AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sachin Pilgaonkar: सतत स्वत:विषयी का बोलतात महागुरु? सचिन पिळगावकर यांनी सांगितले कारण

Sachin Pilgaonkar: नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सचिन पिळगावकर यांनी अनेक गोष्टींबाबत वक्तव्य केले आहे. त्यांनी स्वत: विषयी मोठा खुलासा केला आहे. ते नेमकं काय म्हणाले? चला जाणून घ्या...

| Updated on: Oct 26, 2026 | 7:55 AM
Share
मराठीसह बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण करणारे अभिनेते म्हणून सचिन पिळगावकर ओळखले जातात. ते अनेक मुलाखतींमध्ये स्वत:विषयी बोलताना दिसतात. ते त्यांचे अनुभव चाहत्यांसोबत शेअर करताना दिसतात. त्यामुळे त्यांना ट्रोल देखील केले जाते. आता सचिन पिळगावकर यांनी स्वत: बद्दल इतके बोलण्यामागचे कारण सांगितले आहे. ते कारण काय आहे? चला जाणून घेऊया...

1 / 5
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सचिन पिळगावकर म्हणाले, “बरेच लोकांना अजूनही माहिती नाही की मी लहानपणापासूनच काम करतोय. वयाच्या साडेचार वर्षांपासून मी कॅमेऱ्यासमोर उभा आहे आणि परमेश्वराच्या कृपेने दरवर्षी मी काम केले आहे. असं एकही वर्ष गेलेले नाही ज्यात मी काम केले नाही.

2 / 5
आश्चर्य वाटेल, पण माझा शेवटचा बालकलाकार म्हणून केलेला चित्रपट, माझ्या हिरोच्या चित्रपटाच्या प्रदर्शनांनंतर आला. कारण तो चित्रपट बनवायला सहा वर्षे लागली होती. मी ‘बैराग’मध्ये काम करत होतो. त्यात मी युसूफ भाईंचे म्हणजे दिलीप कुमार साहेबांचे बालपण साकारले होते. ‘गीत गाता चल’ १९७५ मध्ये प्रदर्शित झाला. १९७६ मध्ये ‘बालिका बधु’ आणि ‘बैराग’ दोन्ही एकत्र प्रदर्शित झाले असे सचिन म्हणाले.

3 / 5
शोलेचा उल्लेख करत सचिन पिळगावकर म्हणाले, "बालकलाकारापासून प्रौढ अभिनेत्यापर्यंतचा हा प्रवास होता. मी स्वतःला हिरो म्हणणार नाही, कारण मी लीडिंग मॅन नव्हतो तर लीडिंग बॉय होतो. ‘गीत गाता चल’ प्रदर्शित झाला तेव्हा मी अठरा वर्षे पूर्ण केली होती. ‘शोले’ प्रदर्शित झाला तेव्हा मी अठरा वर्षे पूर्णही केली नव्हती. पण १५ ऑगस्टला चित्रपट आला आणि १७ ऑगस्टला मी अठरा वर्षांचा झालो.”

4 / 5
पुढे ते म्हणाले, “मी ज्यांच्यासोबतचे अनुभव सांगतो, त्यातील बरीच मंडळी आता हयात नाहीत. त्यामुळे त्यांच्यासोबत घडलेल्या गोष्टी, जे फॅक्ट्स मला माहीत आहेत, तेच मी सांगतो. काही लोकांना वाटते की मी खोटे बोलतोय. अरे, मी माझ्याच आयुष्याबद्दल बोलतोय! तुम्हाला हेवा वाटू शकतो की या माणसाने बलराज साहनीसोबत, मीनाकुमारीसोबत काम केले. ते तुम्ही आता करू शकत नाही, कारण वय वेगळे आहे. हेवा वाटणे वेगळे, पण त्यामुळे मी खोटे बोलतोय असं समजायला नको. मी स्वतःचे अनुभव सांगतो तेव्हा माझ्या आयुष्यात घडलेल्या गोष्टीच सांगणार. तुमच्या आयुष्यात काय घडले ते मी कसे सांगू? म्हणून मी बोलताना ‘मी’ हा शब्द वारंवार येतो. माझ्या आयुष्याबद्दल बोलतोय तर ‘मी’ कसा टाळणार?”

5 / 5
Follow Us
PM मोदींच्या वडिलांबाबत खर्गेंचे वादग्रस्त विधान, सभेतच युवकांनी...
PM मोदींच्या वडिलांबाबत खर्गेंचे वादग्रस्त विधान, सभेतच युवकांनी केला राडा; म्हणाले, पंतप्रधान कुठेच जाणार नाही...
किनगावमध्ये RSS पथसंचलनावर दगडफेकीचा प्रयत्न; पोलिसांचा मोठा बंदोबस्त,
किनगावमध्ये RSS पथसंचलनावर दगडफेकीचा प्रयत्न; पोलिसांचा मोठा बंदोबस्त, नेमकं काय घडलं?
500 कोटींच्या ओडिओ क्लिपचं प्रकरण अचानक बंद का झालं? कारण, जरांगे...
500 कोटींच्या ओडिओ क्लिपचं प्रकरण अचानक बंद का झालं? कारण, जरांगे म्हणाले...
वरळी ते नवी मुंबई विमानतळ प्रवास होणार ट्राफिक फ्री! विकासकामांचे...
वरळी ते नवी मुंबई विमानतळ प्रवास होणार ट्राफिक फ्री! विकासकामांचे उद्घाटन
आकाशात भारतीय वायुसेनेचा थरार! वाराणसीत ‘विंग्स ओव्हर गंगा’ एअर शो;
आकाशात भारतीय वायुसेनेचा थरार! वाराणसीत ‘विंग्स ओव्हर गंगा’ एअर शो; मोदींची उपस्थिती
कर्ज घेतलं अन् अचानक बेपत्ता झाले! नांदेडमधील दोन शेतकरी...
कर्ज घेतलं अन् अचानक बेपत्ता झाले! नांदेडमधील दोन शेतकरी... फायनान्स कपनीवर संशय
ऑडिओ क्लिप प्रकरणावरून मनोज जरांगे आक्रमक; मराठा आंदोलन दडपण्याचा कट

राष्ट्रवादीच्या पडद्यामागे हालचाली? गुप्त बैठकीनंतर चर्चांना उधाण!

भीमाशंकरच्या जंगलावर कुऱ्हाड! अडीच लाख झाडांच्या रक्षणासाठी ग्रामस्थ..
भीमाशंकरच्या जंगलावर कुऱ्हाड! अडीच लाख झाडांच्या रक्षणासाठी ग्रामस्थ राज ठाकरेंच्या भेटीला
गोकुळच्या विजयाचा जल्लोष! सतेज पाटील यांचा पुण्यात भव्य सत्कार,
गोकुळच्या विजयाचा जल्लोष! सतेज पाटील यांचा पुण्यात भव्य सत्कार, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत