वेगवान गोलंदाजांचा कहर पहायला मिळाला. यात इंग्लंडच्या त्या गोलंदाजाला सर्वात जास्त यश मिळालं, ज्याने सर्वात जास्त खराब गोलंदाजी केली. हा बॉलर आहे जॉश टंग.

लंडनच्या केनिंग्टन ओव्हल स्टेडियमवर 31 जुलैपासून सीरीजमधील अखेरचा कसोटी सामना सुरु झाला आहे. पाचव्या कसोटीत वेगवान गोलंदाजांना मदत करणारी खेळपट्टी आहे. याआधी चार कसोटी सामन्यात पीचवर विशेष गवत नव्हतं. ओव्हलच्या पीचवर मात्र गवत आहे. पहिल्या दिवसापासून आकाशात ढग आहेत. पाऊसही झाला. त्यामुळे पहिल्या दिवशी प्रथम गोलंदाजी करणाऱ्या इंग्लंडच्या टीमला मदत झाली.

मागचे दोन कसोटी सामने त्याला बाहेर बसवलेलं

इंग्लंडकडून एटकिंसन आणि क्रिस वोक्सने चांगली गोलंदाजी केली. जेमी ओवर्टनच्या गोलंदाजीवर सहज धावा निघाल्या. सर्वात जास्त चक्रावून टाकणारी गोलंदाजी जॉश टंगने केली. त्याला मागचे दोन कसोटी सामने बाहेर बसवण्यात आलं होतं. टंगला पहिल्या दिवशी आपल्या प्रत्येक स्पेलमध्ये लाइन-लेंग्थसाठी संघर्ष करावा लागला. याची सुरुवात पहिल्या ओव्हरपासून झाली. त्याने 3 वाइड चेंडू टाकले. यात दोनवेळा चेंडू इतका लांब होता की, विकेटकीपरलाही रोखता आला नाही. अतिरिक्त 4-4 धावा मिळाल्या. सुरुवातीच्या 9 ओव्हरमध्ये जॉश टंगने 4 वाइट बॉल टाकले. यात दोन अतिरिक्त चौकारांसह 12 धावा दिल्या.

असे दोन चेंडू टाकले, की खेळणं मुश्किल

इतकच नाही, प्रत्येक ओव्हरमध्ये त्याचे 2 ते 3 चेंडू ऑफ स्टम्प आणि लेग स्टम्पच्या भरपूर बाहेर चाललेले. विकेटकीपर जेमी स्मिथने ते चेंडू रोखून धावा वाचवल्या. मात्र, असं असतानाही जॉश टंगने असे दोन चेंडू टाकले, जे खेळणं कुठल्याही फलंदाजासाठी अशक्य होतं. त्याने साई सुदर्शनची पहिली विकेट काढली. 107 चेंडू खेळून सुदर्शनने विकेटवर पाय रोवले होते.

भारतीय फलंदाजांसाठी एक कोडंच ठरला

त्यानंतर त्याने रवींद्र जाडेजाचा विकेट काढला. मागच्याच सामन्यात जाडेजाने शानदार शतक झळकावलं होतं. टंगने ऑफ स्टम्पच्या खूप जवळ चेंडू टाकलेला. जाडेजा सुद्धा सुदर्शन सारखाच आऊट झाला. जाडेजाने यावेळी फक्त 9 धावा केल्या. टंग भारतीय फलंदाजांसाठी एक कोडंच ठरला. खराब गोलंदाजी करुनही त्याने इंग्लंडला महत्त्वपूर्ण यश मिळवून दिलं. जॉश टंगने 13 ओव्हरमध्ये 47 धावा देऊन दोन महत्त्वाच्या विकेट काढल्या.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.