AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Sharma: कापली ना नाक… रोहितच्या शतकानंतरही माजी खेळाडूनं असं विधान का केलं? Video Viral

भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिका पार पडली जी भारतीय संघाने गमावली. इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात रोहित शर्माने शतकी खेळी खेळली होती. शतकी खेळीसोबत त्याने आता त्याच्या निवृत्तीच्या चर्चांवरही पूर्णविराम लावला. आता यानंतर रोहितबद्दल एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे,.

Rohit Sharma: कापली ना नाक... रोहितच्या शतकानंतरही माजी खेळाडूनं असं विधान का केलं? Video Viral
mohhmad kaif on rohit sharma
| Updated on: Jul 21, 2026 | 10:13 AM
Share

रोहित शर्माच्या 138 धावांच्या खेळीने त्याच्या निवृत्तीबद्दलच्या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये अपेक्षेप्रमाणे धावा करण्यात अपयशी ठरल्यानंतर, लॉर्ड्सवर होणारा आगामी एकदिवसीय सामना रोहितचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना असू शकतो, असे वृत्त समोर आले होते. मात्र, त्याच्या शतकामुळे या चर्चा आता शमल्या आहेत. रोहितने एक दोन सामन्यात धावा केल्या नाही की लगेच त्याच्या निवृत्तीच्या चर्चा जोर धरतात. आता मात्र रोहितने शानदार शतकी खेळी खेळून सर्वांची बोलती बंद केली. रोहितच्या शतकानंतर सर्वत्र त्याचे कौतुक झाले. अशातच रोहितच्या शतकानंतर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

दरम्यान, भारताचा माजी फलंदाज मोहम्मद कैफने ‘हिटमॅन’साठी एक हृदयाला भिडणारा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी रोहितच्या टीकाकारांना सडेतोड उत्तरही दिले आहे. मोहम्मद कैफने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने रोहित शर्माच्या टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले आहे. कैफ म्हणाला, “निवृत्ती घेतली का? रोहित शर्मा स्वतःच्या निवृत्तीचा निर्णय घेईल. स्वत:चे नाक कापून घेतलात ना? त्याने भारतासाठी जे काही केले आहे,  यानंचर त्याला स्वत: ला पात्र करावा लागायला नको खरं तर. 12,000 धावा, 34 शतके. जोपर्यंत तो कर्णधार होता, त्याने भारताला कधीही हरू दिले नाही. त्याला कोणताही त्रास झाला नाही, व्हाईट-बॉल क्रिकेटमध्ये त्याला कोणीही हरवू शकले नाही. असे होते त्याचे कर्णधारपद.”

भारताचा माजी फलंदाज मोहम्मद कैफने पुढे आपले मत व्यक्त केले की, “जर रोहित दबावाखाली शतक करू शकतो, तर त्याला कर्णधार आणि बीसीसीआयचा पाठिंबा मिळाल्यास तो काय करू शकतो. इतका दबाव असतो की, प्रत्येकजण म्हणतो, ‘भावा, आता पुरे झाले, तू निवृत्त व्हायला पाहिजे. त्याने लॉर्ड्सवर त्या दबावाखाली शतक झळकावले. आजपर्यंत कोणत्याही भारतीय फलंदाजाने लॉर्ड्सवर एकदिवसीय सामन्यात शतक केलेले नाही. आता जर शुभमन गिल म्हणाला, “मला 2027 च्या विश्वचषक संघात रोहित भाई हवा आहे, आणि बीसीसीआय येऊन म्हणाली, कोणीही रोहितकडे बोट दाखवू नये, तर तो माणूस हिमालय चढेल. तो अशाप्रकारे खेळत भारतासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देईल. आम्हाला आमचे उत्तर मिळाले आहे. मला वाटते की येथून पुढे सर्वजण शांतता राखतील.”

रोहित शर्मा सप्टेंबरमध्ये पुन्हा मैदानात उतरणार आहे. वेस्ट इंडिज संघ भारताच्या दौऱ्यावर येणार असून, या दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाईल. नियोजित वेळापत्रकानुसार, पहिला सामना 27 सप्टेंबरला, दुसरा 30 सप्टेंबरला आणि शेवटचा एकदिवसीय सामना 3 ऑक्टोबरला खेळला जाईल.

Follow Us
डायर नाही, कायर पाहिला! लाठीचार्जवर देशपांडेंचा सरकारवर घणाघाती हल्ला
Sandeep Deshpande | जनरल डायर नाही, कायर पाहिला! विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जवर संदीप देशपांडेंचा सरकारवर घणाघाती हल्ला
युवा पिढी हीच लोकशाहीची ताकद; CJP आंदोलनाला रितेश-जेनेलियाचा पाठिंबा!
Ritesh-Genelia Deshmukh | युवा पिढी हीच लोकशाहीची ताकद; CJP आंदोलनाला रितेश-जेनेलियाचा पाठिंबा! सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
आंदोलनाने सरकार बदलत नाही! ठाकरेंना गुलाबराव पाटील यांचे प्रत्युत्तर
Gulabrao Patil on Uddhav Thackeray | आंदोलनाने सरकार बदलत नाही! उद्धव ठाकरेंना गुलाबराव पाटील यांचे थेट प्रत्युत्तर
डहाणूमध्ये भरदिवसा ज्वेलर्सवर शस्त्र दरोडा; लाखोंचा सोन्याचा ऐवज लंपास
Dahanu | डहाणूमध्ये भरदिवसा ज्वेलर्सवर शस्त्र दरोडा; लाखोंचा सोन्याचा ऐवज लंपास, घटना CCTV मध्ये कैद
केंद्रातील हालचाली वाढल्या! अमित शहांसह दोन बड्या नेत्यांची तब्बल 3...
केंद्रातील हालचाली वाढल्या! अमित शहांसह दोन बड्या नेत्यांची तब्बल 3 तास बैठक
फार चिंताजनक! देशात लोकशाही संपली; आंदोलनावर अंधारेंची प्रतिक्रिया
Sushma Andhare | फार चिंताजनक! देशात लोकशाही संपली; दिल्ली आंदोलनावर सुषमा अंधारेंची सडेतोड प्रतिक्रिया
सीजेपीच्या आंदोलनातील हादवणारे फुटेज समोर, पहाच...
CJP Protest | सीजेपीच्या आंदोलनातील हादवणारे फुटेज समोर, पहाच...
कल्याणमध्ये दृश्यम स्टाईल हत्याकांड; प्रियकराचा खून करून मृतदेह...
Kalyan Dombivali | कल्याणमध्ये दृश्यम स्टाईल हत्याकांड; प्रियकराचा खून करून मृतदेह गोणीत लपवला, प्रेयसी फरार
CJP च्या आंदोलनाबाबत मोठी अपडेट! ठाकरे गटाचे नेते वांगचुक यांची भेट...
CJP च्या आंदोलनाबाबत मोठी अपडेट! ठाकरे गटाचे नेते वांगचुक यांची भेट घेणार
आंदोलन करून काही होणार नाही शांततेच्या मार्गाने...हेमा मालिनी
Hema Malini | आंदोलन करून काही होणार नाही शांततेच्या मार्गाने... CJP आंदोलनावर हेमा मालिनी यांचं मोठं विधान
CJP Protest : रात्रभर पाऊस, तरीही सीजेपीचं आंदोलन रात्री पासून पुन्हा सुरू, VIDEO.

CJP Protest : रात्रभर पाऊस, तरीही सीजेपीचं आंदोलन रात्री पासून पुन्हा सुरू, VIDEO

जंतर मंतर वर ते बोलू शकत नव्हते, तरी त्यांचा व्हिडिओ देशभर व्हायरल झाला.

जंतर मंतर वर ते बोलू शकत नव्हते, तरी त्यांचा व्हिडिओ देशभर व्हायरल झाला

Video : थोडीतरी लाज बाळगा, किती सलाम ठोकणार..,’ पोलिसांचा CJP आंदोलकांवर लाठीचार्ज, प्रसिद्ध गायकाचा संताप.

Video : थोडीतरी लाज बाळगा, किती सलाम ठोकणार..,’ पोलिसांचा CJP आंदोलकांवर लाठीचार्ज, प्रसिद्ध गायकाचा संताप

CJP Protest: आजही संसदेपर्यंत सीजेपीचा मार्च? अभिजीत दिपकेंचे मोठे वक्तव्य, काय आहे प्लॅन?.

CJP Protest: आजही संसदेपर्यंत सीजेपीचा मार्च? अभिजीत दिपकेंचे मोठे वक्तव्य, काय आहे प्लॅन?

Share Market: शेअर मार्केटमध्ये घसरण कायम, सोमवारच्या ग्लोबल क्रॅशनंतर मंगळवारीही भारतीय शेअर बाजारही कोसळला.

Share Market: शेअर मार्केटमध्ये घसरण कायम, सोमवारच्या ग्लोबल क्रॅशनंतर मंगळवारीही भारतीय शेअर बाजारही कोसळला

विद्यार्थी रस्त्यावर असताना आता शेतकरीही दिल्लीकडे निघाले, सरकारसमोर दुहेरी संकट, रस्त्यांवर बॅरिगेट्स, पोलिस पुन्हा अलर्ट.

विद्यार्थी रस्त्यावर असताना आता शेतकरीही दिल्लीकडे निघाले, सरकारसमोर दुहेरी संकट, रस्त्यांवर बॅरिगेट्स, पोलिस पुन्हा अलर्ट