AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aravinda de silva : ज्याच्या बळावर श्रीलंकेने जिंकला पहिला क्रिकेट वर्ल्ड कप त्याच्या घरात डेडबॉडी सापडल्याने एकच खळबळ

Aravinda de silva : अरविंद डी सिल्वा हे श्रीलंकन क्रिकेटमधील मोठं नाव आहे. त्यांच्या घरात श्रीलंकन एअरलाइन्सच्या माजी CEO चा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. अरविंद डी सिल्वा यांच्यामुळेच श्रीलंकेला पहिला क्रिकेट वर्ल्ड कप जिंकता आला.

Aravinda de silva : ज्याच्या बळावर श्रीलंकेने जिंकला पहिला क्रिकेट वर्ल्ड कप त्याच्या घरात डेडबॉडी सापडल्याने एकच खळबळ
Aravinda de silvaImage Credit source: icc
| Updated on: May 09, 2026 | 9:58 AM
Share

श्रीलंकेचे माजी क्रिकेटपटू अरविंद डी सिल्वा यांच्या घरात श्रीलंकन एअरलाइन्सच्या माजी CEO चा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. 1996 साली श्रीलंकेच्या क्रिकेट टीमने पहिल्यांदा वनडे वर्ल्ड कप जिंकला. या वर्ल्ड कप विजयात अरविंद डी सिल्वा यांचं महत्वाचं योगदान होतं. श्रीलंकन एअरलाइन्सचे माजी CEO कपिल चंद्रसेना शुक्रवारी सकाळी कोलंबो येथील कोल्लुपिटिया भागातील डि सिल्वा यांच्या घरात मृतावस्थेत आढळले. ही घटना संपूर्ण श्रीलंकेत चर्चेचा विषय बनली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेड्रिस प्लेस येथील घरात कपिला चंद्रसेना यांचा मृतदेह आढळला. हे घर अरविंद डी सिल्वा यांच्या मालकीचं असल्याचं बोललं जातं. प्राथमिक तपासात आत्महत्येची शंका व्यक्त करण्यात आली आहे. पोस्टमार्ट रिपोर्ट आणि सखोल तपासानंतरच मृत्यूचं खरं कारण समजेल.

dailymirror.lk रिपोर्टनुसार कपिल चंद्रसेना आणि अरविंद डि सिल्वा दोघे नातेवाईक होते. दोन्ही कुटुंबात जवळचे संबंध होते. चंद्रसेना यांची पत्नी प्रियंका नियोमाली विजयनायके आणि अरविंदा डी सिल्वा यांची पत्नी अनुष्का डी सिल्वा नात्यात बहिणी आहेत. कपिला गुरुवारी अरविंदा यांच्या घरी आले होते. कपिला चंद्रसेना मागच्या काही काळापासून भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे चर्चेत होते. त्यांच्यावर आणि त्यांच्या बायकोवर 2.3 अब्ज अमेरिकी डॉलरच्या विमान खरेदी व्यवहारात लाच घेतल्याचा आरोप झाला होता. तपास यंत्रणांनुसार ब्रुनेईच्या एका शेल कंपनीद्वारे जवळपास 20 लाख डॉलर्सची लाच स्वीकारण्यात आली होती.

अर्जुना राणातुंगा सुद्धा घटनास्थळी आला

मिडिया रिपोर्ट्सनुसार अलीकडेच न्यायालयाने चंद्रसेना यांच्या अटकेचं वॉरंट काढलं होतं. कोर्टाच्या जामिनाच्या अटीचं उल्लंघन केल्याचा त्यांच्यावर आरोप झाला होता. या घटनेची माहिती मिळताच कोलंबोच्या मुख्य मॅजिस्ट्रेटने घटनास्थळी पोहोचून तपास सुरु केला आहे. श्रीलंकेचा माजी कर्णधार अर्जुना राणातुंगा सुद्धा घटनास्थळी आला आहे.

वर्ल्ड कप फायनलमध्ये अशी कामगिरी करणारे ते एकमेव खेळाडू

अरविंदा डी सिल्वाची श्रीलंकन क्रिकेटच्या इतिहासातील महान फलंदाजांमध्ये गणना होते. 1996 वनडे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये त्यांनी शानदार शतक झळकवण्यासह तीन विकेट घेतले होते. आतापर्यंत वर्ल्ड कप फायनलमध्ये अशी कामगिरी करणारे ते एकमेव खेळाडू आहेत. त्यांच्या प्रदर्शनाच्या बळावरच श्रीलंकेने पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकला होता.

Follow Us
नाशिक धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड! धर्मांतर, हिजाब ट्रेनिंग.....
नाशिक धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड! धर्मांतर, हिजाब ट्रेनिंग......
अखेर ठरलं! हा नेता होणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री
अखेर ठरलं! हा नेता होणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री.
तामिळनाडूत राजकीय खळबळ! थलपती विजय सरकार स्थापनेच्या उंबरठ्यावर?
तामिळनाडूत राजकीय खळबळ! थलपती विजय सरकार स्थापनेच्या उंबरठ्यावर?.
मी पालकमंत्र्यांना काडीमात्र भाव देत नाही, पालकमंत्री पोलीस आहेत का?
मी पालकमंत्र्यांना काडीमात्र भाव देत नाही, पालकमंत्री पोलीस आहेत का?.
TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान गरोदर?
TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान गरोदर?.
निदा खान प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट... एमआयएमचा नगरसेवक सहआरोपी
निदा खान प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट... एमआयएमचा नगरसेवक सहआरोपी.
नाशिक TCS प्रकरणातील मास्टरमाईंडला बेड्या; 42 दिवस पोलिसांना गुंगारा..
नाशिक TCS प्रकरणातील मास्टरमाईंडला बेड्या; 42 दिवस पोलिसांना गुंगारा...
जय पवारांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट....
जय पवारांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट.....
बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय....
बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय.....
दहावीच्या निकालात कोकण विभाग पुन्हा अव्वल; राज्याचा निकाल 92.09 टक्के
दहावीच्या निकालात कोकण विभाग पुन्हा अव्वल; राज्याचा निकाल 92.09 टक्के.