AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SSC Result | दहावीच्या निकालात कोकण विभाग पुन्हा अव्वल; राज्याचा निकाल 92.09 टक्के तर, सर्वात कमी निकाल कोणत्या विभागाचा?

SSC Result | दहावीच्या निकालात कोकण विभाग पुन्हा अव्वल; राज्याचा निकाल 92.09 टक्के तर, सर्वात कमी निकाल कोणत्या विभागाचा?

| Updated on: May 08, 2026 | 11:57 AM
Share

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या (SSC) परीक्षेचा निकाल आज अधिकृतपणे जाहीर करण्यात आला. यंदा राज्याचा एकूण निकाल 92.09 टक्के लागला असून, कोकण विभागाने पुन्हा एकदा राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. कोकण विभागाचा निकाल तब्बल 97.62 टक्के लागला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या (SSC) परीक्षेचा निकाल आज अधिकृतपणे जाहीर करण्यात आला. यंदा राज्याचा एकूण निकाल 92.09 टक्के लागला असून, कोकण विभागाने पुन्हा एकदा राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. कोकण विभागाचा निकाल तब्बल 97.62 टक्के लागला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यंदाच्या परीक्षेत राज्यभरातील 14 लाख 20 हजार 486 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी निकालात बाजी मारली आहे. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 94.96 टक्के इतके नोंदवण्यात आले असून, मुलांचा निकाल 89.56 टक्के लागला आहे. त्यामुळे मुलींचा निकाल मुलांच्या तुलनेत 5.40 टक्क्यांनी अधिक ठरला आहे.
दरम्यान, विभागनिहाय निकालात कोकण विभागाने सर्वोत्तम कामगिरी केली असताना, छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे. या विभागाचा निकाल 88.41 टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. दहावीचा निकाल जाहीर होताच राज्यभरातील विद्यार्थी आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत असून, उत्तीर्ण विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

 

Published on: May 08, 2026 11:55 AM
Follow Us