युवा फुटबॉलपटूंच्या ट्रेनिंगसाठी FC Bayern क्लबची निवड का? गिरीश महाजनांनी सांगितलं त्यामागच धोरण

एफसी बायर्न महाराष्ट्र कप फुटबॉल स्पर्धेत सर्वोत्तम कौशल्य दाखवणाऱ्या 20 मुलांची निवड करण्यात आली आहे. त्यांना प्रशिक्षणासाठी जर्मनीला पाठवण्यात येणार आहे.

युवा फुटबॉलपटूंच्या ट्रेनिंगसाठी FC Bayern क्लबची निवड का? गिरीश महाजनांनी सांगितलं त्यामागच धोरण
Follow us
| Updated on: Mar 17, 2023 | 3:18 PM

मुंबई : नुकतीच एफसी बायर्न महाराष्ट्र कप फुटबॉल स्पर्धा पार पडली. राज्याच्या सर्वच जिल्ह्यातील शाळा या फुटबॉल स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेत सर्वोत्तम कौशल्य दाखवणाऱ्या 20 मुलांची निवड करण्यात आली आहे. त्यांना प्रशिक्षणासाठी जर्मनीला पाठवण्यात येणार आहे. 9 ते 14 वयोगटातील मुलांसाठी बायर्न महाराष्ट्र कप फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.  या स्पर्धेनंतर टीव्ही 9 मराठी प्रायोजित महाराष्ट्राचा महासंकल्प मिशन वर्ल्ड कप कार्यक्रमाच आयोजन करण्यात आलं होतं.

या कार्यक्रमाला राज्याचे क्रीडा मंत्री गिरीश महाजन  उपस्थित होते. त्यांनी क्रीडा खात्याने फुटबॉलची निवड का केली? एफसी बायर्न क्लबमध्ये खेळाडूंना पाठवण्याचा काय फायदा होणार? त्या बद्दल माहिती दिली.

खेळाचा आणि माझा जवळचा संबंध

“मी मूळात खेळाडू आहे. पुणे विद्यापीठात कबड्डी खेळाडू होतो. महाराष्ट्र टीममध्ये खेळायचो. कुस्ती खेळलोय. व्हॉलीबॉल विद्यापाीठाचा कॅप्टन होतो. खेळाचा आणि माझा जवळचा संबंध आहे” असं गिरीश महाजन यांनी सांगितलं.

म्हणून फुटबॉलची निवड केली?

“खेळाचा विचार केला तर, माझ्या मनात खंत होती, फुटबॉल जगातला लोकप्रिय खेळ आहे. पण आपल्या देशात किंवा राज्यात फुटबॉलला महत्व दिलं जात नाही. सर्वात जास्त व्यायाम या खेळात होतो. मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी फुटबॉल खेळाचा फायदा होता. म्हणून आम्ही फुटबॉलची निवड केली” असं गिरीश महाजन यांनी सांगितलं.

फुटबॉलच का?

“एफसी बायर्न क्लबसोबत करार करण्याचा दुग्ध शर्करा योग जुळून आला. त्यातून देवाण-घेवाण होणार आहे. 1 लाखामधून 20 विद्यार्थी निवडले गेले, फुटबॉल कमी खर्चाचा खेळ आहे. एक बॉल आणला, मैदान असंल की तुम्ही खेळू शकता. त्या तुलनेत बॅडमिंटन, क्रिकेट महागडा खेळ आहे. फुटबॉलमध्ये 22-25 खेळाडू सहज खेळ शकतात. हा आर्थिक दृष्टया परवडणारा खेळ आहे” असं गिरीश महाजजन यांनी सांगितलं. एफसी बायर्न क्लबची निवड का?

“एफसी बायर्न क्लबसोबत करार केलाय. त्यातून खेळाडूंना चांगलं तंत्रज्ञान अवगत होईल. चांगले खेळाडू तयार व्हावे, म्हणून बायर्न क्लबची निवड केली. आमचे विद्यार्थी, प्रशिक्षक तिथे जातील. वर्षभर देवाण-घेवाण होईल. खेळाडूंना फुटबॉलच चांगलं तंत्रज्ञान अवगत होईल” असं गिरीश महाजन म्हणाले.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.