AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानी खेळाडू मोहम्मद आमिर आता IPL खेळण्यासाठी सज्ज, चक्क पाकिस्तानचे नागरिकत्व सोडलं अन् आता…

पाकिस्तानचा माजी डावखुरा वेगवान गोलंदाज मोहम्मद अमीरला ब्रिटिश नागरिकत्व मिळाल्यापासून तो चर्चेत आहे. अमीरने 'द हंड्रेड' ड्राफ्टमध्ये एक परदेशी खेळाडू म्हणून प्रवेश केला होता.

पाकिस्तानी खेळाडू मोहम्मद आमिर आता IPL खेळण्यासाठी सज्ज, चक्क पाकिस्तानचे नागरिकत्व सोडलं अन् आता...
| Updated on: Aug 05, 2026 | 3:20 PM
Share

पाकिस्तानचा माजी डावखुरा वेगवान गोलंदाज मोहम्मद अमीरला ब्रिटिश नागरिकत्व मिळाल्यापासून तो चर्चेत आहे. अमीरने ‘द हंड्रेड’ ड्राफ्टमध्ये एक परदेशी खेळाडू म्हणून प्रवेश केला होता आणि आता तो यूके स्पर्धेत ट्रेंट रॉकेट्सचे देशांतर्गत खेळाडू म्हणून प्रतिनिधित्व करत आहे. त्याच्या ब्रिटिश नागरिकत्वाशी संबंधित सर्व कायदेशीर औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर, तो आता इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळू शकेल का, असा प्रश्न अनेक चाहत्यांना पडला आहे. दोन्ही देशांमधील तणावपूर्ण संबंधांमुळे पाकिस्तानी खेळाडूंवर सध्या आयपीएलमध्ये खेळण्यावर बंदी आहे, परंतु लीगच्या नियमांनुसार, अमीर आता नोंदणी करण्यास पात्र आहे. अलीकडेच, या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाला त्याच्या भविष्यातील योजना आणि आयपीएलमध्ये खेळण्याच्या शक्यतेबद्दल विचारण्यात आले.

अमीरने स्पष्ट केले की “माझे प्राधान्य पाकिस्तान सुपर लीगला आहे आणि मी अजून आयपीएलमध्ये खेळण्याच्या शक्यतेवर अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. मी 2027 मध्ये पीएसएलमध्ये एक परदेशी खेळाडू म्हणून खेळेन. जिथे आयपीएलचा संबंध आहे, मी त्यात सहभागी होईन की नाही हे मला अजून माहीत नाही.” माजी पाकिस्तानी अष्टपैलू खेळाडू अझर महमूद देखील 2012 ते 2015 या काळात आयपीएलमध्ये खेळला होता. आमिरप्रमाणेच, महमूदनेही ब्रिटिश नागरिकत्व मिळवले आणि नंतर पंजाब किंग्सने त्याला करारबद्ध केले. त्याने कोलकाता नाईट रायडर्ससाठीही काही सामने खेळले. आमिरने 2024 च्या टी-20 विश्वचषकानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. यासह त्याच्या पाकिस्तानी कारकिर्दीचा शेवट झाला, ज्यात 36 कसोटी, 61 एकदिवसीय आणि 62 टी-20 सामन्यांचा समावेश होता.

आपल्या पिढीतील सर्वोत्कृष्ट डावखुरा वेगवान गोलंदाजांपैकी एक मानला जाणारा आमिर, जगभरातील फ्रँचायझी लीगमध्ये आजही एक अत्यंत मागणी असलेला खेळाडू आहे. यापूर्वी जुलैमध्ये, ट्रेंट रॉकेट्ससोबतच्या आमिरच्या कराराला अधिकृतपणे दुजोरा मिळण्यापूर्वी काही चिंता व्यक्त करण्यात आल्या होत्या. अहवालानुसार, काही समीक्षकांनी असा युक्तिवाद केला की, ड्राफ्टमध्ये परदेशी खेळाडू म्हणून नोंदणी केल्यानंतर त्याला ‘द हंड्रेड’मध्ये देशांतर्गत खेळाडू म्हणून खेळण्याची परवानगी द्यायला नको होती.

Follow Us
पेट्रोलमध्ये 20% नव्हे, तर तब्बल 31% इथेनॉल! कर्नाटक सरकारचा आरोप...
मोठी बातमी! पेट्रोलमध्ये 20% नव्हे, तर तब्बल 31% इथेनॉल; कर्नाटक सरकारच्या आरोपाने खळबळ
मोठी बातमी! गिरीश महाजनांचं शेतकऱ्यांना आवाहन; 5 हजारांची मदत परत..
मोठी बातमी! गिरीश महाजनांचं शेतकऱ्यांना आवाहन; 5 हजारांची मदत परत करण्यास सांगितलं!
शरद पवारांच्या डिस्चार्जनंतर पार्थ पवारांची सिल्व्हर ओकवर भेट; इतर...
शरद पवारांच्या डिस्चार्जनंतर पार्थ पवारांची सिल्व्हर ओकवर भेट; इतर राष्ट्रवादी नेतेही पोहोचले!
अयोध्येत दीपोत्सवाचा भव्य सोहळा! 30 लाख दिव्यांनी उजळली रामनगरी
Ayodhya Dipotsav : अयोध्येत दीपोत्सवाचा भव्य सोहळा! 30 लाख दिव्यांनी उजळली रामनगरी
राष्ट्रवादीतील विलीनीकरणावरून नवा वाद! रुपाली ठोंबरेंचा तटकरेंवर हल्ला
राष्ट्रवादीतील विलीनीकरणावरून नवा वाद! रुपाली ठोंबरेंचा तटकरेंवर हल्लाबोल
सोनिया गांधींची मोदी सरकारवर टीका; बावनकुळेंचा पलटवार, काँग्रेसच्या...
सोनिया गांधींची मोदी सरकारवर टीका; बावनकुळेंचा पलटवार, काँग्रेसच्या जुन्या कारभारावर बोट
ऑडिओ क्लिपचं मूळ डिव्हाइस रामदास कदमांकडे? मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा
ऑडिओ क्लिपचं मूळ डिव्हाइस रामदास कदमांकडे? मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा!
पायल झांबरे प्रकरणात नवी अपडेट! नेमकं काय घडतंय?
Payal Pawar Zhambre : पायल झांबरे प्रकरणात नवी अपडेट! नेमकं काय घडतंय?
दिवाळीत ना रांगोळी, ना पणत्या! बीडच्या पाटसरा गावावर दुष्काळाचं सावट,
दिवाळीत ना रांगोळी, ना पणत्या! बीडच्या पाटसरा गावावर दुष्काळाचं सावट, चिमुकल्यांची चटणी-भाकरीवर दिवाळी!
महायुतीत पुन्हा धुसफूस! भाजपकडून डावलले जात असल्याने शिंदे गट नाराज;
महायुतीत पुन्हा धुसफूस! भाजपकडून डावलले जात असल्याने शिंदे गट नाराज; एकनाथ शिंदेंकडे मांडली कैफियत