AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिनेत्रीचं मायक्रोमॅक्सच्या को-फाऊंडरशी लग्न, सोडलं बॉलिवूड; 7 वर्षांच्या लेकीसाठी घरात मोठे निर्बंध

| Updated on: Oct 26, 2026 | 7:57 AM
Share
बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारी अभिनेत्री असिन थोट्टुमकल सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर असली, तरी तिच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा कायम असते. मायक्रोमॅक्सचे सहसंस्थापक राहुल शर्मा यांच्याशी लग्न केल्यानंतर असिनने मनोरंजनविश्वापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला.

1 / 9
आता ती आपला बहुतांश वेळ कुटुंबासाठी आणि मुलीच्या संगोपनासाठी देत आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत राहुल शर्मा यांनी मुलगी अरिनच्या संगोपनाबाबत काही खास गोष्टी सांगितल्या आहेत.

2 / 9
राहुल शर्मा यांनी MyGov India सोबतच्या संवादात पत्नी असिन आणि मुलगी अरिन रेन शर्मा हिच्याबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केलं. अरिन अवघ्या सात वर्षांची असून तिला जवळपास 12 भाषा समजतात आणि बोलताही येतात. यामध्ये कोरियन, जपानी, थाई आणि चिनी भाषांचाही समावेश आहे, असं त्याने सांगितलं.

3 / 9
अरिनची ही भाषिक क्षमता ऐकून अनेकांना आश्चर्य वाटू शकतं. स्वतः राहुल यांनीही याबाबत गंमतीशीर प्रतिक्रिया दिली. त्यांना दोन भाषा बोलतानाही अडचण येते, तर त्यांची मुलगी अनेक भाषांमध्ये संवाद साधू शकते, असं त्यांनी सांगितलं. अरिनच्या जडणघडणीत असिनचं योगदान महत्त्वाचं असल्याचंही त्यांनी आवर्जून नमूद केलं.

4 / 9
आजच्या डिजिटल युगात लहान मुलांचं स्क्रीन टाइम कमी करणं हे पालकांसमोरील मोठं आव्हान बनलं आहे. अनेक मुलांचा बराच वेळ मोबाइल, टीव्ही आणि इतर डिजिटल उपकरणांवर जातो. मात्र, असिन आणि राहुल यांनी आपल्या मुलीच्या संगोपनासाठी वेगळी पद्धत स्वीकारली आहे.

5 / 9
राहुल यांनी सांगितलं की, त्यांनी आतापर्यंत अरिनला स्क्रीन वापरण्याची सवय लावलेली नाही. त्यांच्या घरात टीव्ही नाही आणि मुलीला मोबाइल फोनही दिलेला नाही. त्याऐवजी त्यांच्या घरात पुस्तकांना विशेष महत्त्व आहे. राहुल यांच्या मते, त्यांच्या घरात कदाचित अरिनच्या शाळेपेक्षाही अधिक पुस्तकं असतील.

6 / 9
अरिन सध्या दुसरीच्या वर्गात शिकत आहे. मात्र, त्यांच्या घरात आठवी आणि नववीच्या वर्गातील पुस्तकांचाही संग्रह आहे. राहुल गंमतीने म्हणतात की, कधी कधी अरिनला थेट दहावीची बोर्डाची परीक्षाही द्यायला सांगावी, असं त्यांना वाटतं.

7 / 9
राहुल शर्मा यांनी पत्नी असिनचे कौतुक करताना ती आपल्यासाठी खंबीर आधार असल्याचं सांगितलं. आयुष्यात कोणतीही अडचण आली, तरी असिन त्यांना काळजी करू नका आणि पुढे जात राहा, असा विश्वास देते. जोडीदाराने आपल्याला मागे खेचण्याऐवजी पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे, असंही राहुल यांनी स्पष्ट केलं.

8 / 9
असिनने 2016 मध्ये राहुल शर्मा यांच्याशी विवाह केल्यानंतर चित्रपटांपासून अंतर राखलं. आमिर खानसोबतच्या 'गजनी' चित्रपटामुळे तिला हिंदी चित्रपटसृष्टीत मोठी लोकप्रियता मिळाली होती. 'रेडी', 'हाऊसफुल 2' आणि 'खिलाडी 786' यांसारख्या चित्रपटांतूनही तिने प्रेक्षकांची मनं जिंकली.

9 / 9
Follow Us
PM मोदींच्या वडिलांबाबत खर्गेंचे वादग्रस्त विधान, सभेतच युवकांनी...
PM मोदींच्या वडिलांबाबत खर्गेंचे वादग्रस्त विधान, सभेतच युवकांनी केला राडा; म्हणाले, पंतप्रधान कुठेच जाणार नाही...
किनगावमध्ये RSS पथसंचलनावर दगडफेकीचा प्रयत्न; पोलिसांचा मोठा बंदोबस्त,
किनगावमध्ये RSS पथसंचलनावर दगडफेकीचा प्रयत्न; पोलिसांचा मोठा बंदोबस्त, नेमकं काय घडलं?
500 कोटींच्या ओडिओ क्लिपचं प्रकरण अचानक बंद का झालं? कारण, जरांगे...
500 कोटींच्या ओडिओ क्लिपचं प्रकरण अचानक बंद का झालं? कारण, जरांगे म्हणाले...
वरळी ते नवी मुंबई विमानतळ प्रवास होणार ट्राफिक फ्री! विकासकामांचे...
वरळी ते नवी मुंबई विमानतळ प्रवास होणार ट्राफिक फ्री! विकासकामांचे उद्घाटन
आकाशात भारतीय वायुसेनेचा थरार! वाराणसीत ‘विंग्स ओव्हर गंगा’ एअर शो;
आकाशात भारतीय वायुसेनेचा थरार! वाराणसीत ‘विंग्स ओव्हर गंगा’ एअर शो; मोदींची उपस्थिती
कर्ज घेतलं अन् अचानक बेपत्ता झाले! नांदेडमधील दोन शेतकरी...
कर्ज घेतलं अन् अचानक बेपत्ता झाले! नांदेडमधील दोन शेतकरी... फायनान्स कपनीवर संशय
ऑडिओ क्लिप प्रकरणावरून मनोज जरांगे आक्रमक; मराठा आंदोलन दडपण्याचा कट

राष्ट्रवादीच्या पडद्यामागे हालचाली? गुप्त बैठकीनंतर चर्चांना उधाण!

भीमाशंकरच्या जंगलावर कुऱ्हाड! अडीच लाख झाडांच्या रक्षणासाठी ग्रामस्थ..
भीमाशंकरच्या जंगलावर कुऱ्हाड! अडीच लाख झाडांच्या रक्षणासाठी ग्रामस्थ राज ठाकरेंच्या भेटीला
गोकुळच्या विजयाचा जल्लोष! सतेज पाटील यांचा पुण्यात भव्य सत्कार,
गोकुळच्या विजयाचा जल्लोष! सतेज पाटील यांचा पुण्यात भव्य सत्कार, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत