AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऋषभ पंतनंतर लखनौने आणखी सहा खेळाडूंबद्दल घेतला मोठा निर्णय, IPL 2027 पूर्वी त्यांना…

आयपीएल 2027 च्या पार्श्वभूमीवर लखनौ सुपर जायंट्सने आपला संघ मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. ऋषभ पंत आणि कुलदीप यादव या ट्रेल डीलनंतर आता लखनौने आणखी सहा खेळाडूंबद्दल एक मोठा निर्णय घेतला आहे.

ऋषभ पंतनंतर लखनौने आणखी सहा खेळाडूंबद्दल घेतला मोठा निर्णय, IPL 2027 पूर्वी त्यांना...
rishabh pant
| Updated on: Jun 24, 2026 | 11:32 AM
Share

नुकताच आयपीएल 2026 चा हंगाम पार पडला. जो हंगाम रॉयल चॅलेंजर्सने जिंकला. आरसीबीने सलग दुसऱ्यांदा आयपीएलची ट्रॉफी जिंकली. अनेक संघानी आयपीएल 2026 मध्ये अतिशय वाईट कामगिरी केलेली पाहायला मिळाली. लखनौ सुपर जायट्ंस आणि मुंबई इंडियन्स यांसारख्या संघाची कामगिरी अतिशय वाईट पाहायला मिळाली. आता पुढील हंगाम सुरु होण्यापूर्वी लखनौच्या संघाने मोठी पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. लखनौ सुपर जायंट्सने आयपीएल 2027 ची ट्रॉफी जिंकण्यासाठी मोठी तयारी सुरू केली आहे. लखनौने सर्वप्रथम ऋषभ पंतला ट्रेड करून त्याच्या जागी कुलदीप यादवला संघात घेतले. आता आलेल्या वृत्तांनुसार, लखनौ व्यवस्थापनने आपल्या सहा युवा खेळाडूंबद्दल एक मोठा निर्णय घेतला आहे.

मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार होण्यासाठी संघातील सहा खेळाडूंना ऑस्ट्रेलियातील पर्थ येथे पाठवत आहे. साई सुदर्शनसारख्या फलंदाजांना घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या कर्नाटकचे माजी खेळाडू जी. जयकुमार यांना फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्याची योजनाही आखली जात आहे. क्रिकबझच्या वृत्तानुसार, लखनौ सुपर जायंट्सच्या व्यवस्थापनाने आपल्या काही खेळाडूंना ऑस्ट्रेलियातील पर्थ येथे पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. या यादीत हिम्मत सिंग, मुकुल चौधरी, अक्षत रघुवंशी, अब्दुल समद, आयुष बडोनी आणि अर्शिन कुलकर्णी यांचा समावेश आहे. हे सर्व खेळाडू पर्थमध्ये जस्टिन लँगर यांच्या देखरेखीखाली काही काळ प्रशिक्षण घेतील. त्यानंतर, ते चेन्नईमध्ये नवीन प्रशिक्षक जी. जयकुमार यांच्यासोबत प्रशिक्षण घेतील.

जयकुमारबद्दल बोलायचे झाल्यास, ते केरळचे माजी क्रिकेटपटू आहेत. त्यांनी भारतासाठी साई सुदर्शनसारखे फलंदाज घडवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. आपल्या कारकिर्दीत ते वेगवान गोलंदाज असले तरी, फलंदाजी प्रशिक्षक म्हणून त्यांची मोठी ख्याती आहे. त्यांनी लखनौ सुपर जायंट्ससोबत काम करण्यास होकार दिला असून, ते पुढील हंगामात संघाच्या डगआऊटमध्ये दिसू शकतात. लखनौच्या प्रशिक्षण सेटअपमध्ये आधीपासूनच टॉम मूडी (क्रिकेट संचालक), जस्टिन लँगर (मुख्य प्रशिक्षक) आणि भरत अरुण (गोलंदाजी प्रशिक्षक) यांचा समावेश आहे. आता जयकुमार संघाच्या फलंदाजांना घडवण्याची जबाबदारीही घेऊ शकतात.

लखनौ सुपर जायंट्सबद्दल बोलायचे झाल्यास, हा संघ 2022 पासून आयपीएलमध्ये खेळत आहे, परंतु त्यांना अद्याप एकही ट्रॉफी जिंकता आलेली नाही. केएल राहुल आणि नंतर ऋषभ पंत यांच्या कर्णधारपदाखाली संघाने चांगली कामगिरी केली असली तरी, त्यांना विजेतेपदापर्यंत पोहोचण्यात अपयश आले आहे. आता, 27 कोटी रुपयांना संघात सामील झालेल्या ऋषभ पंतने फ्रँचायझी सोडल्यानंतर, लखनौ सुपर जायंट्स पुढील हंगामासाठी नवीन कर्णधाराच्या शोधात आहे.

Follow Us
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
रुपाली चाकणकर यांच्या विधानामुळे संताप, नेमकं काय म्हणाल्या?
Video : सावित्रीबाई फुलेंनीही 200 वर्षांपूर्वी…. रुपाली चाकणकर यांच्या विधानामुळे संताप, नेमकं काय म्हणाल्या?
सिल्लोडमध्ये गणेशोत्सवातून देशप्रेमाचा संदेश
Video: सिल्लोडमध्ये गणेशोत्सवातून देशप्रेमाचा संदेश, कुलकर्णी कुटुंबाचा 150 वर्षांच्या गौरवशाली इतिहासाचा देखावा
विनायक राऊत संतापले, दिशा सालियनच्या वडिलांवर गंभीर आरोप!
'मेलेल्याच्या टाळूवर लोणी चाटणारी औलाद म्हणजे...., विनायक राऊत संतापले, दिशा सालियनच्या वडिलांवर गंभीर आरोप!
शेती जळाली, उत्पन्न बंद…आता शाळेची फी तरी कशी भरायची?
Vidarbha Drought : शेती जळाली, उत्पन्न बंद…आता शाळेची फी तरी कशी भरायची?; दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचा सरकारला आर्त सवाल
एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे वसंत डावखरे प्रकरणी निर्दोष, वकील म्हणाले...
एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे वसंत डावखरे प्रकरणी निर्दोष, वकील काय म्हणाले?
मोठी बातमी! आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवरील आरोपांवर केंद्रीय निवडणूक..
मोठी बातमी! आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवरील आरोपांवर केंद्रीय निवडणूक आयोगाची भूमिका स्पष्ट