Anaya Bangar: माझ्याशी लग्न कर, नाहीतर मी… नग्न फोटोनंतर अनया बांगरने केला सर्वात मोठा खुलासा
टीम इंडियाचे माजी खेळाडू आणि फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांचा मुलगी अनाया बांगर नेहमी चर्चेत असते. ती सध्या एमएक्स प्लेअरच्या राईज अँड फॉल या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झालेली आहे. तिने आपल्या आयुष्याबाबत या शोमध्ये मोठे खुलासे केले आहेत.

टीम इंडियाचे माजी खेळाडू आणि फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांचा मुलगी अनाया बांगर नेहमी चर्चेत असते. अनाया ही आधी पुरुष होती, लिंग बदलण्याच्या शस्त्रक्रियेनंतर ती आर्यनची अनाया बनली. आता ती ट्रान्सजेंडर महिला म्हणून ओळखली जाते. लिंग बदलापूर्वी अनाया एक क्रिकेटपटू होती. तिने मुंबईसाठी विविध स्तरांवर क्रिकेट खेळले आहे. ती सध्या एमएक्स प्लेअरच्या राईज अँड फॉल या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झालेली आहे. तिने आपल्या आयुष्याबाबत या शोमध्ये मोठे खुलासे केले आहे.
अनाया बांगरचा धक्कादायक खुलासा
अनाया बांगरने याआधी अनेकदा आपल्या आयुष्याबद्दल मोठे खुलासे केले आहेत. आता तिने या शोमध्ये तिला आलेल्या लग्नाच्या मागणीबद्दल सांगितले आहे. सोशल मीडियावर या शोमधील एक क्लिप व्हायरल होत आहे. यामध्ये अनाया म्हणत आहे की, मला सतत लग्नाचे प्रस्ताव येत असतात. आणखी एक स्पर्धक, आक्रिती नेगी हिने अनायाला विचारले की तुझा इंस्टाग्रामचा अनुभव कसा आहे? यावर अनायाने सांगितले की, “मला डीएममध्ये प्रेम मिळते. मला आतापर्यंत 30,000 ते 40,000 लग्नाच्या मागण्या आल्या आहेत. मला तुझ्याशी लग्न करायचे आहे… माझ्याशी लग्न कर, नाहीतर मी जील देईल असे मेसेज मुलं करत असतात असं अनायाने सांगितले आहे.
माजी क्रिकेटपटूने पाठवला होता नको तो फोटो
याआधी अनाया बांगरने एका क्रिकेटपटूबाबत धक्कादायक खुलासा केला होता. त्याने मला गुप्तांगांचा फोटो पाठवला होता असं अनाया बांगरने सांगितले होते. मात्र तिने या क्रिकेटपटूचे नाव घेण्यास नकार दिला होता. दरम्यान गेल्या वर्षी अनायाने सोशल मीडियावर तिच्या लिंग परिवर्तनाबद्दल माहिती दिली होती. तेव्हापासून ती सतत चर्चेत आहे. अनाया जेव्हा ती पुरुष होती, त्यावेळी ती सरफराज खान, यशस्वी जैस्वाल यांच्यासोबत खेळत असायची.
दरम्यान, अनाया बांगरचे वडील संजय बांगर हे प्रसिद्ध क्रिकेटपटू होते. त्यांनी भारतासाठी काही सामने खेळलेले आहेत. तसेच ते काही काळ भारतीय संघाचे प्रशिक्षकही होते. त्यांनी आयपीएलमध्ये आरसीबी आणि पंजाबसारख्या संघांना प्रशिक्षण दिलेले आहे.
