AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Test Championship final 2021 : BCCI चं पुन्हा दुर्लक्ष, भारतीय संघातील फिरकीपटूचं करिअर संपण्याच्या मार्गावर!

World Test Championship final 2021 : जाहीर केलेल्या संघात भारतीय संघात स्टार फिरकीपटू कुलदीप यादवला (Kuldeep Yadav) स्थान देण्यात आलेलं नाहीय. बीसीसीआयने त्याच्याकडे पुन्हा एकदा दुर्लक्ष केलंय. त्यामुळे त्याचं क्रिकेट करिअर धोक्यात आलंय.

World Test Championship final 2021 : BCCI चं पुन्हा दुर्लक्ष, भारतीय संघातील फिरकीपटूचं करिअर संपण्याच्या मार्गावर!
कुलदीप यादवचा भारतीय संघात समावेश करण्यात आला नाहीय.
| Updated on: May 08, 2021 | 9:34 AM
Share

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या (World Test Championship Final) अंतिम सामन्यासाठी तसंच इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची (Team India) घोषणा करण्यात आली. या एकमेव पण महत्वपूर्ण सामन्यासाठी बीसीसीआयने 4 राखीव खेळाडूंसह एकूण 24 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. जाहीर केलेल्या संघात भारतीय संघात स्टार फिरकीपटू कुलदीप यादवला (Kuldeep Yadav) स्थान देण्यात आलेलं नाहीय. बीसीसीआयने त्याच्याकडे पुन्हा एकदा दुर्लक्ष केलंय. त्यामुळे त्याचं क्रिकेट करिअर धोक्यात आलंय. (Kuldeep yadav not Selected India vs England World Test Championship final 2021)

कुलदीपला संधी नाहीच!

बीसीसीआयच्या निवड समितीने जाहीर केलेल्या 20 सदस्यीय संघात कुलदीप यादवला स्थान दिलं नाही. कुलदीपने शेवटची टेस्ट मॅच इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळली होती. परंतु त्याही मालिकेत त्यांच्याकडून जास्त ओव्हर टाकून घेण्यात आल्या नाही किंबहुना त्याला बोलिंगची कमी संधी देण्यात आली.

इंग्लंड दौऱ्याआधी कुलदीप यादव 2 वर्षांपासून कसोटी क्रिकेटची दारं उघडी व्हावीत म्हणून वाट पाहत राहिला. अखेर त्याला भारतीय कसोटी संघात संधी मिळाली पण ती काही मोजक्या मॅचेसपुरतीच… आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यासाठी तसंच इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी कुलदीपला स्थान मिळेल, असं वाटत असतानाच बीसीसीआयने त्याच्याकडे पुन्हा दुर्लक्ष केलं!

बीसीसीआयच्या करारात कुलदीपचा भ्रमनिरास, क्रिकेट करिअरवर प्रश्नचिन्ह?

बीसीसीआयने यावर्षी खेळाडूंरोबर केलेल्या कॉन्ट्रॅक्टमध्येही कुलदीपचा भ्रमनिरास झालाय. कुलदीप अगोदर ए ग्रेडमध्ये होता, म्हणजेच त्याला 5 कोटी रुपये इतकं मानधन मिळत होतं. मात्र या वर्षीच्या करारामध्ये ए ग्रेडवरुन त्याची वर्णी थेट सी ग्रेडमध्ये लावण्यात आलेली आहे. म्हणजेच त्याला आता केवळ 1 कोटी रुपये इतकं मानधन मिळणार आहे.

कॅप्टल कूल संघात असताना त्याच्या नेतृत्वाखाली कुलदीप यादव चांगली कामगिरी करत होता. मात्र जशी धोनीने निवृत्ती घेतली, त्याचा परिणाम कुलदीपच्या क्रिकेट करिअरवर झालेला पाहायला मिळतोय. धोनीच्या रिटायरमेंटनंतर कुलदीप म्हणावी तशी कामगिरी करु शकला नाही. कदाचित त्याच्या निराशाजनक कामगिरीमुळे बीसीसीआयला त्याला सी ग्रेडमध्ये टाकावं लागलं किंबहुना खेळांडूंच्या परफॉर्मन्सच त्यांच्या कॅटॅगरी ठरवत असतो.

(Kuldeep yadav not Selected India vs England World Test Championship final 2021)

हे ही वाचा :

ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मालदीवला पोहोचताच माईक हसीने दिली चेन्नईला गुड न्यूज!

World Test Championship final 2021 : निवड समितीवर आक्षेप नोंदवणारे हे 4 सवाल, फॅन्स विचारतायत या प्रश्नांची उत्तरं

World Test Championship final 2021 : भारतीय संघात जागा मिळवून अर्जन नागवासवालाने रचला इतिहास, 46 वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं!

World Test Championship final 2021 | निवड समितीने ‘या’ 2 कारणांचा विचार केला अन् हार्दिक पांड्याला संघातून डच्चू दिला!

अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.