AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फक्त तीन वनडे खेळला अन् घरी बसला, आता बीसीसीआयनं थेट कोच बनवलं, आहे तरी कोण?

BCCI Coach: फक्त तीन वनडे सामने खेळल्यानंतर ज्यांचे करिअर संपले. आता तेच आता एका संघाची जबाबदारी सांभाळणार असून बीसीसीआयने त्यांना एक मोठा संधी दिली आहे.

फक्त तीन वनडे खेळला अन् घरी बसला, आता बीसीसीआयनं थेट कोच बनवलं, आहे तरी कोण?
| Updated on: Sep 25, 2026 | 11:55 AM
Share
फक्त तीन वनडे सामने खेळल्यानंतर ज्यांचे करिअर संपले. आता तेच आता एका संघाची जबाबदारी सांभाळणार असून बीसीसीायने त्यांना एक मोठा संधी दिली आहे. बंगालचे मुख्य प्रशिक्षक लक्ष्मी रतन शुक्ला यांची ‘रेस्ट ऑफ इंडिया’ संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हा संघ १ ते ५ ऑक्टोबर दरम्यान श्रीनगर येथे इराणी कप सामन्यात जम्मू आणि काश्मीरचा सामना करणार आहे. शुक्ला गेल्या काही हंगामांपासून बंगालचे मुख्य प्रशिक्षक होते आणि गेल्या रणजी ट्रॉफी हंगामाच्या उपांत्य फेरीत संघाला जम्मू आणि काश्मीरकडून पराभव पत्करावा लागला होता.

केवळ तीन एकदिवसीय सामने खेळून कारकिर्दीचा शेवट ४६ वर्षीय बंगालचे माजी कर्णधार शुक्ला यांनी १९९९ मध्ये भारतासाठी तीन एकदिवसीय सामने खेळले होते. ते आयपीएल विजेत्या कोलकाता नाईट रायडर्स संघाचाही भाग होते आणि खेळाडू म्हणून आपल्या शेवटच्या आयपीएल हंगामात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळले होते. शुक्ला यांनी १९९७-९८ हंगामात महाराष्ट्राविरुद्ध आपला पहिला रणजी ट्रॉफी सामना खेळला होता. ते खूप लहान वयातच प्रसिद्धीस आले आणि दक्षिण आफ्रिकेत झालेल्या १९९८ च्या युवा विश्वचषकासाठी त्यांची भारतीय १९ वर्षांखालील संघात निवड झाली होती.

२००० च्या दशकाच्या सुरुवातीला, शुक्ला यांची राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून निवड झाली, परंतु दुखापतींमुळे त्यांना अकादमी सोडावी लागली. लवकरच त्यांनी पेप्सी कपमध्ये श्रीलंकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केले, ज्यात त्यांनी चार षटकांत ३२ धावा दिल्या. कोका-कोला सिंगापूर चॅलेंजमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या त्यांच्या पुढच्या सामन्यातील कामगिरी थोडी चांगली होती, पण त्यानंतर निवड समितीने त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली.

बीसीसीआयमधील पहिली भूमिका लक्ष्मी रतन शुक्ला भारतीय क्रिकेट नियामक मंडळात (बीसीसीआय) पहिल्यांदाच एक भूमिका स्वीकारत आहेत. देवाशीष मोहंती हे ‘रेस्ट ऑफ इंडिया’ संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक असतील, तर मिलाप मेवाड क्षेत्ररक्षण प्रशिक्षक असतील. लक्ष्मी रतन शुक्ला हे सौरव गांगुली यांचे जवळचे मित्र मानले जातात.

Follow Us
61 तासांच्या आंदोलनाला अखेर यश, 3900 + 100 + 200 चा फॉर्म्युला मान्य..
Raju Shetti On Sugarcane Farmers Protest : 61 तासांच्या आंदोलनाला अखेर यश, 3900 + 100 + 200 चा फॉर्म्युला मान्य; राजू शेट्टींकडून आंदोलन मागे
शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार; या नेत्यांकडून भेटीगाठी आणि फोन
Sharad Pawar Health Update : शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार; या नेत्यांकडून भेटीगाठी आणि फोन
आताच का बोलले, तेव्हा कोणाचा दबाव होता? तटकरेंच्या विधानावर अनिल....
NCP Merger : आताच का बोलले, तेव्हा कोणाचा दबाव होता? सुनील तटकरेंच्या विधानावर अनिल देशमुखांचा थेट सवाल
गोकुळमध्ये रडीचा डाव खेळणं बंद करा; भाजपवर ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
Raj Thackeray On Gokul : गोकुळमध्ये रडीचा डाव खेळणं बंद करा; भाजपवर राज ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
अजित पवारांच्या राष्ट्रवादीत उलथापालथ होण्याची शक्यता...
NCP : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत उलथापालथ होण्याची शक्यता; त्या बड्या नेत्याच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
अजितदादा असते तर दोन्ही राष्ट्रवादी...; सुनील तटकरे यांचं मोठं विधान
Sunil Tatkare : अजितदादा असते तर दोन्ही राष्ट्रवादी...; सुनील तटकरे यांचं  मोठं विधान
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवार-प्रफुल्ल पटेल भेटीनंतर राजकीय
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवार-प्रफुल्ल पटेल भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुख्यमंत्री फडणवीसांचा सुप्रिया सुळेंना फोन; शरद पवारांच्या.....
Devendra Fadnavis Calls Supriya Sule : मुख्यमंत्री फडणवीसांचा सुप्रिया सुळेंना फोन; शरद पवारांच्या प्रकृतीची घेतली सविस्तर माहिती
अजितदादा हयात असते तर 12 फेब्रुवारीलाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र...
अजितदादा हयात असते तर 12 फेब्रुवारीलाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या असत्या; सुनील तटकरेंचा मोठा खुलासा!
शरद पवारांच्या भेटीगाठींवरून रोहित पवारांचा भाजपला सूचक इशारा; पार्थ..
शरद पवारांच्या भेटीगाठींवरून रोहित पवारांचा भाजपला सूचक इशारा; पार्थ आणि सुनेत्रा पवारांबाबत काय म्हणाले?