AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“तो फोन करून सारखा विचारायचा, मला संधी कधी मिळणार?”, टीम इंडियाच्या स्टार गोलंदाजाबाबत मोठा खुलासा

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार सामन्यांच्य कसोटी मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे. भारतीय संघात आता एकापेक्षा एक सरस खेळाडू आहे. एखादा खेळाडू अपयशी ठरला तर त्यासाठी दुसरा पर्याय तयारच आहे.

तो फोन करून सारखा विचारायचा, मला संधी कधी मिळणार?, टीम इंडियाच्या स्टार गोलंदाजाबाबत मोठा खुलासा
"मेरा नंबर कब आयेगा?", डेब्यूच्या प्रतिक्षेत असेलला खेळाडू वांरवार करायचा कॉल, अखेर मिळाली संधीImage Credit source: PTI
| Updated on: Feb 22, 2023 | 8:16 PM
Share

मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत भारतानं जबरदस्त कामगिरी केली आहे. चार सामन्यांच्य कसोटी मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे. भारतीय संघात आता एकापेक्षा एक सरस खेळाडू आहे. एखादा खेळाडू अपयशी ठरला तर त्यासाठी दुसरा पर्याय तयारच आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया चांगली कामगिरी करत असून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान मिळवेल असंच चित्र आहे.असं असताना टीम इंडियातील एका खेळाडूची चर्चा रंगली आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आहे. हैदराबादमधल्या मोहम्मद सिराजबाबत माजी गोलंदाज प्रशिक्षक भरत अरुण यांनी गौप्यस्फोट केला आहे. भरत अरुण यांनी सांगितलं की, “हैदराबाद रणजी टीमसाठी चांगली खेळी केल्यानंतर टीम इंडियात पदार्पण केलं. त्यावेळी सिराज भारत ए मधून खेळत होता. तसेच चांगलं प्रदर्शन करत होता. त्यानंतर तो मला फोन करून विचारायचा की, सर मला कधी संधी मिळणार. तेव्हा मी त्याला सांगायचो तू चांगलं प्रदर्शन करत राहा. तुला टीम इंडियात येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. ”

सिराजने इंडिया ए, आयपीएलमध्ये आपल्या खेळाने निवड समितीचं लक्ष वेधून घेतलं. त्यानंतर 2017 मध्ये टीम इंडियामध्ये पदार्पण केलं. मात्र त्याचा इकॉनॉमी रेट चिंतेचा विषय होता. पण त्याने आपल्या आत्मविश्वासाने रवि शास्त्री यांना प्रभावित केलं. सिराजने यानंतर 2020 मध्ये कसोटीत पदार्पण केलं. त्यावेळी संघातील प्रमुख बॉलर होता. सध्या मोहम्मद सिराज ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळत आहे.

तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे सीरिजसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल आणि जयदेव उनाडकट.

मोहम्मद सिराज क्रिकेट कारकिर्द

मोहम्मद सिराज आतापर्यंत 17 कसोटी, 21 एकदिवसीय, टी 20 8, फर्स्ट क्लास क्रिकेट 57, लिस्ट ए 66 आणि आयपीएलमध्ये 105 सामने खेळला आहे. कसोटीत 47, एकदिवसीय 38, टी 20 मध्ये 11, फर्स्ट क्लासमध्ये 207, लिस्ट ए मध्ये 119 आणि आयपीएलमध्ये 123 गडी बाद केले आहेत.

हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर शिरसाट आक्रमक
हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर शिरसाट आक्रमक.
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद.
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले.
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता.
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी.
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी.
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला.
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे.
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन.
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा.