AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kieron Pollard: मुंबई इंडियन्सचा हेड कोच होताच पोलार्डचा मोठा निर्णय, 24 तासांमध्येच दिला CSK ला धक्का!

Kieron Pollard News: किरॉन पोलार्डने मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षकपद हाती घेतलाच एक मोठा निर्णय घेतला आहे. त्याने थेट सुपर किंग्जला मोठा धक्का दिला आहे.

Kieron Pollard: मुंबई इंडियन्सचा हेड कोच होताच पोलार्डचा मोठा निर्णय, 24 तासांमध्येच दिला CSK ला धक्का!
| Updated on: Oct 26, 2026 | 7:57 AM
Share

Kieron Pollard Mumbai Indians Head Coach: किरॉन पोलार्डची नुकतीच मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली होती. त्यानंतर लगेचच, पोलार्डने दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० लीग, एसए२० (SA20) मधून माघार घेण्याचा निर्णय घेतला. या ३९ वर्षीय खेळाडूला लीगच्या लिलावात जोबर्ग सुपर किंग्सने विकत घेतले होते. त्याने सुपर किंग्सच्या व्यवस्थापनाला आपल्या अनुपलब्धतेबद्दल कळवले आहे. पोलार्डने दुसऱ्या फ्रँचायझीसाठी खेळण्यास मुंबई इंडियन्सला कोणतीही हरकत नव्हती, असे क्रिकबझने (Cricbuzz) वृत्त दिले आहे.

जोबर्ग सुपर किंग्स ही आयपीएल फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्सच्या मालकीची आहे. क्रिकबझच्या वृत्तानुसार, चेन्नई सुपर किंग्स आणि सर्व सुपर किंग्स फ्रँचायझींचे सीईओ, कासी विश्वनाथन यांनी पोलार्डच्या निर्णयाला दुजोरा दिला. ते म्हणाले, “त्याने आम्हाला कळवले आहे की तो जोबर्ग सुपर किंग्ससाठी खेळू शकणार नाही. आम्ही आता त्याच्या बदली खेळाडूचा शोध घेऊ.”

किरॉन पोलार्ड मुंबई इंडियन्स सहभागी असलेल्या कोणत्याही लीगमध्ये दुसऱ्या कोणत्याही फ्रँचायझीसाठी खेळलेला नाही. SA20 लिलावात जोबर्ग सुपर किंग्सने पोलार्डला १५ लाख दक्षिण आफ्रिकन रँडमध्ये विकत घेतले. तो गेल्या हंगामापर्यंत एमआय केप टाऊन संघाचा भाग होता, परंतु फ्रँचायझीने लिलावात त्याच्यासाठी बोलीही लावली नाही. त्याऐवजी एमआयने सहकारी वेस्ट इंडियन खेळाडू शिमरॉन हेटमायरला विकत घेतले.

वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार कायरोन पोलार्ड २०१० मध्ये आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघात सामील झाला. तो २०२२ पर्यंत या फ्रँचायझीसोबत राहिला. १३ हंगामांमध्ये पोलार्डने संघाला पाच विजेतेपदे जिंकण्यास मदत केली. त्याने २०२३ च्या हंगामापूर्वी आयपीएलमधून निवृत्ती घेतली. पोलार्डच्या जाण्यानंतर मुंबई इंडियन्सने एकही विजेतेपद जिंकलेले नाही. पोलार्डने एमआय केप टाऊनसाठी १२, एमआय न्यूयॉर्कसाठी ३० आणि एमआय एमिरेट्ससाठी २५ सामने खेळले आहेत.

मागील हंगामात मुंबईची कामगिरी अतिशय वाईट पाहायला मिळाली. पुढील हंगामासाठी मुंबईच्या संघात अनेक बदल पाहायला मिळेल अशी शक्यता नाकारता येत नाही. पहिला बदल तर मुख्य प्रशिक्षक बदलून संघाने घेतला आहेच. आता संघ कर्णधारही बदलणार असल्याचे म्हटले जात आहे.

Follow Us
PM मोदींच्या वडिलांबाबत खर्गेंचे वादग्रस्त विधान, सभेतच युवकांनी...
PM मोदींच्या वडिलांबाबत खर्गेंचे वादग्रस्त विधान, सभेतच युवकांनी केला राडा; म्हणाले, पंतप्रधान कुठेच जाणार नाही...
किनगावमध्ये RSS पथसंचलनावर दगडफेकीचा प्रयत्न; पोलिसांचा मोठा बंदोबस्त,
किनगावमध्ये RSS पथसंचलनावर दगडफेकीचा प्रयत्न; पोलिसांचा मोठा बंदोबस्त, नेमकं काय घडलं?
500 कोटींच्या ओडिओ क्लिपचं प्रकरण अचानक बंद का झालं? कारण, जरांगे...
500 कोटींच्या ओडिओ क्लिपचं प्रकरण अचानक बंद का झालं? कारण, जरांगे म्हणाले...
वरळी ते नवी मुंबई विमानतळ प्रवास होणार ट्राफिक फ्री! विकासकामांचे...
वरळी ते नवी मुंबई विमानतळ प्रवास होणार ट्राफिक फ्री! विकासकामांचे उद्घाटन
आकाशात भारतीय वायुसेनेचा थरार! वाराणसीत ‘विंग्स ओव्हर गंगा’ एअर शो;
आकाशात भारतीय वायुसेनेचा थरार! वाराणसीत ‘विंग्स ओव्हर गंगा’ एअर शो; मोदींची उपस्थिती
कर्ज घेतलं अन् अचानक बेपत्ता झाले! नांदेडमधील दोन शेतकरी...
कर्ज घेतलं अन् अचानक बेपत्ता झाले! नांदेडमधील दोन शेतकरी... फायनान्स कपनीवर संशय
ऑडिओ क्लिप प्रकरणावरून मनोज जरांगे आक्रमक; मराठा आंदोलन दडपण्याचा कट
ऑडिओ क्लिप प्रकरणावरून मनोज जरांगे आक्रमक; मराठा आंदोलन दडपण्याचा कट
राष्ट्रवादीच्या पडद्यामागे हालचाली? गुप्त बैठकीनंतर चर्चांना उधाण!
राष्ट्रवादीच्या पडद्यामागे हालचाली? गुप्त बैठकीनंतर चर्चांना उधाण!
भीमाशंकरच्या जंगलावर कुऱ्हाड! अडीच लाख झाडांच्या रक्षणासाठी ग्रामस्थ..
भीमाशंकरच्या जंगलावर कुऱ्हाड! अडीच लाख झाडांच्या रक्षणासाठी ग्रामस्थ राज ठाकरेंच्या भेटीला
गोकुळच्या विजयाचा जल्लोष! सतेज पाटील यांचा पुण्यात भव्य सत्कार,
गोकुळच्या विजयाचा जल्लोष! सतेज पाटील यांचा पुण्यात भव्य सत्कार, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत