AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरळ वाचा की उलटं, या खेळाडूच्या नावात होत नाही काहीच बदल?; जगातील एकमेव खेळाडू… नावाचा अर्थही घ्या समजून

वर्ल्ड टेस्ट चँपियनशिप 2025 च्या जेतेपदाच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. शतक झळकावणाऱ्या सलामीवीर फलंदाजाचे दक्षिण आफ्रिकेला या टप्प्यावर नेण्यात मोठे योगदान आहे. पहिल्या डावात शून्यावर बाद झाल्यानंतर दुसऱ्या डावात त्याने अद्भुत खेळी केली.

सरळ वाचा की उलटं, या खेळाडूच्या नावात होत नाही काहीच बदल?; जगातील एकमेव खेळाडू... नावाचा अर्थही घ्या समजून
Adam MarkramImage Credit source: Getty Images
| Updated on: Jun 14, 2025 | 3:02 PM
Share

लॉर्ड्सच्या ऐतिहासिर मैदानात खेळवण्यात येणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चँपियनशिप 2025 चा जेतेपदाचा सामना आता अंतिम टप्प्यात आला आहे. हा सामना इतिहास रचण्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेने आपली पकड मजबूत केली आहे. विजयासाठी त्यांना फक्त 69 धावांची आवश्यकता आहे, आणि त्यांच्या हातात अजून 8 विकेट्स आहेत. सलामीवीर एडन मार्कराम (102 धावा) आणि कर्णधार टेम्बा बावुमा (65 धावा) क्रीजवर खेळत आहेत. डब्ल्यूटीसी फायनलमध्ये शतक झळकावणाऱ्या ॲडम मर्करमने एक नवा इतिहास रचला आहे. WTC फायनलमध्ये शतक झळकावणारा तो तिसरा फलंदाज बनला आहे. पण आज आपण इथे त्याच्या कामगिरीबद्दल नव्हे तर त्याच्या नावाबद्दल बोलणार आहोत, ज्याचा अर्थ अतिशय शानदार आहे.

मर्करम नावाचा अर्थ काय ?

दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर एडन मार्करामचे स्पेलिंग Markram असं आहे. जर ते सरळ वाचलं किंवा उलटंही वाचलं तरी ते मार्कराम असं वाचला जातं. एवढंच नव्हे तर त्याच्या नावाचा अर्थही खूप चांगला आहे. मार्कराम नावाचा अर्थ उदार आणि उदात्त असा आहे. त्याच्यावर नेमही कृपा असते. या नावाच अर्थ असा की या नावाची व्यक्ती खूप उदार आणि चांगल्या स्वभावाची असते.

दक्षिण आफ्रिकेचा हा सलामीवीरही असाच दिसतो. मैदानावर नेहमीच शांत दिसणारा मार्कराम खूपच आक्रमक फलंदाजी करतो. सध्या सुरू असलेल्या WTC फायनलमध्येही तो त्याच शैलीत फलंदाजी करत आहे. नुकतंच त्याने चौकार मारून आपले शतकही पूर्ण केले.

WTC फायनल मध्ये रचला इतिहास

दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर मार्करामने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या डब्ल्यूटीसी फायनलमध्ये शानदार शतक झळकावून इतिहास रचला आहे. ट्रॅव्हिस हेड आणि स्टीव्ह स्मिथनंतर शतक झळकावणारा तो तिसरा फलंदाज ठरला आहे. याशिवाय, त्याच्या शानदार शतकामुळे दक्षिण आफ्रिका आता विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. विजयासाठी त्यांना फक्त 69 धावांची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत, जर दक्षिण आफ्रिकेचा संघ जिंकला, तर तो स्वतःवरील चोकरचा कलंकही दूर करेल. कारण दक्षिण आफ्रिकेचा संघ नेहमीच मोठ्या, महत्वाच्या प्रसंगी, मॅचमध्ये कच खातो. मात्र यावेळी त्यांचा संघ इतिहास रचण्याच्या अगदी जवळ पोहोचले आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ गेल्या 27 वर्षांपासून आयसीसी ट्रॉफीची वाट पाहतोय.

नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा.